मित्रांनो पावसाळा सुरू झाला की खरे आकर्षण असते ते म्हणजे रानभाज्या. या रानभाज्या डोंगरात, रानात, शेतात अशा ठिकाणी मिळतात. कष्ट तर आहेतच ह्या भाज्या काढण्यासाठी पण ह्या भाज्या तितक्यात चविष्ट आणि पौष्टीक ही आहे. गावा ठिकाणी या भाज्या भरपूर मिळतात पण शहरात मात्र भेटतीलच अशा नाहीत.
तर बघुया कोणकोणत्या भाज्या आहेत ज्या वर्षातून एकदा म्हणजे पावसाळ्यात खायला मिळतात. महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहीत आहे का? या भाज्या नैसर्गिकरित्या उगवतात .त्यासाठी कोणत्याही प्रकारे खत किंवा रासायनिक औषधांचा वापर होत नाही. त्यामुळे या भाज्या आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम आहेत हे नक्की.
रानभाज्या
भारंगी
ही भाजी रानावनात, जंगलात, नदीच्या किनाऱ्यावर तसेच शेतात ही भाजी उगवलेली असते. चवीला थोडी कडसर असते. पण या भाजीची चव एकदा घेतली तर पुन्हा खायची ईच्छा होते. चटणी लावून ही भाजी छान लागते. तसेच या भाजीत वालाचे दाने उकडून टाकायचे खायला चवदार लागते.
कवठ / अळंबी
ही एक मशरूम म्हणजे अळंबीच्या जातीतील भाजी आहे. दिसायला ही अळंबी सारखीच असते. लहानपणी तिला कुत्र्याची छत्री म्हणून बोलायचो पण ही भाजी चवीला इतकी छान लागते ना की एकदा खाल्ली की पुन्हा खावीशी वाटणारी ही भाजी फक्त पावसाळ्यात खायला मिळते. ह्या भाजीचा रंग पांढरा असतो.
तेरीची भाजी
तेरीची भाजी सर्वानाच माहित आहे. मोठी सुपासारखी पाने याच वर्गातील अळूची भाजी तिची वडी बनवतात. तेरी भाजी बारीक कापून वालाच्या बिरड्यामध्ये कोकम टाकून छान लागते.
कंटोलीची भाजी
दिसायला ही भाजी जरी कारल्या सारखी दिसत असली तरी तिची चव वेगळी असते. वरून कारल्या सारखे काटे असतात. पण चवीला छान असते. थोडी कडवट चव असते कांदा लसूण मिरची घालून तव्यावर वाफेवर शिजवावी ही भाजी खाल्यामुळे पोट साफ होते, यकृतासाठी उपयुक्त, मधुमेह आणि मुळव्याधीवर गुणकारी असते.
कुलुची भाजी
पावसाळ्याच्या अगदी पहिल्या सरीनंतर कुलुची भाजी रानोमाळ दिसू लागते.
कुरडू
डोंगराळ भागात, रानात , शेतात ही भाजी सर्रास पाहायला मिळते. दिसायला ही जरा माठाच्या भाजी सारखी असते तिच्यावर मध्ये मध्ये लालसर रेषा असतात. पावसाच्या सुरवातीला ह्या भाजीची कोवळी पाने भाजीसाठी घेतात. या भाजीच्या सेवनामुळे युरीनच्या समस्या कमी होतात. कफप्रवृत्तीच्या लोकांनी पावसाळ्यात कुरडूची भाजी जरूर खावी. कारण या भाजीमध्ये जुनाट खोकला अथवा कफ कमी करण्याचे सामर्थ्य असते.
टाकळ्याची भाजी
ही भाजी दिसायला अगदी मेथीच्या भाजी सारखी असते. पानांचां आकार गोलाकार असतो. या भाजीची ही कोवळी पाने भाजीसाठी घेतात. आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशी ही भाजी आहे. टाकळ्याची भाजी उष्ण असल्याने तिच्या सेवनाने वात आणि कफदोष कमी होतो. चवीला थोडी तुरट असते.
दिंडा
पावसाळ्याच्या पहिल्या सरींबरोबर या रानभाजीला कोंब फुटू लागतात. या भाजीची पूर्ण वाढ होण्याआधी तिचे कोंब खुडले जाते. या कोंबाची भाजी केली जाते.
ह्या सर्व रान भाज्यांपैकी तुम्ही कोणती कोणती भाजी खाली आहे आम्हाला नक्की कळवा. हे पण वाचा कोरफड या आरोग्यवर्धक झाडाचे एक तरी रोप घरी असावे, वाचा थक्क करणारी कारणे