माझा मुलगा आता लहान आहे जेम तेम ३ वर्षाचा असेल, थोड थोड बोलायला ही शिकला आहे हल्ली हल्ली सगळं कळायला लागलं आहे त्याला इतकं बोलतो की कधी कधी काय बोलतो तेच समजत नाही. पण तो बोलायला लागल्यावर खरंच खूप बरे वाटते मनाला एकप्रकारच समाधान मिळत. जसं सगळ्याच आई वडिलांना मिळत असेल माझ्यासाठी तो खूप प्रिय आहे. आता तुम्ही म्हणाल सगळ्यांचीच प्रिय असतात पण खरं सांगू माझं हे तिसरं मुल पहिली दोन मुल आठव्या महिन्यात गेली त्यामुळे माझ्यासाठी माझं हे बाळ काळजाचा तुकडा आहे.
हे बाळ होताना ही मला खूप त्रास सहन करावा लागला होता ते तर मी कधीच विसरले कारण आता तितका त्रास सहन करूनही माझ्या हातात माझं बाळ आहे. हल्ली तो खूप त्रास देतो म्हणजे मस्ती करतो, जेवायचे तसे काहीच नाही जेवणात झोपणार सगळं वेळेवर फक्त जास्त मस्तीखोर झालाय. मला तर माहीत आहे सगळी लहान मुले अशीच असतात त्यांना ओरडल तरी तितक्या पुरता पुन्हा त्यांचं आहे ते चालूच राहते.
त्याचे पप्पा नेहमी म्हणतात आता इतका जीव लावू नकोस त्याच लग्न झाले की तो जाईल आपल्या दोघांना सोडून पण तरीही आईची माया कधी कोणावर रुसले का? पुढे भविष्यात काहीही होऊदे पण सध्या वर्तमानात त्याला माझी गरज आहे तो माझ्याशिवाय अपूर्ण आहे आताच कशी त्यांच्यावरची माया कमी करू, शक्यच नाही. कधी आजारी असला तर मला रात्रभर झोप नाही लागत अख्खी रात्र जागी असते मी त्याच्यासाठी, कधी जात ताप उतरला तर डोळा लागतो माझा.
जेवायला त्याला सगळ्याच गोष्टी खायला आवडतात जेवल्यावर दुपारी मस्त एक झोप काढणार, टीव्ही वर कार्टून लाऊन दिल्यावर ते बघणारा रिमोची काही बटण ही माहीत झाल आहे त्याला. तसं लहान असताना कोणताच त्रास त्याने दिला नव्हता पण आता थोडा देतोय ती सहन करावा लागेल ते तर प्रत्येक आई वडिलांचे कर्तव्य आहे.
सांगण्याचा उद्देश एवढाच की लहान मुलं खेळकर असलेली चांगली वाटतात पण जसजसे त्यांचे वय वाढत जाते तसतसे त्यांच्यात बदल व्हायला सुरुवात होते. त्या बदलात आपण पण सहभागी होऊन एक वेगळाच अनुभव आपल्याला सुद्धा मिळतो. हा अनुभव तुम्ही सुद्धा अनुभवला नक्कीच असणार. सध्या लॉक डाऊन असल्याने सर्वच घरात आहेत पण ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत त्यांचा वेळ कसा जातो हे त्यांना सुद्धा कळत नाही. कारण ती दंगा मस्ती, हसणे,रडणे, आपल्याला मुलांना मुलींना जवळ घेऊन गोष्टी सांगणे, खाऊ देणे ह्या सर्वच गोष्टीचा आनंद काही वेगळाच असतो.
लेखक : पाटीलजी