करोना सारख्या गंभीर महामारीने जगभर जणू थैमान घातले आहे. सर्व जग लॉक डाऊनमध्ये असल्याने लग्न कार्य सुद्धा स्थगित आहेत. जे लोक लग्न करत आहे ते मोजक्या चार पाच माणसांना घेऊन समारंभ पार पाडत आहेत. अशाच प्रकारचा विवाह सोहळा बिग बॉस विजेता स्पर्धक आशुतोष कौशिक ह्याने केला आहे. त्याच्या कुटुंबातील फक्त चार पाच व्यक्तींना घेऊन घरातल्या टेरेस्ट वर त्याने अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केलं आहे
महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नासाठी जो खर्च लागणार होता त्याची बचत झाली आहे. आणि हीच रक्कम आशुतोष ने पंतप्रधान निधीत मदत म्हणून दिली आहे. सहारनपूर (उत्तर प्रदेश) येथील आशुतोष रहिवाशी आहे. त्याने अलीगढ येथील अर्पिता सोबत लग्न केलं आहे. ह्या दोघांचेही लग्न २६ एप्रिल रोजी होणार होते. पण लॉक डाऊन असल्याने अनेकांनी सल्ला दिला होता की लग्न पुढे ढकला. पण आशुतोष आणि अर्पिताने आपआपसात निर्णय घेऊन लग्न ह्याच दिवशी करून होणारा खर्च दान करण्याचा निर्णय घेतला.
ह्या निर्णयाचे सर्व कडून कौतुक होत आहे. लग्न लावताना नवरा नवरीच्या घरातील मिळून फक्त ५ सदस्य आणि भटजी बुवां होते. लग्न सोशल डीस्टनसिंगचे पालन करूनच करण्यात आलं. सर्वांनी आया चेहऱ्यावर मास्क परिधान केले होते. सध्या ह्या लग्नाची इंटरनेट जोरदार चर्चा सुरु आहे.

आशुतोष कौशिक आतापर्यंत जीला गाझिया बाद, किस्मत लव पैसा दिल्ली आणि शॉर्ट कट रोमियो ह्या सारख्या चित्रपटातून आपल्या दिसला आहे. यापूर्वी त्याने रोडीज आणि बिग बॉस पर्व २ स्पर्धा जिंकली आहे.