अनलॉक एक सुरू झाला आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे १ जून पासून स्पेशल ट्रेन चालू करणार आहे. पण सध्या सर्वांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की ह्या ट्रेनचे तिकीट आम्हाला कुठे मिळेल? तर हे तिकीट तुम्हाला इंडियन रेल्वेच्या वेबसाईटवर (IRCTC) वरून ऑनलाईन घेता येईल. त्यांच्या अँप मध्ये ही तुम्ही तिकीट बुक करू शकता. रेल्वे प्लॅटफॉर्मवर तिकीट मिळेल का नाही याबाबत अजुन पुष्टी करण्यात आली नाहीये.
ज्या ट्रेन सुरु होणार आहेत त्या आरक्षित असणार आहेत. ह्यात एसी आणि नॉन एसी असे दोन्ही प्रकारचे कोच उपलब्ध असतील. साधारण कोच मध्ये बसायला सुद्धा सीट उपलब्ध असतील. महत्वाची गोष्ट म्हणजे अगोदर ह्या ट्रेन चे रिझर्व्हेशन तुम्हाला ३० दिवसाच्या आत न करता १२० दिवसाच्या आत करता येईल. फक्त रिझर्व्हेशन करताना तुम्ही कुठून ते कुठे प्रवास करणार आहात ह्याची योग्य माहिती द्यावी लागेल.
हे आहे रेल्वेचे वेळापत्रक
कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल?
- सर्व प्रवाशांनी आरोग्य सेतू अँप इंस्टॉल करून सोशल डिस्टेन्स सिंग पाळणे गरजचे आहे.
- रेल्वे तुमच्याकडून कोणत्याच प्रकारचा केटरिंग चार्ज घेणार नाही.
- ट्रेनमध्ये तुम्हाला चादर किंवा इतर गोष्टी मिळणार नाहीत.
- फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच स्टेशन जवळ आणि ट्रेन मध्ये चढण्याची परवानगी आहे.
- ज्यांचे तिकीट कन्फर्म आहे त्यांनी दिलेल्या वेळेच्या ९० मिनिटे आधी पोहोचणे.
- स्टेशन वर आल्यावर मास्क घालने बंधनकारक असेल, एंट्री आणि एक्झिट ला स्क्रिनिंग होईल.
सर्व प्रवाशी आपल्या सामानाची सुद्धा बुकिंग करू शकतात. सर्वांना त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम ट्रेन करणार आहे.