शेंगदाणे म्हणजे अगदी सर्वच लोकांच्या आहारात येणारा पदार्थ, याच्यामुळे पदार्थाला मस्त चव तर येतेच पण पदार्थ जात जास्त तिखट झाला असेल तर थोडासा शेंगदाण्याच्या कूट मिसळा. शेंगदाणा साबुदाण्याच्या खिचडी मध्ये टाकतो शिवाय वडापाव मध्ये लागणारी शेंगदाणा चटणी एकदम झकास लागते.
त्याचप्रमाणे उपवासाला शेगदाण्याचे लाडू शेंगदाण्याच्या उसळ हे तर आलेच. शेंगदाणा चिक्की तर सर्वानाच आवडते असा हा शेंगदाणा आपल्या अन्नपदार्थांचे चव तर वाढवते पण आपल्या शरीराला याचे किती उपयोग आहेत हे मात्र तुम्हाला माहीत नसतील.
शेंगदाणा खाण्याचे फायदे
शेंगण्या मध्ये आयर्न, कॅल्शिअम, झिंक, फोलेट, नियासिन यांचा उत्तम स्रोत आहे. शिवाय प्रोटीन यामध्ये सर्वाधिक प्रमाणात असते म्हणजे मांस पेक्षा ही जास्त असते.

शेंगदाणा पासून तेल निघते हे सर्वानाच माहीत आहे. म्हणजे यात तेलाचा अंश आहे. त्यामुळे कच्चे शेंगदाणे नेहमी चाऊन रोज खावे. यामुळे बद्ध कोस्टता ही निघून जाते. शिवाय पोटातील आजार म्हणजे गॅस आणि एसिडीटी पासून सुटका मिळते.
शेंगदाणे खाल्याने फुस्फिस मजबूत होतात शिवाय गर्भवती महिलांनी शेंगदाणे खाल्लेले अगदीच उत्तम मानले जाते. यामुळे पोटातील बाळाचां विकास चांगल्या प्रकारे होतो
जेवल्यानंतर रोज थोडे शेंगदाणे चावत बसा यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील कमतरता दूर होते.
शिवाय शेंगदाणे खाल्याने हृदयाचे आजार कमी होतात कोलेस्टेरॉलची मात्रा घटते. शिवाय कॅल्शिअमची कमतरता ही शेंगदाणे खाल्याने भरून निघते.
थंडीच्या दिवसात जर तुमची सांधेदुखीचा त्रास होत असेल अशा वेळी शेंगदाणे आणि गूळ खा.
हे पण वाचा