Home कथा प्रेम आणि तंटे

प्रेम आणि तंटे

by Patiljee
1444 views

रात्र खूप झाली होती. स्नेहा दारात बसून वाट पाहत होती. भाड्याने घेतलेल्या त्या घरात हे दोघेच रहात होते. प्रताप एका खासगी कंपनीमध्ये काम करत होता. त्याला त्याच काम आवडत असे. स्नेहा मात्र घर संभाळत होती. दोघांचं प्रेम प्रकरण कॉलेजमध्ये खूप गाजलेल होत. स्नेहा अभ्यासात थोडी कच्ची होती , पण दिसायला ॲक्ट्रेसपेक्षा कमी नव्हती. तिला कॉलेजमध्ये खूप जण प्रपोज केले होते. पण ती सगळ्यांना नकार देत होती. तीच प्रेम तर प्रताप होता. दोघेही नंतर रिलेशनमध्ये आले आणि अख्ख कॉलेज त्यांना लव्हबर्ड्स म्हणून ओळखू लागले.

 एकमेकांच्या सहवासात ग्रजुवेशन कसं संपलं ते कळलच नाही. प्रतापला नोकरी शोधायची घाई लागली होती. कारण , स्नेहाच्या घरचे तिच्यासाठी स्थळ पाहत होते आणि त्याला नोकरीची खूप गरज होती. कारण स्नेहा आणि हा दोघे दुसऱ्या जातीचे होते. कित्येक प्रयत्न केले तरी त्याला नोकरी काही मिळत नव्हती. काहीतरी करावं म्हणून प्रताप थेट स्नेहाच्या घरी पोहचला. तिथे घरच्यांना स्नेहा आणि त्याच्यामधील सर्व काही सांगितल. घरातले खूप रागात त्याला तिथेच मारू लागले. स्नेहा रडत कितीदा अडवायला आली तरी तीच कोणीही ऐकत नव्हतं . स्नेहाला एका रूममध्ये कोंडून ठेवण्यात आल आणि प्रतापला ताकीद देऊन बाहेर हाकलले. 

   स्नेहाला रोज मारत असल्याची बातमी प्रतापच्या कानावर येत होती. त्याने काहीतरी करून स्नेहाशी कॉन्टॅक्ट केला आणि मित्रांच्या साथीने तिला घरून पळवला. कुणाचाही विचार न करता दोघेही स्वतःच एक विश्व तयार करण्यासाठी दुसऱ्या शहरात राहायला आले. तिथे कुठेतरी प्रतापला नोकरी मिळाली. 

 आता कुठेतरी संसार चालल्यासारखं वाटू लागलं होत. स्नेहा फक्त घरची कामं करायची आणि प्रताप नौकरी करायचा. सुरुवातीला सगळं काही ठीक होत. प्रताप रोज लवकर यायचा दोघेही मन मोकळेपणे गप्पा मारायचे. दर शनिवार आणि रविवार ते बाहेर कुठे फिरायला जात. कधी थिएटरला पिक्चर , तर कधी गार्डनमध्ये फिरणे अस चालत होत. 

 स्नेहाच्या मनात स्वतःच घर घ्यायचं विचार करत होती . तिचा निर्णय ती प्रताप ला सांगितली की तेंव्हा प्रतापला हे विचार पटलं. स्वतःच घर घ्यायचा असेल तर प्रतापला खूप मेहनत घ्यावी लागणार होती. त्यासाठी तो जास्तीचा काम करू लागला. कित्येक वेळा तर तो रात्री १ वाजेपर्यंत येत नव्हता. स्नेहाच्या मनात शंका येऊ लागली होती. ती त्याला सांगत ही होती. पण तो फक्त कामाचा विषय आहे एवढच म्हणत होता. असे कित्येक वेळा झाल्यावर त्यांच्यात ठिणगी उडू लागली. कधी तो भांडण काढायचा तर कधी ती भांडण काढायची. 

