Home Uncategorized संभोग चांगलं की वाईट?

संभोग चांगलं की वाईट?

by Patiljee
18544 views
संभोग

नवरा बायको सोबत संभोग करतात आणि करून झाल्यावर बाजूला होतात म्हणजे तो मुद्दाम संभोग संपवत नसतात. लग्नानंतरचे बरेच संभोग हे संतती प्राप्त करण्यासाठी केले जातात. हे लक्षात घ्या. संभोग करताना लाज असणे, मर्यादा असणे तितकेच महत्वाचे आहे. जर पुरुष असेल किंवा स्त्री असेल मर्यादे पेक्षा जास्त त्या गोष्टीचा हव्यास करत असेल तर ती किंवा तो कधीच तृप्त होऊ शकत नाही. आणि नवरा बायको मध्ये वर्षानुवर्षे संभोग होत असेल तर त्यात नक्कीच आकर्षण कमी होत असतं.

पण या उलट जर परका पुरुष किंवा स्त्री संभोग करण्यासाठी असेल तर नक्कीच आकर्षण जास्त असेल. सहाजिकच नवीन गोष्टी मध्ये कुतूहल असतं. पण तोपर्यंतच जोपर्यत त्यात नावीन्य असेल. म्हणून नवरा किंवा बायको हि शारीरिक भूक भागवणारी मशीन नाहीये. नवऱ्याने किंवा बायकोने आपली वासना नियंत्रित ठेवली पाहिजे. कारण आपला जोडीदार आपल्यासाठी वेळोवेळी खूप काही करत असतात.

आपला एक निर्णय आपल्या जोडीदारासोबत आपण विश्वासघात करण्यास भाग पाडतो. माणसाची गरज कधी संपत नसते किंवा पूर्ण होत असते. गरजेची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील राहिलात तर हाव वाढते. निसर्गाचा नियम आहे, पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रा संभोग फक्त संतती प्राप्ती करण्यासाठी करतात. शिवाय मनुष्य त्यात आनंद शोधतो. गरज म्हणून जोडीदार सोडून संभोग करू नका हे चुकीचे आहे. जोडीदाराला आपल्या आवडी निवडीनुसार समजून उमजून सहमतीने एकमेकात संभोग करा.

संभोग वाईट नाहीये फक्त मनुष्याने त्याच्या वाटा आपापल्या मनानुसार बदलल्या आहेत, ते चुकीचं आहे. मन तृप्त होत नाही म्हणून तुम्ही बाहेर मन तृप्तीचे साधन शोधता आणि मग इथेच तुमच्या आयुष्याला वेगळं वळण मिळते, काही कारणास्तव जोडीदारासोबत योग्य मनासारखे संभोग मिळत नसेल तर ते का मिळत नाही किंवा कसे मिळू शकते ह्याकडे लक्ष द्या, ह्या छोट्याश्या गोष्टीसाठी तुम्ही बाहेर संभोग शोधून तुम्ही स्वतः चा आणि तुमच्या जोडीदाराचा विश्वासघात करत आहेत. हि गोष्ट स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू पडते. त्यामुळे तुमच्या गरजा सीमित ठेवा.

ह्या पण माझ्या काही निवडक कथा वाचा

पाटीलजी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल