Home कथा श्वास एक विचित्र अनुभव

श्वास एक विचित्र अनुभव

by Patiljee
35808 views
श्वास

यंदा खूप महिन्यांनी माहेरी गणपती साठी चालले होते, गणपतीला जाण्यापूर्वी कमालीची उस्त्तुक्ता होतीच. शिवाय व्हायरस लॉक डाऊन मुळे कित्तेक महिने घरात बसून माहेरच्या लोकांशी फक्त व्हिडिओ चाटवर बोलायचे त्यामुळे भेटायची उत्सुकता अधिक होतीच. आता गणपती साठी जायचे म्हणून काही समान तर न्यावे लागेल मी नवऱ्या सोबत मार्केटला गेले मार्केट मध्ये फळं, हार, कंठी, अगरबत्ती, धूप, कपूर इत्यादी सर्व वस्तू ज्या ज्या बाप्पा साठी लागतात त्या सर्व घेतल्या.

मार्केटला सुध्दा आम्ही एकत्र आज कित्तेक दिवसातून म्हणजे कोरोना चालू झाल्यापासून पहिल्यांदा गेलो होतो. जाताना तोंडाला मास्क शिवाय हातात हॅण्डग्लोव ही घातले होते. इतकं सर्व प्रोटेक्शन का घेतले ते तुम्हाला माहीतच आहे. इतकं सगळं झाल्यानंतर दिवस उजाडला तो घरी जाण्याचा शुक्रवारी नवरा कामावरून आल्यावर आम्ही संध्याकाळी घरी जायचे ठरवले. घरी जायला आम्हाला खूप संध्याकाळ झाली मस्त जेवण केले गप्पा मारल्या, मखर बनवला आणि झोपलो उद्या सकाळी लवकर उठायचे होते.

सकाळी लवकर उठून गणपतीची सर्व तयारी आम्हाला करावी लागली. मला आणि माझ्या नवऱ्याला कारण माझ्या माहेरी माझी चुलत आजी वारली होती आणि त्यांना सुतक लागले होते. सकाळी मोदक वगैरे बनवून जेवण झाले. संध्याकाळी ही सर्व काही मजेत झाले जेवण, रात्री घरातील सर्वजण पत्ते खेळण्यासाठी बसले होते, भावजय ने मस्त भुईमुगाच्या शेंगा उकडल्या होत्या. रात्री उशिरा आम्ही शेंगा खाल्या आणि वरून चहा ही घेतला झोपायला रात्री खूप उशीर झाला. रात्र मस्त गेली कुटुंबासोबत हसत खेळत.

दुसऱ्या दिवशी गणपती जाणार कारण आमच्या घरी दिढ दिवसाचा गणपती असतो. म्हणून पुन्हा उठून सर्व तयारी पण या दिवशी सकाळीच माझ्या घशात दुखायला लागले श्वास घ्यायला मला त्रास व्हायला लागला. आता काय करू सर्व तर झोपले होते. राहून राहून मनात नको नको ते विचार यायला लागले. मला कोरोना तर झाला नाही ना? झाला असेल तर माझ्यामुळे माझ्या सर्व घरातल्यांना ही त्याचे इन्फेक्शन तर झाले नसेल ना?

पण मी त्या दिवशी मार्केट मध्ये सेफ्टी तर घेतली होती पण तरीही नक्की कुठेतरी काही चुकले माझे ज्यामुळे मला आता कोरोना झालाय ही भीती मनात निश्चित झाली. पण मला फक्त श्वास घेतला घशा मध्ये दुखत होते बाकी थकवा , ताप, खोकला यांपैकी अजुन कोणतेच लक्षण नव्हते. तरीही माझ्या मनात या शंकेने घर केले की मला कोरोना झाला आहे.

सकाळी घरातल्या सर्वांना उठवले आणि सांगितले पण घरातले घाबरले नाहीत ते सर्व मला धीर देत होते, काही झाले नाही काहीतरी वेगळा प्रोब्लेम असे.ल असे सर्वांचे मत होते. मी कोणाला माझ्याजवळ फिरकू देत नव्हते, स्वतला एकटे पडण्याच्या प्रयत्नात होते, बेडरूम मध्ये बसले पण तरीही माझ्या घरातल्यांनी मला एकटे पडू दिले नाही. ते मला धीर द्यायचे म्हणायचे काही झाले नाही उगाच टेन्शन घेतेस. माझा तीन वर्षाचा मुलगा त्यालाही मी जवळ घेतले नाही. माझ्या भावजय ने काढा बनवून दिला बहिणीने ही पाणी गरम करून दिले वाफारा घेण्यासाठी माझे सर्व घरगुती उपाय चालूच होते.

नवरा बोलला बघू आजच्या दिवशी मग उद्या जाऊ हॉस्पिटल मध्ये पण मला चैन पडत नव्हते. मला श्वास घेण्यास त्रास होत होता. असे करता करता संध्याकाळ झाली माझी तब्बेत अजिबात सुधारली नाही इतकं बघितल्यावर माझ्या नवऱ्याने त्यांचा डॉक्टर मित्राला फोन केला आणि माझी सर्व हकीकत सांगितली. तो डॉक्टर बोलला ते ऐकुन मी हैराण झाले तो म्हणाला रात्री जागरण झाले आहे ना? नवरा म्हणाला हो त्यामुळे च अॅसिदिटी झाली असेल. ते तुझ्या सारखं हा १४ वा फोन आहे. त्याने गोळ्यांची लिस्ट पाठवली गोळ्या घेतल्या आणि खरंच मला एकदम पहिल्या सारखे बरे वाटायला लागले.

तुम्हाला ही अशा काही समस्या असतील तर अजिबात घाबरु नका. तुमच्या जवळच्या डॉक्टरांना अगोदर भेट द्या काही तरी वेगळा प्रोब्लेम ही असू शकतो. सर्दी खोकला हे आजार आपल्याला नेहमीच होत आले आहेत त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका बिनधास्त राहा, प्रतिकार शक्ती वाढवा. श्वास आणि पुढील घडलेले नाट्य हे मी अनुभवले आहे त्यामुळे तुम्हाला सांगत आहे.

दर्शना पाटील

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल