मागील एक वर्षापासून यूट्यूबमध्ये मराठी भाषेत सर्वात चर्चेचा विषय असलेला व्यक्ती म्हणजे विनायक माळी. आपल्या आगरी भाषेतील कॉमेडीमुळे तो मराठी लोकांच्या मनात राज्य करतो. खूप कमी लोकं असतील ज्यांना विनायक माळी हे नाव परिचयाचे नसेल.
पण विनायक माळी संदर्भात एक वाईट बातमी आज समोर आली आहे. त्याला कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः त्याने आपल्या सोशल मीडियावरून ह्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. ही बातमी समोर येताच त्याचे चाहते दुःख व्यक्त करत आहेत.
अनेक चाहत्यांनी त्याला शुभेच्छा पाठवल्या आहेत. लवकर बरा होशील अशा अनेक कमेंट सुद्धा येत आहेत. त्याने केलेल्या पोस्ट मध्ये असे लिहिले आहे. “बाहेर पडू नका, बर्गर पिझ्झा खाऊ नका, बाहेरचा कोणताच पदार्थ सध्या योग्य नाही. मला कोविड ची लागण झाली आहे आणि मी एडमिट आहे आणि डॉक्टर आणि नर्स योग्य काळजी घेतात. माझा सल्युट आहे त्यांना. पण एका गोष्टीची खंत आहे की तुम्हाला व्हिडियो नाही देऊ शकलो.”

त्याच्या ह्या पोस्ट मुळे अनेक लोक तू लवकर बरा हो, आमचे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे लोकं कमेंट करत आहेत. काहीच दिवसापूर्वी उरण इथे त्याच्या नवीन व्हिडियोचे शूट झाले. काही दिवस तो तिथेच राहत होता.
विनायक माळी ह्याला कधी आणि कशी लागण झाली ह्याबाबत अजून कोणतीच माहिती समोर आली नाहीये. सध्या विनायक माळीच्या यूट्यूब चॅनलवर ११ लाख ८ हजार सभासद जोडले गेले आहेत. मराठी मध्ये त्याचे यूट्यूब चॅनल सर्वात अग्रेसर आहे. तो लवकरच बरा होऊन घरी येईल आणि पुन्हा एकदा आपल्याला मनमुराद हसवेल हीच देवाजवळ प्राथर्ना करूया.
विनायक माळी १० लाख सभासद पूर्ण