  आजही त्याला उशीर होणार होता. दारात वाट पाहत तिला आता झोप येऊ लागली होती. किती वेळा ती तिथेच झोपायची. आता थंडीही वाढू लागली होती. ती तशीच दारात इकडे तिकडे घिरक्या घेऊ लागली. इतक्यात तिला कुठलातरी कार आल्याचा आवाज तिला आला. बाहेर बघितल्यावर एक कार त्यांच्या घरासमोर थांबली होती. त्यातून तिला प्रताप उतरताना दिसला. इतक्या रात्री त्याला इथे कोण सोडेल? अस प्रश्न तिच्या मनात येऊन गेलं. एकदा ती आत डोकावून पाहिली तर ड्रायव्हर सीटवर मॉडर्न ड्रेस घातलेली मुलगी होती. तिचे केस मोकळे होते , मेक अप ने तीच रूप अजुन उजळत होत. तिला प्रताप सोबत पाहताच स्नेहाच पारा चढला. प्रताप तिला हात हलवत बाय म्हणाला आणि घरच्या दिशेनी चालू लागला. घरी येतच होता की त्याला स्नेहा दारात दिसली. तिला नजर न मिळवता तो थेट आत शिरला.

  स्नेहा तशीच त्याच्या पाठोपाठ आत शिरली. 

स्नेहा -” प्रताप ..”

तो काही उत्तर न दिल्यामुळे ती परत हाक मारली. तरी तो उत्तर दिला नाही.

स्नेहा – ” कोण होती ती?”

शेवटी तो त्याचा तोंड उघडला .

प्रताप -” कोण?”

स्नेहा -” तुला जी आता सोडून गेली ती ?”

प्रताप -” ती माझ्या ऑफिसमधली कलिग आहे. “

स्नेहा -” मग एवढ्या रात्री काय करत होता तिच्यासोबत ?”

स्नेहा तिच्या मनातली शंका विचारली.

प्रताप -” आज उशीर झालं कामाला म्हणून ती मला सोडायला आली.”

स्नेहा -” कामाला उशीर झाला की उशीर केलास?”

स्नेहाचा पारा आता खूपच चढलेला होता.

प्रताप -” काय म्हणायचं आहे तुला?”

स्नेहा -” म्हणजे एवढ्या रात्री तिच्यासोबत का फिरत होतास?”

प्रताप -” सांगितल ना की उशीर झाला होता म्हणून.”

स्नेहा -” मग एकदा फोन करून सांगता येत नाही का?.. इथ तुझ्यासाठी उपाशी वाट पहात बसले मी..”

शेवटी प्रताप ओरडला.

प्रताप -” मग कोण सांगितलय तुला वाट पाहायला ?”

स्नेहा आता स्तब्ध उभी होती. शेवटी तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं.

स्नेहा -” वेडी आहे ना मी तुझी वाट पाहायला. तुझ्याशी लग्न करून फसले मी… लग्ना अगोदर किती बड्या मारत होता. तुझी कधी साथ सोडत नाही . तुला राणी सारखं ठेवीन आणि आता मी मेले काय फरक नाही पडत ना तुला?”

प्रताप तसेच रागात उभा होता.

स्नेहा -” तुझ्या सारख्यासोबत लग्न करण्यापेक्षा मी एका बेवड्यासोबत लग्न केले असते तर बर झालं असत. “

हे वाक्य ऐकून प्रताप चिढला आणि एक जोराची तिच्या गालावर चापट मारला. ते मार इतका जोरात होता की स्नेहा डाव्या बाजूला असलेल खुर्चीवर आदळली. तिच्या त्या आदळण्याकडे तो लक्ष सुद्धा दिला नाही. तसाच रागात तो उभा होता.

प्रताप -” तुला राहायचं नाही ना माझ्यासोबत .. तर ठीक आहे . मीच जातो बाहेर .”

अस म्हणत एवढ्या रात्रीच तो चालतच बाहेर गेला. स्नेहा मात्र खुर्चीवर मान ठेवून रडु लागली होती. तिला मारलेल्या मारपेक्षा तिच्या मनाची वेदना जास्त होती. रडताना तीच डोळे कधी लागलं हे कळलच नाही.

सकाळची कोवळी ऊन तिच्या चेहऱ्यावर येत होती. जाग येताच ती जागेवर उठली. कालच आठवून पाहताच तिला अजून रडायला आल.प्रताप रात्री गेलेला पाहून तिला अजून काळजी वाटत होती. काळजीपोटी ती त्याला फोन लावली. तो कॉल उचलत नव्हता. परत कित्येकदा ट्राय केल्यावरही तो कॉल उचलत नव्हता. तिला अजून काळजी वाटत होती . काहीही विचार न करता ती तयार होऊन घराबाहेर पडली. घराला कुलूप लावून ती प्रतापला शोधायला निघाली. तिला माहिती नव्हत की तो कुठे सापडेल ? पण तरीही ती शोधायला निघाली. 

 प्रेमविवाह केल्याने त्यांच्या संपर्कात कोणी नातेवाईक नव्हते. पण मित्र मैत्रिणी यांच्या संपर्कात ते होते. सर्वात आधी ती सगळ्या मित्र मैत्रीणीना कॉल करून प्रताप बद्दल विचारलं. पण तो कुठेच नव्हता. प्रताप गेला तरी कुठे याचा अंदाज तिला बांधता येत नव्हत. शोधत असताना सुद्धा ती त्याला कॉल करू पहात होती . पण , आता मात्र फोन बंद सांगत होता. आता जरा जास्तच काळजी तिला वाटत होती. शेवट 

शेवटी ती ऑटो करून प्रतापच्या ऑफिसला निघाली. काल रात्रीपासून ती काही खाल्ली नव्हती. उपाशीपोटी ती सर्वत्र प्रतापला शोधायला निघाली होती. ऑफिसमध्ये पोहचताच ती रिसेप्शनला चौकशी केली , तर तिला कळाल की तो तिथेही नव्हता. हे ऐकताच तिला काय करावं हे कळत नव्हतं. 

 काल रात्री आपण वाद घातला नसता तर हे प्रसंग आल नसत हे विचार करत असताना तिच्या डोळ्यातून अलगद अश्रू गालावरून खाली येत होती. लग्नाला कित्येक महिने उलटून गेले होते , कधीही तिला एकटी असल्याचा भास होत नव्हता. पण आज मात्र तिला या जगात एकटी असल्याचा भास होऊ लागलं. 

 हारल्याचा भावनेने ती एका बागेत येऊन बसली. सकाळचा वेळ असल्याने तिथल वातावरण खूप प्रसन्न वाटत होती. पण स्नेहाच्या मनात मात्र अतोनात अंधार पसरलेली होत. इतका वेळ फिरत असल्यामुळे ती खूप थकून गेली होती. पण त्याच्यापेक्षा ती मनातून दुःखी होती. एका बाकावर बसत ती प्रतापच्या आठवणीत हरवून गेली होती. आजूबाजूला लहान अशे मुल मुली खेळत होते. त्यांच्यासोबत एक प्रौढ व्यक्ती सुद्धा खेळत होता. चेक्स शर्ट , स्लिवस कोपऱ्यापर्यंत घेतलेला , जीन पँट आणि डोळ्यांवर चष्मा असलेला तो व्यक्ती त्या मुलांसोबत खेळत होता. तो पुढे पळत होता आणि बाकी सगळे त्याला पकडायला त्याच्या मागे पळत होते. 

 काही वेळ खेळून तो व्यक्ती स्नेहा बसलेल्या बाकावर तिच्या शेजारी बसला आणि चष्माला नाकावर सावरत त्या मुलांकडे स्माइल करत बघू लागला. स्नेहा मात्र तिच्याच विश्वात हरवली होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत की ती खूप रडवलेली होती. असेच आजूबाजूला पाहत तो व्यक्ती एकदा स्नेहाकडे नजर फिरवली. ती अगदी रडकुंडीला आलेली होती. खूप मनापासून तिने तिचे अश्रू राखून ठेवलेली होती. कशीतरी ती स्वताला सावरत होती. तो व्यक्ती तिच्याकडे पाहत संवाद करण्यासाठी म्हणाला. 

तो -” हाय… मी मनोज.”

हात पुढे करत तो म्हणाला. स्नेहा त्याच्याकडे एकदा नजर फिरवली आणि परत तिच्या विचारात गेली. तिला तुटलेला पाहून मनोज त्याचा हात परत मागे घेतला आणि आजूबाजूला परत बघू लागला.

मनोज -” मुल किती खुश दिसतात ना खेळताना ?”

चेहऱ्यावर एक स्माइल पसरवून बोलू लागला.

मनोज -” खरच.. लहानपणी खूप मज्जा असते. उगाच आपण सगळे मोठे होतो आणि नाही त्या गुण आत्मसात करतो. “

स्नेहा मात्र त्याच्या बोलण्याला तेवढ प्रतिसाद देत नव्हती. तरीही तो तसाच बोलत होता.

मनोज -” आता तुमचं उदाहरण घ्या. सकाळच्या मस्त वातावरणात टेन्शनमध्ये आहात. प्रश्न टेन्शनमध्ये असण्याचा नाहीये. प्रश्न तो शेअर न केल्याचा आहे.”

स्नेहा आता कुठ त्याच्या बोलण्यावर लक्ष देऊ लागली आणि शेवटी ती ओरडली.

स्नेहा -” का शेअर करू मी?”

हा प्रश्न विचारताना तीच मन अगदी भरल आणि मोठ्याने रडु लागली. खाली मान घालून डोळे बंद करून रडु लागली. तीच मन अगदी दुःखात अश्रुंच्या रूपात बाहेर येत होती. पण मनोज अगदी शांतपणे खिशातून रुमाल काढला आणि स्नेहाला देऊ केला.

मनोज -” हे घ्या. “

स्नेहा मान वर करत एकदा त्याला पाहिल आणि रुमाल घेऊन तिचे डोळे पुसू लागली. तेवढ्यात पुन्हा मनोज हात पुढे केला .

मनोज -” हाय मी मनोज ..”

परत एकदा हात पुढे केल्याचा पाहून स्नेहाही हात मिळवून म्हणाली.

स्नेहा -” हॅलो.. मी स्नेहा.”

मनोज -” नाइस नेम.. तुम्हाला बघून वाटत की जॉबच काही टेन्शन आहे. “

स्नेहा -” मी हाऊस वाइफ आहे. “

मनोज -” काय सांगताय?? मग घरातलं प्रोब्लेम आहे तर…”

मनोज विचार करत म्हणाला. स्नेहा हे ऐकून अचानक म्हणाली.

स्नेहा -” तुम्हाला कसं कळलं?”

मनोज -” मॅडम.. मुलींच्या जीवनात दोनच प्रोब्लेम असू शकतात. एक जॉब आणि दुसर घरातलं प्रोब्लेम..”

स्नेहा आता कुठ त्याच्यासोबत कंफर्टेबल होत होती.

स्नेहा -” तुम्ही काय करता?”

मनोज -” जिंदगीच सायंटिस्ट ..”

स्नेहा -” म्हणजे?”

मनोज -” म्हणजे मी एक लेखक आहे. जसा एक सायंटिस्ट प्रयोगाचं निरक्षण करतो , तसा मी वेगवेगळ्या जिंदगीची निरक्षण करत असतो. “

स्नेहा -” अच्छा…”

मनोज -” आणि मला वाटतं तुमचं तुमच्या पतीसोबत भांडण झाला असेल.”

