Home कथा आता मी काय करू?

आता मी काय करू?

by Patiljee
5978 views

तिच्या लग्नाला आज अडीच वर्ष झाले पण तिच्या विरहात संदीप अजुनही खूप रात्री झोपला नव्हता किंवा तिच्या आठवणी त्याला झोपुच देत नव्हत्या. तिचे लग्न झाल्यापासून तिने सर्व कॉन्टॅक्ट तोडून टाकले होते. खूप स्वप्ने पाहिली होती की आपण छान आपला संसार करू, एवढेच काय तर मुलांची नावेही ठरवली होती. संदीप आणि पूजा पहिल्यांदा ऑफिस मध्ये भेटले होते. ज्या दिवशी संदीप इंटरव्ह्यू द्यायला आला तेव्हा हिला रिसेप्शन वर पाहूनच घायाळ झाला. तिचे ते डोळे अक्षरशः त्याच्या काळजाला भिडले होते. त्यात तिने छान ब्लॅक कलरचा चष्मा घातला होता. त्यात अजूनही छान दिसत होती.

त्याच कंपनी मध्ये संदीप रुजू झाला आणि हळूहळू तिच्याशी मैत्री केली. मैत्री एवढी घट्ट झाली की ते सोबत यायचे, सोबत जेवायचे, सोबत घरी सुद्धा जायचे. सर्वांना असेच वाटू लागले होते की त्यांचे काही प्रेम प्रकरण चालू आहे पण त्यांनी अजूनही एकमेकांच्या भावना व्यक्तच केल्या नव्हत्या. अखेर संदीप ने पुढचा मागचा विचार न करता तिला प्रपोज केलं पण तेव्हा पूजा रडूच लागली. संदीप खरचं रे तू खूप उशीर केलास यार, मलाही तू आवडतोस पण काय आणि कसे सांगणार तुला? माझे अगोदरच घरच्यांनी लग्न ठरवले आहे.

हे ऐकुन संदीप ही रडू लागला. कारण एवढे महिने सोबत असून सुद्धा पूजा ने ह्याबद्दल काहीच सांगितले नव्हते. पण संदीपच्या प्रपोज ने पूजाला मात्र धीर आला होता. तिने त्याला मोठ्या हिंमतीने सांगितले की मी लग्नासाठी नकार देईल, कारण मलाही तू हवा आहेस. हे ऐकुन तो ही खूप खुश झाला. दिवसा मागे दिवस जात होते. दोघांचेही प्रेम अतिशय रंगात आले होते. पण अचानक एक दिवस पूजा ने संदीपला सांगितले की मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न नाही करू शकत. प्लीज तू मला विसरून जा.

आता मात्र संदीप खूप अस्वस्थ झाला. एवढ्या दिवस मी तुझ्याशी लग्न करेल असे म्हणणारी मुलगी आज का स्वतःच्या शब्दावरून पलटत आहे त्याला कळत नव्हतं. पण पूजा मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. त्याने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तिच्या मते माझ्या आई बाबाने खूप केलं आहे माझ्यासाठी त्यामुळे त्यांनी निवडलेल्या मुलासोबत लग्न करावे लागेल मला. एवढे सांगून ती तिथून निघून गेली. तिने एकदाही संदीपला मागे वळून पाहिले नाही.

त्यानंतर संदीप ने अनेक मेसेज, अनेक कॉल केले पण समोरून काहीच रिप्लाय येत नव्हता.अखेर काही दिवसांनी खबर कानी पडली की तिचे लग्न झाले. त्या दिवसापासून ते आजपर्यंत प्रत्येक दिवस त्याने विरहात काढला होता. अखेर ह्या सर्वातून तो बाहेर निघणार तेवढ्याच काही दिवसात पुजाचे घटस्फोट होतेय अशी बातमी कानावर आली. नक्की काय झाले? का झाले काहीच माहीत नव्हते. तिच्या ओळखीतल्या एका व्यक्तीला कॉन्टॅक्ट केला तर कळलं की तिच्या नवऱ्याच्या त्याच्याच भावाच्या बायको सोबत अफेयर आहे. आणि ती जसे सांगेल तसेच तो करत असे.

हिला खूप मारझोड करत. दीड वर्षाच्या त्यांच्या बाळाला पण नजरेसमोर घेत नव्हता. रोजच्या त्रासाला शेवटी कंटाळून पूजा माहेरी आलीय. संदीप हे सर्व ऐकुन खूप खुश होता. पूजा आणि संदीप दोघांनीही वेळ काढून भेटले. तो दिवस दोघांच्या आयुष्यातील खूप मोठा दिवस होता. जेव्हा समोर आले तेव्हा अर्धा तास दोघेही एकमेकाच्या मिठीत रडत होते. पण आता पूजाचे असे म्हणणं आहे की संदीप ने माझ्या मुलाला आणि तिला स्वीकारून लग्न करावे.

मित्रानो ही एक सत्यकथा आहे. आपल्याच एका वाचकाची तर तो आता संभ्रमात आहे की पुढे त्याने काय करावे? तिचा आणि तिच्या मुलाचा स्वीकार करून लग्न करावे? की आता तिला गरज आहे माझी म्हणून ती असे बोलते गरज नव्हती तेव्हा सोडून गेली. म्हणून आता त्याने पुढे काय करावे हे कमेंट मध्ये तुम्हीच सांगा.

हि पण कथा वाचा आंटी

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही. लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल