Home कथा बस मधील ती सिट

बस मधील ती सिट

by Patiljee
10590 views

गावी बायकोची तब्बेत अचानक बिघडल्याने मी शहरातून निघालो. पनवेल बसस्टॉपवरून रात्रीची कोकणाकडे जाणारी शेवटची बस ११.३० ला लागली होती. एवढ्या रात्रीही बस मध्ये खूप गर्दी होती. मी कसेतरी इकडे तिकडे हातपाय मारत वर चढलो. शेवटच्या सिटवर नजर टाकली तर एक सिट खाली होती. मी लगबगीने जाऊन सिटवर कब्जा मिळवला. बाजूलाच बसलेल्या इसमाने लगेच टोकत मला विचारले. कुठे चाललेय स्वारी? ना ओळख ना पाळख आणि अचानक असा आलेला समोरून प्रश्न पाहून मी थोडा गोंधळलो. मी थोडा विचार करत बोललो गावी चाललोय.

Horror story

बस सुरू झाली होती. रातकिड्यांचा आवाज कानी पडत होता. रात्रीचा प्रवास मी आजवर कधी केला नव्हता म्हणजे तसा करायचो पण कामावरून घरी इतकचं पण आज पहिल्यांदा मी हा प्रवास अनुभवत होतो, तो ही लांब पल्ल्याचा. वातावरणात थंडी, सर्व आजूबाजूचे लोक आप आपल्या कामात व्यस्त, कुणी मोबाईल घेऊन त्याच्या स्क्रीन वर बोटे फिरवत होते तरी कुणी पुस्तक वाचून आपला वेळ काढत होते. पण माझ्या बाजूला बसलेला इसम मात्र माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. म्हणजे बोलत तर तोच होता मी फक्त ऐकत होतो.

अशक्य ही शक्य करतील स्वामी

पण अचानक बोलता बोलता त्याने नकळत माझ्या मनात एक भीती टाकली. श्रीमान तुम्ही ज्या सिटवर बसला आहात ना ह्या सिटवर रात्री प्रवास करताना कुणीच बसत नाही. आजवर मी बऱ्याचदा ह्या ११.३० च्या बसने प्रवास केला आहे पण ही सिट नेहमी रिकामी असते. तुम्ही बऱ्याच महिन्यांनी मला असे भेटलात जे ह्या सिटवर बसलात. मी गोंधळून गेलो. नक्की काय आहे ह्या सिटमध्ये असे शंकेच्या भावनेने त्या इसमाला विचारले.

अरे श्रीमान ह्या रात्रीच्या बसवर यशोमतीचा प्रभाव आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर भूत, आत्मा किंवा तुम्हाला काय समजायचे ते समजू शकता. ह्या यशोमतीला खूप लोक घाबरतात म्हणून इथे कुणी बसत नाही. ती कधी पक्षी, प्राणी तर कधी माणसाचे रूप सुद्धा धारण करू शकते. असे सांगून तो इसम जोरात हसू लागला. अरे श्रीमान तुम्ही तर घाबरलात मी सुद्धा बऱ्याच वेळा ह्या बसने प्रवास केला आहे. कधी काहीच दिसले नाही. अफवा आहेत हो सर्व, दुसरं काय.

खरतर भूत प्रेत अशा गोष्टींवर माझा विश्वास कधी नव्हताच मुळात, शाळेत असताना देखील बऱ्याच वेळा एकटा रानात जाऊन रात्र रात्र काढत असायचो. पण आता मनात थोडी का होईना शंका निर्माण झाली होती. रात्रीचे १२ वाजले होते अचानक ड्रायव्हरने गाडीचा ब्रेक मारला आणि माझं डोकं समोरच्या सीटवर आपटले. मी डोकं चोळत आजूबाजूला नजर टाकली तर मला घाम फुटला. आजूबाजूला बसमध्ये कुणीच नव्हतं. माझ्या बाजूला बसलेला इसम सुद्धा गायब होता. आजूबाजूला चित्र विचित्र आवाज कानी येत होते. अचानक संपूर्ण बस मध्ये घान वास यायला लागला इतका की माझा श्वास गुदमरला लागला.

मी समोर पाहिले तर ड्रायव्हर सिटवर एक महिला बस चालवत होती. ती माझ्याकडे रागाने बघत आहे. तिच गाडी चालवत होती, पण फक्त हाताने तिची नजर आणि मुंडी माझ्याकडे बघत होती. हे कसं शक्य आहे मला काहीच कळत नव्हतं. ती लांबूनच दिसायला फारच भयानक दिसत होती. डोळ्यांमध्ये फक्त पांढऱ्या रागाचे गोळे होते. हळूहळू चालत चालत माझ्याकडे येऊ लागली. तीच संपूर्ण अंगातून रक्त गळत होते ते ही काळया रंगाचे होते. त्यातून किडे बाहेर पडत होते इतका भयानक अवतार आजपर्यंत कधीच पहिला नव्हता. ती जशी जवळ येत होती वास अतिशय तीव्र होत होता. म्हणतात की हडलीचे पाय उलटे असतात. मी तिचेही पाय पाहिले तर उलटे होते. ती उलट्या पावलाने माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिने तिचा डावा हात पुढे केला. त्या हाताची नखे धारदार आणि लांबसडक होती. किती किळसवाणे हसत होती ती, वाटलं आता ती मला आता मारून टाकणार म्हणून माझ्या तोंडातून जोरात शब्द बाहेर पडले. वाचवा….. आणि अचानक मी झोपेतून जागा झालो. माझ्या बाजूच्या इसमाने लगेच म्हटले वाईट स्वप्न पाहिलं का श्रीमान?

कुंडली दोष

माझा चेहरा पूर्णतः घामाने भिजला होता, शरीराची काही वेगळी अवस्था नव्हती. मला पाहून त्या इसमाने म्हटले तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगू श्रीमान, लोक असेही सांगतात की जो ह्या सिटवर बसतो ना त्यांना यशोमती तिच्या घरी घेऊन जाते. घरी नेऊन त्यांना जेवण देते मग त्यांनाच खाऊन टाकते. एवढे बोलून तो जोरात हसू लागला. मी त्याच्या ह्या शब्दांनी घाबरलो तर होतो पण त्याला असे वाटतं होते की माझी फिरकी घेतोय.

माझा स्टॉप आला, गाडी पाच मिनिटे स्टॉपवर थांबणार होती. मी गाडीतून खाली उतरून सुटकेचा निःश्वास टाकला. थोडा पुढे जाताच कळलं मोबाईल तर मी गाडीतच विसरलो. पुन्हा गाडीकडे वळलो. तिथे जाऊन पाहिले तर जिथे मी बसलो होतो तिथे गर्दी जमा झाली होती. मी त्या गर्दीतना डोकावून पाहिले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. सिटवर माझा मृतदेह पडला होता. मी काही विचार करणार एवढ्यात माझ्या कानामागून एक आवाज आला आता.. घरी.. जाउया..का.. श्रीमान..?

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

कथानक काल्पनिक आहे, जीवित अथवा मृत व्यक्तीशी, स्थळांशी त्याचा काही एक संबंध नाहीये.

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल