Home संग्रह आई एकविरा बद्दल ह्या गोष्टी माहीत नसतील

आई एकविरा बद्दल ह्या गोष्टी माहीत नसतील

by Patiljee
4173 views

देवी एकविरेचे मंदिर हे लोणावळ्याच्या कार्ला गुहांजवलील एक प्रसिद्ध मंदिर आहे. येथे येणाऱ्या भाविक भक्ताची कमी नाही. नेहमीच इथे भक्तगण आपले कोणते ना कोणते कार्य पार पाडण्यासाठी येत असतात. काही नवस बोलतात ते नवस फेडण्यासाठी लोक या ठिकाणी येऊन देवीची मनोभावे पूजा करून हा नवस फेडतात. कार्ला गडावरील हे दिवेचे स्थान आदिशक्ती असून हे एक देवीचे जागृत स्थान म्हणून प्रचलित आहे.

असे म्हणतात की हे मंदिर येथील लेण्या पेक्षा ही खूप जुने आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते काही दिवसांपूर्वी या देवीची यात्रा होती पण सध्या सर्वच भारत बंद असल्यामुळे देवीची यात्रा बंद होती.

देवीचे अवतार म्हणजे साडेतीन शक्तिपीठ यातील पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजेच आपली जागृत एकविरा आई होय. लोणावळ्यापासून १२ किलोमीटर अंतरावर कार्ला गडावर एकवीरा देवीचे स्थान आहे. येथे गेल्यावर तेथील निसर्गसौंदर्य तसेच गड किल्ले आणि लेणी आपल्याला नेहमीच भुरळ घालतात. १८६६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आल्याचे समजते, शिवाय येथे असंती लेणी ही बौद्ध कालीन लेणी आहेत. येथे डोंगरात कोरलेल्या लेणी बघण्यासारखे आहेत.

म्हणतात की पांडव जेव्हा अज्ञात वास करत होते तेव्हा त्यांना देवीने या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शन दिले होते, आणि त्या पाच पांडवांची परीक्षा घेण्यासाठी देवीने त्यांच्यापुढे एका रात्रीत मंदिर बनवण्याची इच्छा व्यक्त केली. आणि ही इच्छा पांडवांनी पूर्ण केली. यावर देवीने खुश होऊन त्यांना वरदान दिला की जोपर्यंत तुम्ही अज्ञातवास करत असाल तोपर्यंत तुम्हाला कोणी ओळखू नाही शकणार.

आगरी आणि कोळी समजाची लोक या देवीला आपली कुलदैवत मानतात. ज्या ठिकाणी या मातेचे मंदिर आहे त्या ठिकाणी लोक या देवीला अनेक नावाने ओळखतात वेहरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका ही या देवीची नावे आहेत. एकवीरा देवी म्हणजे आपली एकविरा आई ही सर्व महाराष्ट्रातील, मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, ब्राह्मण, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची कुलस्वामिनी देवी आहे. दरवर्षी नवरात्रीला या ठिकाणी येणाऱ्या लोकांची संख्या अलोट असते.

येथील ट्रस्टच्या वतीने गडावर नेहमी येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सोयी-सुविधा करण्यात आल्या आहेत. स्त्री-पुरुषांसाठी स्वच्छतागृहे, विजेची सेवा, भाविकांच्या निवास करण्यासाठी धर्मशाळा, मुबलक पाणी पुरवठा, दर्शन घेत असताना रांगेत उभे असणारे लहान मुल व वृद्ध यांना बसण्याची व्यवस्था, या आणि इतर आणखी भरपूर सोयी सुविधा येथे येणाऱ्या भाविकांसाठी करण्यात आल्या आहेत.

एकविरा आई भक्ताच्या हाकेला लगेच धाऊन येते असे म्हणतात म्हणून येथे येंत्या भक्तगणांनी या ठिकाणी अलोट गर्दी असते. नवसाला पावणाऱ्या या देवीकडे आपण आज एक मागणं मागणार आहोत या दिवसात आपल्या राज्यावर तसेच देशावर जे संकट आलेले आहे ते लवकर दूर होऊदे.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल