Home हेल्थ सोनचाफा फायदे आणि महत्त्व

सोनचाफा फायदे आणि महत्त्व

by Patiljee
17932 views
सोनचाफा

या वेळेत तुम्हाला सोन चाफ्याची फुले बाजारात विकायला आलेली पाहायला मिळतील. ह्याचा वास लांबूनच नाकात गेल्यावर इतकं छान वाटते. ही फुले आपल्याला देताना त्याच्या पानात गुंडाळून देतात. ह्याचा रंग गडद पिवळा असतो. या फुलाचा वास खर तर आपल्याला वेड लावतो. दिसायला ही फुले अतिशय सुंदर दिसतात.

या फुलाची एक खाशियत म्हणजे याची कळी छान टवटवीत राहते. पण याचे फुल झाले की त्या पाकळ्या गळायला लागतात. ही झाडे कुठेही रुजतात म्हणजे या झाडांना कोणत्याही प्रकारचे तापमान सहन होते. म्हणजे काय तर आपल्या कोणत्याही भागात या झाडाची लागवड होऊ शकते.

सोनचाफा फायदे आणि महत्त्व

एका फुलात मिळून लहान मोठ्या अशा जवळ जवळ पंधरा ते वीस पाकळ्या असतात. ह्याची फुले घरात वासासाठी ठेवतात शिवाय हार, वेणी साठी ही फुले वापरतात. ही फुले जशी ताजी असल्यावर यांचा सुगंध येतो तसाच ही फुले सुकल्यावर ही त्यांचा सुंगंध कायम असतो.

लहान असताना शाळेत पुस्तकात ही फुले मुली जपून ठेवायच्या. तसेच काचेच्या बाटलीत याच्या काळया पाण्यासोबत तशाच्य तशा राहतात. या फुलांपासून सुगंधी तेल तयार केले जातात आणि हे तेल वेगवेगळ्या स्प्रे, साबण, अगरबत्ती यांच्यामध्ये वापरले जाते.

ही फुले छातीत होणारी जळजळ आणि मळमळ यावरही अत्यंत उपयोगी आहेत. तसेच या झाडाची पाने याचा रस ही मलमली वर उपयोगी आहे.

या झाडाची साल ही ताप आल्यावर गुणकारी म्हणून वापरली जाते.

हे आर्टिकल सुद्धा वाचा

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल