Home संग्रह आधार कार्ड हरवला आहे? मोबाईल नंबर रजिस्टर नाही मग घाबरु नका, करा हे काम

आधार कार्ड हरवला आहे? मोबाईल नंबर रजिस्टर नाही मग घाबरु नका, करा हे काम

by Patiljee
12719 views
आधार कार्ड

आधार कार्ड आपल्या जीवनातील एक अत्यावश्यक गोष्ट बनला आहे. काही करायचे झाले तर आधार कार्ड लागतोच लागतो. म्हणूनच आधार सांभाळून ठेवावा लागतो. पण काही कारणास्तव तुमचा आधार कार्ड हरवला किंवा खराब झाला तर आयुष्यात तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ह्याचा अनुभव तुम्हाला कधी ना कधी आलाच असेल.

तुमचा आधार कार्ड सुद्धा हरवला असेल आणि तुम्हाला परत तो प्राप्त करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला प्रोसेस सांगणार आहोत. ह्यासाठी तुम्हाला ५० रुपये खर्च होईल पण तुमचा नवीन आधार कार्ड तुमच्या घरपोच येऊन जाईल. ह्या प्रोसेस मध्ये आधार रिप्रिंट होऊन तुम्हाला मिळतो.

आधार कार्ड रिप्रिंट करण्याची काय आहे पद्धत?

आधार कार्डची ऑफिसियल वेबसाईट UIDAI ला भेट द्या. इथे माय आधार सेक्शन मध्ये जाऊन ऑर्डर आधार रिप्रिंट वर क्लिक करा. असे केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. इथे तुम्ही आधार कार्ड नंबर किंवा वर्चुअल आईडी आणि सिक्यूरिटी कोड टाका.

आधार कार्ड

तुमचा मोबाईल नंबर आधारला लिंक असेल तर ओटीपी वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओटीपी येईल. जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर रिक्वेस्ट ओटीपी ह्या ऑप्शन वर क्लिक करा. इथे तुमचा चालू नंबर टाका. असे केल्यास तुम्हाला ओटीपी तुमच्या त्या नंबरवर येईल.

ऑनलाईन घरी बसल्या फेसबुक वरून कसे पैसे कमावू शकता?

ही डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या आधार कार्डची सर्व माहिती समोर दिसेल. जर तुमचा मोबाईल रजिस्टर नसेल तर ही माहिती दिसणार नाही. पण जरी माहिती दिसली नाही तर असे होत नाही की तुम्हाला रिप्रिंट आधार कार्ड मिळणार नाही. ह्या प्रोसेस नंतर तुम्ही पेमेंट करून आधार कार्ड घरी मागवू शकता.

पेमेंट फक्त ५० रुपये आहे आणि हे पेमेंट तुम्ही नेट बँकिंग, यू पी आय, क्रेडिट डेबिट कार्ड ने सुद्धा करू शकता. पेमेंट झाल्यानंतर काहीच दिवसात तुमचा आधार कार्ड तुमच्या रजिस्टर पत्त्यावर येऊन जाईल. बाहेर कुणाला ३०० ते ५०० रुपये देण्यापेक्षा घर बसल्या तुम्ही हे काम स्वतः करू शकता.

हे आर्टिकल पण वाचा

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल