नवीन वर्ष अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपल आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे की नवीन वर्षाच्या आगमनासाठी जरी तुम्ही आनंदी असला तरी येणारे वर्ष तुमच्या खिशाला कात्री लावून नक्की जाईल. नवीन येणाऱ्या वर्षात अनेक किमतीचे भाव वाढणार आहेत. तुम्ही जर नवीन गाडी घेण्याच्या विचारात आहात तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे कारण गाड्यांच्या किमतीत वाढ होणार आहे. याचबरोबर FMCG प्रोडक्ट आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सुद्धा महागणार आहेत.
नवीन वर्षात जर तुम्ही टीव्ही खरेदी करण्याच्या विचारात आहात तर हे तुम्हाला महागडे जाऊ शकते कारण टीव्हीच्या किमतीत १५ ते १८ टक्के वाढ होण्याची दाट शक्यता सूत्रानुसार वर्तवली जात आहे. याचबरोबर उर्जा लेबलिंग मानदंड नियम २०२० मध्ये लागू होणार आहे. याअंतर्गत फाइव स्टार फ्रिज मैन्युफैक्चिरिंग कमीतकमी ६००० हजार रुपये वाढणार आहेत. सध्या भारतात मंदीचे सावट घुमत आहे अशातच वस्तू महाग झाल्याने आर्थिक व्यवस्थेवर अजुन ह्याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
रोजच्या वापरातील काही वस्तू सुद्धा महागणार आहेत. कांदा आधीच महाग झाला आहे आणि त्यात अजुन वाढ होणार आहे. त्याबरोबर लसूण सुद्धा महागणार आहे. रोजच्या आहारातील खाद्य पदार्थ सुद्धा महागणार आहेत. नेसले आणि पारले जी कंपनीने भाव न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पण पॅकेटचा आकार कमी करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

ह्याच बरोबर ऑटो सेक्टर मधील अनेक कंपन्यांनी आपल्यात गाडीच्या किमती वाढतील असे सांगून टाकले आहे. ह्यात Renault आणि Hyundai कंपनीचा समावेश आहे. ह्या कंपनीच्या मते त्यांना मागील वर्षात तोट्याला सामोरे जावे लागले म्हणून त्याच्या भरपाई साठी ह्या नवीन वर्षात किँमत वाढ होणार आहे असे सांगण्यात आले आहे.