मित्रानो सकारात्मक विचार करा जेणेकरून तुम्ही आयुष्यात नेहमीच आनंदी राहणार, पण काही अशा गोष्टी ही तुमच्या आयुष्यात घडत असतात ज्यामुळे तुम्हाला दुःख होते. पण हे दुःख पचवण्याची क्षमता ही तुमच्यात असायला हवी. जेणेकरून तुमच्या मनावरील दडपण कमी होईल आणि ते दुःख हळू हळू विसराल पण ही दुःख कधीतरी येतात पण आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक वाईट विचार किंवा असे अनेक प्रकारचे विचार आपल्या मनात येतात. त्यामुळे आपण आनंदी नाही राहू शकत, आपल्या मनात सतत नकारात्मक विचार येतात त्यामुळे आपला दिवस ही वाईट जातो.
तर आपल्या दिवसाची सुरुवात चांगल्या गोष्टी ने करण्यासाठी मनात चांगले विचार आणा, दुसऱ्या बद्दल विचार करतानाही चांगला विचार करा. मी खरंच नशीबवान आहे जे हे जन्म मला मिळालं आहे. माझ्या लवकरच धनलाभ होणार आहे किंवा आजचा सगळा दिवस माझा आनंदात जाणार आहे अशी मनाशी कल्पना करा कारण सकाळी सकाळी तुमचे मन एकदम रिकामे असते त्यात तुम्ही जे भराल ते उत्तमच भरा त्यामुळे नक्कीच तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल.
आतापर्यंत जितक्या चांगल्या घटना तुमच्या आयुष्यात घडल्या आहेत त्या आठवा. कारण या अशा काही आठवणी आहेत ज्या तुम्हाला आनंद देऊन गेल्या आहेत म्हणून या गोष्टी अठवल्याने तुमच्या मनाला आताही तितकाच आनंद मिळतो की नाही ते बघा, अशा नेहमीच Positive गोष्टींचा विचार तुम्ही करत राहिलात तर तुमचा दिवस ही आनंदी जाईल. आणि यामुळे तुम्हाला नेहमी सकारात्मक विचार करण्याची सवय लागते.
कोणतेही संकट आल्यावर खचून न जाता धीराने तोंड द्या अशा घटना या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. त्या ना कोणाला चुकल्या आहेत नाही त्यातून कोणी वाचला आहे आणि म्हणून अशा जेव्हा घटना आपल्या आयुष्यात घडतात तेव्हा त्यांना नेहमी धीराने तोंड द्या. खचून जाऊ नये त्या संकटाला हसून हसून तोंड देणे यातच आपले ध्येय लपलेलं आहे.
आलेल्या संकटातून नेहमी संधी शोधा कधीही घाबरून पळून जाऊ नका ते आलेले संकट ओळख त्यापासून तुम्ही तुमच्या पुढील कार्याला सुरुवात करू शकता आपल्या देशातील अनेक मोठे लोक त्यांच्यावर ही अशा प्रकारची संकटे आली पण त्यांनी या संधीचा फायदा घेतला आणि आज आपण त्यांना त्यांच्या कार्या वरून ओळखतो.
संदीप महेश्वरी सरांनी एका सेमिनार मध्ये सांगितले होते की आयुष्य असे व्यतीत करा की जेव्हा मरण डोळ्यासमोर येईल तेव्हा आपल्या चेहऱ्यावर एक गोड हसू हवं आणि मनात विचार हवे ” वा काय लाईफ होती माझी” हे तुम्हालाही जमलं तर तुम्ही कधीच मागे पडणार नाहीत.