मधुमालती या झाडांची वेळ तुम्हाला माहीतच असेल. लांब देठ असणारी ही फुले यांची एकमेकांत गुंतून वेणी किंवा गजरे बनवले जातात. देठ हिरवे पण फुले गुलाबी तसेच पांढऱ्या रंगाची असतात यांना एक प्रकारचा सुगंध असते. कुठेही वाढणारी ही वेल कुठेही सोडली तरी भरपूर पसरते.
या झाडाला वाढ खूप असते. या वेलीला वर्षभर फुलांचे गुच्छ लागलेले असतात. त्यामुळे याने तुमची गॅलरी आणि अंगण आणखी सुंदर दिसते. या फुलांची जादू बघा कशी असते ती फुल उमल्यावर त्यांना पांढरा रंग असतो नंतर गुलाबी रंग होतो आणि तिसऱ्या दिवशी अगदी गडद लाल रंगाची होतात.
मधुमालती या झाडाची साल ही कडू असते. म्हणून तिचा उपयोग किडे आणि डास मारण्यासाठी होतो तसेच पाने ही सुद्धा चवीला कडूच असतात.

मधुमालती या झाडाची पाने वाटायची आणि तिचा रस काढायचा हा रस खरूज झाली असेल तर त्यावर लावा त्या खरूज मध्ये असणारे किड मरून जाते.
अस्थमा यावर या पानाचा रस हा गुणकारी आहे .
तसेच तुमच्या गुडघ्यांना सूज आली असेल तर त्यावर ही या पानाचा रस हा गुणकारी आहे.
सर्दी आणि खोकला झाला असेल तर लवंग, तुळशीची पाने आणि मधुमालातीची पाने घेऊन काढा बनवा हा काढा घ्या.
याच्या पानाचा किंवा फुलाचा रस मधुमेह यावर ही उपयोगी आहे
याच्या फुलांचा काढा हा दात दुखीवर उपयोगी आहे.
हे सुद्धा वाचा
- तीन ऋतु आहेत या तिन्ही ऋतु मध्ये तुमचा आहार कसा असावा?
- दररोज चालण्याचे फायदे
- पारिजात त्याला पार्वती आणि प्राजक्ताची फुले असेही म्हणतात
- निलगिरीच्या झाडाचे महत्त्व