खलनायकाची भूमिका साकारणारा आभिनेता नेहमीच प्रेक्षकांच्या शिव्या खात असतो. खरेतर हेच त्यांच्या अभिनयाचे कौशल्य असते. पण अभिनेता मुरली शर्माने आजवर जेवढ्या खलंनायाकाच्या भूमिका केल्या आहेत त्या जेवढ्या राग येणाऱ्या होत्या तेवढ्याच चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या होत्या. कॉमेडी खलनायक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. अनेक सिनेमात त्यांनी सहाय्यक भूमिकाही साकारल्या आहेत.
मुरली ह्यांचा जन्म मुंबई मध्ये तेलगू कुटुंबात झाला आहे. रोशन तनेजा अॅक्टिंग स्कूल मुंबईमधून त्यांनी अभिनयाचे धडे घेतले आहेत. त्यांना हिंदी, मराठी, तेलगू, तमिळ आणि गुजराती ह्या पाच भाषा खूप चांगल्या रीतीने बोलता येतात. मुरली शर्माने शाहरुख खानच्या मे हुं ना सिनेमात कॅप्टन खानची भूमिका करून वाह वाही मिळवली होती. तेव्हा पासून त्याच्या सिनेकारकिर्दीला सुरुवात झाली. ह्या नंतर त्यांनी अनेक बॉलीवुड आणि इतर भाषिक सिनेमे केले.
ABCD २, बदलापूर, ब्लॅक फ्रायडे, ढोल, धमाल, अथिती, कांथारी, गोलमाल रिटर्न, जाने तू या जाने ना, सिंघम, ओरार्वेली, कर्म योद्धा आणि अल्लु अर्जुन सोबत डिजे हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे. त्यांनी आतापर्यंत ११६ सिनेमात काम केले आहेत. ह्यात घंटा, गुरु, पोस्टर बॉईज, विजय असो, अजिंठा अशा मराठी सिनेमाचा सुद्धा समावेश आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का मुरली शर्मा ह्यांची पत्नी एक मराठी अभिनेत्री आहे.
खूप लोकांना माहीत असेल तर काहींना ही गोष्ट माहीत नसेल. मुरली शर्मा ह्यांची पत्नी अश्विनी काळसेकर आहे. मराठमोळ्या अश्विनीने आपल्या करीयरची सुरुवात १९९९ मध्ये झी टीव्हीच्या प्रसिद्ध शो मिस्टर गायब पासून केली. शक्तिमान ह्या सुप्रसिद्ध मालिकेत तिने खलनायिकेची निभावलेली भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे. त्यांनतर तिने कसम से, अफसर बीटिया आणि कवच ह्या सारख्या मालिकांमध्ये सुद्धा कामे केली आहेत. झी मराठीवरील फु बाई फू ह्या हास्य रिऍलिटी शोचे जज म्हणून सुद्धा तिने बरेच काम केलं आहे.

अश्विनी ह्यांचे पहिले लग्न नितेश पांडे याच्यासोबत झाले होते. पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला आणि मग मुरली शर्मा यांच्यासोबत त्यांनी लग्न केलं. वेडिंगचा सिनेमा आणि पोस्टर बॉईज मध्ये त्यांनी काम केले आहे. हिंदी मध्ये गोलामालच्या प्रत्येक भागात त्या आपल्याला पाहायला मिळतात. रोहित शेट्टीचा सिनेमा असेल तर नक्की अश्विनी काळसेकर दिसणार ह्यात काही शंका नसते. ह्या दोन्ही सेलिब्रिटी जोडप्याबद्दल कुणा कुणाला आधी माहीत होत किंवा नव्हतं हे आम्हाला कमेंट करून सांगा.