साबुदाणे आपण सहसा उपवासाला खातो. पण उपवास नसला आणि आपण खाल्ले तरी चालते. शिवाय काही लोकांना साबुदाणा खिचडी नेहमीच खायला आवडते. हीच खिचडी कमी तेलात करावी शरीरासाठी उत्तम असते. शिवाय काहींना तळलेले वडे आवडतात पण ते आपल्या शारुर्साठी पौष्टीक नाही आहेत.
साबुदाण्याच्या चिवडा ही खायला छान लागतो. शिवाय साबुदाण्याच्या पिठाचे वेगवेगळे पदार्थ घावने ही छान लागतात. साबुदाणा हा सागोपाम या झाडाच्या खोडाचा चीकपासून बनवला जातो. नंतर त्यावर वेग वेगळ्या प्रक्रिया करून मोत्या सारखा आकार दिला जातो.
साबुदाणा खाण्याचे फायदे
याचबरोबर या साबुदाणा मध्ये वेगवेगळे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. साबुदाणा यात योग्य प्रमाणत न्यूट्रिशन्स असतात याशिवाय व्हिटॅमिन्स, प्रोटीन, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स इत्यादी घटक योग्य प्रमाणात असतात. ज्यांची गरज आपल्या शरीराला असतेच.
साबुदाणा याच्या सेवनाने मिळतात आपल्या शरीराला भरपूर पोटॅशियम यामुळे तुमचे शरीर उच्च रक्तदाब संतुलित राहते. म्हणून तुम्हाला जर रक्त दाब असेल तर साबुदाणा निश्चित खा.
पोटाच्या विकारावर साबुदाणा एकदम उत्तम आहे म्हणजे गॅस, अपचन, याशिवाय तुमची पचनक्रिया ठीक नसेल तर ती ही ठीक होते त्यामुळे साबुदाणा खा.
साबुदाणा मध्ये तुम्हाला योग्य प्रमाणात कॅल्शिअम मिळते ते त्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते.
साबुदाणा खाल्ल्याने तुमच्या शरीराचे मसल्स अधिक मजबूत होतात शिवाय मसल्स जास्त प्रमाणात विकसित होतात.
साबुदाणा यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात जे नेहमीच आपल्या शरीरातील उपयोगी असतात
तुमचं वजन कमी असेल आणि वाढतच नसेल तुम्हाला ते वाढवायचे असेल तर नक्की साबुदाणा खा. यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते.
साबुदाणा आपल्या त्वचेसाठीही एकदम उत्त म आहे यात असणारे जिंक, कॉपर आणि सेलेनियमचं प्रमाण असतं. त्वचेसाठी हे तिनही घटक फायदेशीर आहेत. जिंक हे आपली नाजूक त्वचा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून हे त्वचेची सुरक्षा करतं.
संबंधित हे आर्टिकल सुद्धा वाचा
- तुमच्या शरीरात ऑक्सिजन लेव्हल कमी झाला कसे ओळखाल?
- गोकर्ण या फुलांची माहिती आणि तिचे उपयोग
- वालाचे बिरडे एक आठवण