1990 साली बॉलिवुड मधील एक चित्रपट त्याने प्रत्येक प्रेमुगुलाच्या मनावर ताबा मिळवला होता कारण त्यावेळी हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात गाणी तर सुपरडुपर हिट ठरली होती, शिवाय अजूनही ती गाणी ऐकताना हे कलाकार आपल्या डोळ्यासमोर येतात. त्या चित्रपटात हे कलाकार नवखे होते पण तरीही त्यांचा अभिनय हा खूप जास्त मुरलेला वाटत होता, आणि या सिनेमाला ही जोडी एका रात्रीत स्टार झाली. तसेच यातील लव स्टोरी वेगळी आणि प्रेक्षकांना आवडली होती.
हा चित्रपट रिलीज झालेले जवळजवळ 30 वर्षे झाले आणि हे तीस वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी हे तिघे अभिनेते म्हणजे राहुल रॉय आणि अन्नू अग्रवाल आणि दीपक तिजोरी कपिल शर्मा शो या शो मध्ये सहभागी झाले होते. इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर राहुल रॉय याने दीपक तिजोरी याला गालावर किस करून आपले प्रेम व्यक्त केले आणि एकमेकांनी दोघांना मिठी मारली. या तिन्ही मित्रानी या शो मध्ये खूप धमाल केली.
त्यावेळी आपल्या मनावर राज्य करणारे हे स्टार आता दिसायला खूप वयस्कर दिसत असले आणि तुम्ही यांना ओळखू ही शकणार नाही पण अजूनही त्यांच्यातील कलाकार जिवंत आहे हे आपल्याला राहुल रॉय याने गिटार हातात पकडून जेव्हा गाणे म्हटले तेव्हाच कळले. या कार्यक्रमांत या सिनेमातील वेगवेगळे अनुभव यांना उजाळा देण्यात आला.
आपल्या काळात हा सिनेमा सुपरहिट ठरला होता त्याचे निर्देश महेश भट्ट यांनी केले होते. यात दिसनारी अभिनेत्री अनु अग्रवाल हिला पाहून तर तुम्हाला वाटणारच नाही की ही तीच आहे म्हणून इतका बदल झाला आहे. हिने यानंतर काही चित्रपट केले पण त्यानंतर एका रोड अपघातात ती कोमात गेली आणि ती महिनाभर कोमात होती तसेच तिचा चेहरा ही खराब झाला होता पण जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा सगळं बदललं होत. त्यानंतर ती वेटलिफ्टर झाली आणि वेटलिफ्टिंग च्या कॉम्पिटिशन मध्येही तिने हिस्सा घेतला आहे.
राहुल रॉय या अभिनेत्याला ही या सिनेमा नंतर काम मिळेनासे झाले त्यानंतर ते बिग बॉस 1 मध्ये ते आपल्याला दिसले होते त्यांनी बिग बॉस ट्रॉफी ही आपल्या नावे केली होती. आजकाल ते सिनेमात छोटे मोठे रोल करताना दिसतात. दीपक तिजोरी याने कितीतरी सिनेमात काम केले आणि बहुतेक सिनेमे हिट ही झाले त्यानंतर त्यांनी डिरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.