सध्या जगात चाललेल्या घटनेमुळे सर्वच लोकं घाबरून आहेत. पण आता एक महत्त्वाची घटना गुरुवार १६ मे २०२० मध्ये घडणार आहे. खुद्द निसर्ग आकाशातून हसरा स्माईली तुम्हाला दाखवणार आहे. ऐकुन तुम्हालाही धक्का बसला असेल ना? विश्वास सुद्धा बसला नसेल ना अजिबात ह्या गोष्टीवर? पण हे खरं आहे मित्रानो. १६ तारखेला हे घडणार आहे असे शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितले आहे.
२०२० वर्ष आपण नक्कीच कधी विसरणार तर नाही आहोत. पण गुरुवारी १६ मे तारखेला शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार चंद्र, शुक्र आणि जुपिटर अशा प्रकारे अंतराळात आपल्याला दिसतील की कसे आपण एक स्माईली पाहत आहोत. जणू निसर्ग आपल्याला सांगेल की दुःखी राहू नका. हे ही दिवस आयुष्यातून सरतील. फक्त धीर धरा आणि घरात रहा.
अशाच प्रकारची घटना २००८ मध्ये घडली होती. तेव्हा पण अशाच प्रकारचे स्माईली आकाशात लोकांनी पाहिले होते. ह्या घटनेला पेरेडोलिया म्हणून ओळखले जाते. पेरेडोलिया हा ग्रीक शब्द आहे. पॅरा म्हणजे दोषपूर्ण आणि डोलीया म्हणजे प्रतिमा.
१६ तारखेला खरंच हे घडणार का नाही ह्याबद्दल सुद्धा अनेकांच्या मनात उत्सुकता लागली आहे. आता ते आपल्याला १६ तारखेला अनुभवता येणार. सध्या सर्व लोकं घरात असल्याने नक्कीच त्यांना हे सर्व अनुभवता येणार आहे. त्यामुळे आम्ही तर खूप उत्सुक आहोत. तुम्ही आहात का.