Home विचार काही व्यक्तींमध्ये हे गुण आपल्याला प्रकर्षाने आढळून येतात, तुमच्यात सुद्धा नक्कीच असेल

काही व्यक्तींमध्ये हे गुण आपल्याला प्रकर्षाने आढळून येतात, तुमच्यात सुद्धा नक्कीच असेल

by Patiljee
510 views

मित्रांनो या जगात वेगवेगळ्या प्रकारची माणसे जन्माला आलेली आहेत. त्यांचा स्वभाव हा वेगळा असतो शिवाय प्रत्येक गोष्टीवर त्यांची रिऍक्शन सुध्दा वेगळी असते. आपल्यातील काही लोकं अशी असतात त्यांना भांडल्या नंतर अजिबात पश्च्याताप होत नाही तर काही लोक अशी असतात त्यांना भांडण झाल्यावर किंवा एखाद्या व्यक्तीवर राग आल्यास रडायला येते असे का असेल बरं ते आज आपण या लेखात पाहूया.

Source Google

आता बघा मित्रानो या जगात हा नियम लागू होतो तो म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणजे या जगात प्रत्येक व्यक्ती हा सारखा नसतो नाही दिसायला आणि नाही स्वभाव, म्हणजे काय तर देवाने प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे बनवले आहे. म्हणून काही लोकांना कोणत्याही गोष्टीला रडायला येत नाही तर काही लोक ही प्रत्येक गोष्टीला रडत असतात. म्हणजे टीव्ही बघताना त्यातील सीन पाहून, रडकी गाणी ऐकून, कोणत्या प्राण्यावर होणारा अत्याचार पाहून किंवा घरात काही गरजेची वस्तू न मिळाल्यामुळे रडत बसतात काही लोक तर थोड्या थोड्या गोष्टीवरून हुंदके देऊन रडतात. खर तर हा त्यांचा मुळात स्वभाव असला पाहिले. अशीच माणसे तुमच्याही आसपास असतील आणि ही लोक अशी का वागतात आज आपण हे पाहूया.

रागाची भावना ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असते काही लोक रडत बसतात जर तुम्हाला वाटत असेल राग आल्यावर रडणे ही कमकुवत लोकांचे लक्षण आहे तर हे चुकीचे आहे. शेवटी प्रत्येकाची ती राग प्रगट करण्याची भावना आहे आणि त्याला तुम्ही अडवू शकत नाही.

तर मित्रानो मनुष्याला राग आल्यावर तो भांडतो आणि रडतोही पण तो कमजोर नसतो तर ती त्याची रिअँक्शन् असते. म्हणजे रडणे ही एक फिजॉलॉजिकल रिएक्शन् आहे याला फ्लशिंग किंवा स्वेटिंग प्रकारेही बघितल जाऊ शकतं आणि म्हणून एखादा व्यक्ती राग आल्यानंतर किंवा भांडण झाल्यानंतर रडतो त्यामुळे कदाचित त्याला हलके झाल्यासारखे वाटत असेल.

काही मानसोपचार तज्ञ असे सांगतात की राग आल्यानंतर आपण रडतो कारण त्यावेळी आपल्याला दुःख झालेले असते समोरच्या व्यक्तीच्या वाईट बोलण्याने तुमच्या मनाला धक्का बस ल्यावर जर तुम्हाला रागात रडायला येत असेल तर यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. कारण रडण्याने कदाचित तुमचे मन हलके होणार असेल तर रडणे ही चांगली गोष्ट असू शकते.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल