आई कुठे काय करते आता वेगळ्या वळणावर आलेली मालिका अशा क्षणांवर येऊन ठेपली आहे जिथे कित्तेक वर्षांनी अरुंधतीच्या आयुष्यात सुख येणार आहे. पण तरीही तिला हे सुख मिळू नये असे अनिरुद्धला म्हणजे अरुंधतीच्या पाहिला नवऱ्याला वाटते. पण अस का? कारण नॉर्मल आयुष्यात जेव्हा नवरा बायकोचे घटस्फोट होते तेव्हा ते मनाने आणि नात्याने ही एकमेकांच्या पासून वेगळे होतात.
कायद्याने एकमेकांवर कोणताच अधिकार राहत नाही जरी मुल असली तरीही मग तरीही या मालिकेत असे का दाखवले आहे हा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडतो. आता या मालिकेत अरुंधती आणि अशितोष यांचे लग्न ठरले आहे. पण ते लग्न न व्हावे यासाठी अनिरुद्धची धडपड चालू आहे. तो पराकोटीचे प्रयत्न करत आहे. जेणेकरून अरुंधतीचे लग्न न व्हावे.
पत्रकारांना सांगून दमला आणि हे त्याचे कट कारस्थान घरच्यांनाही कळले. शेवटी अनिरुद्धचे बाबा म्हणजे आप्पा अनिरुद्धला खडसावून सांगतात अनुराधाचे लग्न होणार आणि ते ही इथे याच घरात आणि मांडव ही सजेल याच दारात, तुला नसेल सहन होत तर तू या घरातून जाऊ शकतोस.
आप्पांनी चांगलेच खडसावले तेव्हा अनिरुद्ध अशीतोषच्या घरी जाऊन मनाला येईल ते बोलतो तरीही आशितोष म्हणतो मी अरुंधती सोबतच लग्न करणार..
इतका वेडा झालेला नवरा अजूनपर्यंत पहिला नव्हता. अरे तुझा आता तिच्यावर काहीच अधिकार राहिला नाही तरीही तिच्यावर हक्क गाजवतो कोणतीही स्त्री हे सहन करणार नाही तरीही अरुंधती किती मूर्ख ज्या घराशी काहीही संबंध नाही त्यांचीच लग्नासाठी समती मागते, त्यात तिची ती सासू म्हणते मी अरुंधती शिवाय राहू शकत नाही, ती माझ्यापासुन दुर गेली तर मला एकट वाटेल.
अशी कोणती आई असेल ती मुलीच लग्न होऊ देत नाही कारण ती गेल्यावर आई एकटी पडेल. सासू ती सासुच असणार आहे. तिला आईची माया नसणार ती फक्त तिचा स्वार्थ साधणार. तिच्या मुलाने आणि नातवाने कितीही प्रेम प्रकरण करुदे त्यांना ती नेहमीच पाठीशी घालत आली आहे पण सुनेने लग्न करणे हा तिच्या मते गुन्हा आहे.
बघुया आता या मालिकेत पुढे काय पाहायला मिळणार अरुंधतीचे लग्न सगळ्यांच्या सहमतीने होणार की नाही? शिवाय अरुंधती आणि आशुतोष यांचे लग्न होतंय का हा एक प्रश्न चिन्ह आहे.