Home हेल्थ भेंडीची भाजी खाण्याचे फायदे

भेंडीची भाजी खाण्याचे फायदे

by Patiljee
8506 views
भेंडीची भाजी

भेंडीची भाजी तशी बऱ्याच जणांना आवडते तर काही जणांना आवडत ही नाही ही भाजी स्वभावाला तशी चिकटच असते पण योग्य पद्धतीने केल्यास ती चिकट लागत नाही. चिकट होऊ नये पहिल्यांदा ती भाजून घ्यावी. पण त्या अगोदर ती धुवून चांगली फडक्याने पुसून घ्यावी.

अजिबात पाणी ठेऊ नये, त्यामुळे तिचा चिकटपणा कमी होतो. भेंडीची भाजी कशी करायची हे तर सर्वानाच माहित आहे पण या भाजीत असणारे औषधी गुण आपल्याला माहीत नसतील माहिती करून घ्या आणि खा भेंडीची भाजी.

भेंडीची भाजी खाण्याचे फायदे

भेंडीची भाजी नियमित खा याच्यामुळे आपल्या शरीरात असे काही घटक मिळतात ज्यामुळे कॅन्सर सारख्या आजारापासून आपले रक्षण होते. शिवाय ही भाजी खाल्यामुळे आपल्या शरीरातील हानिकारक घटक ही बाहेर टाकले जातात.

भेंडीची भाजी

भेंडीची भाजी ही प्रोटीनने भरपूर असते. त्यामुळे बघा भेंडीची भाजी किती लाभदायक आहे.

भेंड्याच्या भाजीत प्रामुख्याने हे महत्त्वाचे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. कार्बो हायद्रेड, कॅल्शिअम, फिस्परास, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम यांसारखे घटक आहेत.

या भेंड्याच्या भाजीत असते फायबर यामुळे मधुमेह रोग्यांच्या शरीरातील साखर कंट्रोल मध्ये राहते. त्याचप्रकारे यात असणारे पॅक्टीन हे घटक तुमच्या शरीरातील कोलेस्टरॉलला नियंत्रित ठेवते त्यामुळे तुम्हाला हृदय रोगाचा धोका कमी होतो.

भेंड्याच्या भाजीत सी जीवनसत्व असते. त्यामुळे तुमच्यामध्ये शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण करायचे काम करते.

भेंड्याच्या भाजीत असते लोह तुमच्यातील रक्ताची कमतरता भरून काढते.

कॅल्शियम असल्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते.

गरोदरपणामद्ये भेंडीची भाजी खाणे अतिशय गरजेचे आहे यामुळे तुमच्या गर्भाच्या मस्तिकची वाढ उत्तम प्रकारे होते.

हे पण वाचा कोथिंबीर खाल्याने मिळतात अगणित फायदे बघा कोणते आहेत ते

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल