Home संग्रह श्रावण महिना का विशेष मानला जातो?

श्रावण महिना का विशेष मानला जातो?

by Patiljee
4158 views
श्रावण महिना

श्रावण महिना म्हणजे हिंदू धर्मात या महिन्याला विशिष्ठ स्थान आहे. या महिन्यात देवांची उपासना करणे तसेच उपास करणे गरजेचे तसेच पोथी पुस्तके वाचली जातात. या महिन्याच्या सुरुवाती पासून आपल्या सणांना सुरुवात होते. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला पाच दिवसांनी नाग पंचमी हा सण येतो आणि प्रत्येक सण हा आपल्यासाठी महत्वाचा असतो. मग तो छोटा असो की मोठा.

श्रावण महिना आणि सण

श्रावण महिना

नागपंचमी या दिवशी घरातील स्त्रिया आधीच्या काळी वारुळावर जाऊन पूजा करायच्या पण आता घरीच पूजा करतात. एक नागाची मूर्ती घेऊन त्याची पूजा करतात. पाटावर तांदळाचे सात शेपटी तुटलेले साप काढतात. नंतर येतो श्रावणातील पहिला सोमवार या वारी घरातील सर्व जण उपास पकडतात. स्त्रिया शंकराच्या मंदिरात जातात देवाला बेल आणि फुल मोठ्या भक्ती भावाने वाहतात आणि संध्याकाळी लवकर गोड जेवण करून उपास सोडले जाते.

नारळी पौर्णिमा हा सण तसा आपले कोळी बांधव मोठ्या थाटात साजरा करतात. यात ते समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. याचं दिवशी अजुन एक सण असतो तो म्हणजे रक्षाबंधन. प्रत्येक बहिण भावाच्या अतूट नात्याचा सन असतो हा, बहिण या दिवशी भावाच्या हातात राखी बांधते. मी आयुष्यभर तुझे रक्षण करेल असे त्यामागचे कारण असते. दोघं एकमेकांना काही भेटवस्तू देतात मिठाई भरवतात खूप आनंदाचा असतो हा सण.

त्यानंतर येतो तो सण म्हणजे गोकुळाष्टमी. श्रावण बद्ध अष्टमी म्हणजेच तिला गोकुळाष्टमी असे म्हणतात. विष्णु देवाने आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्ण देवाचा अवतार घेतला. याच दिवशी श्री कृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला हा सण आजूबाजूचे गावातील सर्व गोपाळ एकत्र येऊन हंडी फोडतात आणि साजरा करतात.

बैल पोळा हा सण ही आपल्या महराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात केला जाणारा सण आहे. पण आपल्या इकडे या दिवशी पिठोरी अमावस्या साजरी केली जाते. या दिवशी अमावस्या असते काही लोकच या पिठोरीची पूजा मोठ्या भक्ती भावाने करतात. आपण सर्वच हे श्रावण महिना आणि त्यात येणारे सण मोठ्या उत्साहात साजरे करतो.

हे पण आर्टिकल वाचा

भोळेनाथाला वाहिला जाणारा बेल आपल्या आयुष्यात पहा किती महत्वाचा असतो

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल