पायातील टाचांना भेगा जातात हे तुम्हाला आम्हाला माहितीच आहे. खास करून स्त्रियांना हा त्रास उद्भवतो. आज आपण पाहणार आहोत ह्यावरील काही घरगुती उपाय.
फाटलेल्या टाचांवर घरगुती उपाय
तुमच्या पायावरील भेगा हटवण्यासाठी तांदळाच्या पिठाची मदत तुम्ही घेऊ शकता. हा उपाय अत्यंत गुणकारी आहे. पाहूया कसे तुम्ही हे करू शकता.
मुठभर तांदळाचा पिठ घेऊन त्यात काही चमचे मध आणि सफरचंदाची साल घ्या. ह्या सर्वांची एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट घट्ट झाली की फाटलेल्या त्वचेमध्ये लावा.
थोडं गुलाब पाणी आणि ग्लिसरीन ह्याचे मिश्रण करा. हे मिश्रण टाचेतील फाटलेल्या भागावर लाऊन काही वेळ तसेच ठेवा. मग कोमट पाण्याने धुऊन काढा. काही दिवस हे असेच करत रहा तुम्हाला आपोआप फरक जाणवेल.
मध ही नेहमीच माणसासाठी गुणकारी औषध असते. एक कप मध गरम पाण्यात टाकून त्यात १५ ते २० मिनिटे पाय टाकून बसा. काही दिवस असेच करत रहा. तुम्हाला फरक जाणवेल.
तीळाचे तेल सुद्धा ह्यावर एक उत्तम उपाय आहे. तिळाचा तेल हा पौष्टीक आणि मॉइस्चराइजिंग असतो. त्यामुळे हा तेल त्या त्वचेवर लावल्याने सुकलेली आणि फाटलेली त्वचा नरम करण्याचे काम करतो.
दिलेले फाटलेल्या टाचांवर घरगुती उपाय जर तुम्ही केलेत तर नक्कीच तुम्हाला बरे वाटेल पण जर एवढे सर्व करून देखील जर बरे वाटत. असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हे आर्टिकल सुद्धा वाचा.