आशा पारेख यांचा जन्म मुंबईमध्ये एका गुजराती कुटुंबात झाला. तर त्यांनी 80 हून अधिक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. यापैकी सात चित्रपटांमध्ये त्या नासिर यांच्यासोबत काम करत होत्या. 1992 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एक काळ असा होता की त्या काळी आशा पारेख या अभिनेत्रीने खूप असे हिट चित्रपट दिले होते शिवाय त्यातील गाणी ही खूप लोकांच्या अजूनही स्मरणात आहेत. आशा पारेख यांची अजूनही रसिकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. तर आपल्या या आवडत्या अभिनेत्रीने लग्न केले नाही हे तुम्हाला माहीत आहे का की या अभिनेत्रीने अजूनही लग्न का नाही केले तर हेच कारण आज आपण जाणून घेणार आहोत.

या बाबतीत सांगताना अाशा पारेख असा खुलासा करतात की त्यांनी त्यावेळी लग्न नाही केले हा त्यांचा अतिशय महत्वाचा आणि अगदी उत्तम निर्णय होता असे त्यांचे म्हणणे आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या विवाहाशी निगडित अनेक प्रश्नांची विस्तृतपणाने उत्तरे दिली. कारण मला प्रेम जेव्हा झाले तेही एका लग्न झालेल्या व्यक्तीसोबत आणि मी ही एक स्त्री आहे त्यामुळे दुसऱ्या स्त्रीचा संसार मोडणे ही चूक माझ्या हातून होणे शक्य नव्हते. आणि म्हणून मी यानंतर लग्नच करायचे नाही असा निर्णय घेतला आणि शेवट पर्यंत याच निर्णयावर ठाम राहिले. आणि शिवाय यापुढे जाऊन त्या सांगतात की, त्याकाळात काम करणाऱ्या नायिकांची अनेकदा फसवणूक होत असे.
तर दुसऱ्या बाजूला अनेक घटनांमध्ये अभिनेते आपल्या पत्नीला विसरुन दुसऱ्या नटीच्या प्रेमात पडायचे. माझ्याबाबत असे काही होऊ नये यासाठी मी एकटी राहण्याचा निर्णय घेतला. तर मित्रां नो तुम्हाला माहीत आहे का त्यांचे कोणावर प्रेम होते तर चित्रपट दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्यावर त्यांचे जीवापाड प्रेम होते. पण नासिर हुसेन यांचं लग्न अगोदरच झालेले असल्यामुळे आशा पारेख या त्यानंतर नासिर हुसेन पासून लांब राहिल्या.