वांगी ही भाजी फळभाजी म्हणून ओळखली जाते. या भाजीला तशी स्वतःची खास अशी चव नसते. पण चांगल्या मसाल्यात शिजल्यावर ही भाजी खायलाही तितकीच चवदार लागते. नुसती खायला आवडतं नसेल तर कोणत्याही कडधान्य मध्ये तसेच मच्छी मध्ये वांग्याच्या भाजीच्या फोडी करून टाका छान लागतात.
वांग्याची भजी ही छान लागतात. बटाटा भाजी सारखेच बनवायचे. वांग्याचे भरीत तर सर्वानाच माहित आहे भाकरी सोबत छान लागते. तसेच नुसती वांग्याची भाजी त्यात बटाटा कापून कांदा,लसूण आणि मिरची फोडणीला टाकून ही भाजी वाफेवर शिजवून छान लागते.
वांग्याची भाजी खाण्याचे फायदे

वांग्यामधी भरपूर प्रमाणात फायबर असते. तसेच याच्यामध्ये कॅलरीज खूपच कमी प्रमाणात असतात ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी उत्तम आहेत. कारण त्यात फॅट ही खूपच कमी असते.
ज्यांना मुतखडा आजार आहे अशा लोकांनी वांगी खाणे टाळावे.
वांग्यामधे मँगॅनीज हे खनिज मुबलक प्रमाणत असते.
वांगी खाल्याने तुमच्या ह्रदयचे आरोग्य उत्तम राहते तसेच पोटाचे आरोग्य म्हणजे पचनसंस्थेचे आरोग्य ही उत्तम राहते.
वांग्यात आढळणाऱ्या घटकामुळे ते खाल्ल्याने कॅन्सर या घातक रोगां पासून लांब राहू शकतो.
वांग्याची भाजी खाण्याचे एवढे फायदे तुम्हाला ह्या आधी माहित होते का? आम्हाला नक्की कळवा. आरोग्यविषयक असेच अजून आर्टिकल वाचा.
- अळूची वडी तिच्यात असणारे गुणधर्म वाचा, नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे
- लसूण खाण्याचे हे अगणित फायदे वाचून तुम्ही रोज लसूण खाल. वाचा