देवाची पूजा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे मानून आपण देवापुढे रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावतो. देवाची मनोभावे उपासना करतो. तर हा दिवा आपण जेव्हा देवासमोर लावत असतो तेव्हा काही गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवायला हव्यात. मला वाटते की काही लोक नक्कीच अशा प्रकारे दिवा लावत असतील पण काहींना कदाचित हे माहीत नसेल म्हणून आज आपण ह्या गोष्टी समजून घेणार आहोत की देवापुढे दिवा कसा लावायचा ज्यामुळे तुमच्या घरात नेहमी शांतता नांदेल.

आता पहिली गोष्ट म्हणजे देवापुढे दिवा लावताना देवाच्या उजव्या बाजूला दिवा लावावा. दिवा कशासाठी लावताय तर अंधारातून आपल्याला प्रकाश दिसावा यासाठी दिवा लावला जातो.
दिवा लावताना पहिल्यांदा त्यामध्ये गावठी तुपाचा वापर करावा. बहुतेक लोक तुपाच्या ऐवजी तेलाचा वापर करतात पण ते उचित नाही जर तुम्हाला गावठी तूप मिळत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता. पण तुपामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची शक्ती असते हे लक्षात असू द्या. म्हणून गावठी तुपाचा दिवा तर देवापुढे लावायला हवा शिवाय शनिवारी शनिदेव यांच्यासाठी राईच्या तेलाचा दिवा लावावा.
दिव्याची वात ही उत्तर दिशेला असावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल. आणि तुमच्या घरात सतत कोणी आजारी पडत असेल तर दिव्याची वात ही पूर्व दिशेला असावी.
आता तुम्ही म्हणाल की देवापुढे दिवा लावावा की निरंजन? तर आताच्या काळात सर्वानाच दिवा लावणे सहज सोपे होईल कारण निरंजन ही सतत 24 तास पेटत राहायला हवी तरच निरंजन लावा.
नेहमी दिव्याची वात ही फुलवात असावी किंवा दोन वाटी एकत्र करून बनवलेली ही वात दिव्यात लावायची. शिवाय दिव्यामध्ये तूप किंवा तेल हे जास्त प्रमाणात टाकावे आणि वात थोडी जास्त वर काढावी त्यामुळे दिवा जास्त वेळ पेटता राहील.