स्नेहा खाली मान घालून होकार दर्शवण्यासाठी हलवली आणि स्नेहा तिचं प्रेमप्रकरण , लग्न आणि आतापर्यंत घडलेली घटनेचं सारांश दिली .

  हे ऐकून मनोज मोठयाने हसू लागला. स्नेहा आश्चर्याने त्याला बघत होती. 

स्नेहा -” तुम्ही एकाच दुःख ऐकून हसू कसं शकता? कसले लेखक आहात तुम्ही??”

मनोज -” सॉरी…. सॉरी…”

हे म्हणत पुन्हा तो हसू लागला. परत तो हळू थांबवत म्हणाला.

मनोज -” सॉरी… मी तुमच्या परिस्तिथी वर नाही , तर तुमच्या टेन्शनमुळे हसू लागलो.”

स्नेहा -” म्हणजे ?”

मनोज -” म्हणजे की तुमची परिस्तिथी टेन्शन घेण्यासारख नाहीये.”

स्नेहा विचार करत म्हणाली.

स्नेहा -” अस कस ?… तो आता कुठे गेलंय ? रात्री रागात कुठे गेलंय काय माहिती ?”

मनोज -” मला सांगा तुम्हीही रागात काहीही म्हणलं असेल ?”

स्नेहा -” हो… पण काल रात्री घटनाच असली घडली होती. “

मनोज -” मला सांगा तुमचा नवरा रात्री उशिरा का येतो?”

स्नेहा -” तो ओव्हरटाईम करतो .”

मनोज -” का ओव्हरटाईम करतो ? म्हणजे पगार पुरत नाही का ?”

स्नेहा -” नाही , पुरतो ना . पण आम्हाला स्वतःच घर घ्यायचं आहे .”

मनोज -” मग स्वतःच घर हे स्वप्न कुणाच आहे?”

स्नेहा -” सर्वात आधी मीच घराचं विचार मांडले होते.”

मनोज -” बघितलात तुमचाच स्वप्न साकार करण्यासाठी तो मेहनत घेत आहे .”

स्नेहा -” म्हणून काय दुसऱ्या मुलीसोबत फिरायच का?”

मनोज -” मला सांगा तुम्ही त्या मुलीला तुमच्या नवऱ्यासोबत कितीदा बघितलात ?”

स्नेहा विचार करून सांगितली.

स्नेहा -” काल रात्रीची एकदाच.”

मनोज -” मग एकदाच पाहिल्यावर तुम्ही निर्णय कसा काय देऊ शकता? आणि तो तुमच्या स्वप्नासाठी एवढं करत असताना शंका घेतल्यावर त्यांनाही राग येणारच.”

स्नेहाला आता तिची चूक लक्षात आली. ती खूप मोठी चूक केली अस तिला लक्षात आल.

मनोज – ” तुमचं एकवेळ शंका घेणं बरोबर आहे. पण , तीच शंका निर्णय म्हणून तुम्ही नाही देऊ शकत. प्रेमविवाह आहे अस तुम्ही म्हणता. मग जेंव्हा असेल शंका येतात तेंव्हा तुमच्या लग्नाअगोदर चे क्षण आठवा. तेंव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती प्रेम करता त्यांच्यावर आणि त्यांनी तुमच्यावर.”

चूक लक्षात आल्यावर ती खाली मान घालून रडु लागली.

स्नेहा -” तो कुठे असेल आता? प्लिज माझ्याकडे ये.. मी कधीही तुझ्यावर रागावणार नाही.”

अशी ती बडबडत होती.

मनोज -” काळजी नका करू. जस तुमचं या जगात कोणी नाही. तसा त्यांच्याही जीवनात कोणी नाही. येईल लवकर.”

एवढं बोलून तो बाकावरून उठला आणि जाण्यासाठी निघाला आणि साइड बॅग खांद्यावर घातला. स्नेहा त्याच्याकडे बघून म्हणाली.

स्नेहा -” तो खरच येईल ना.”

मनोज फक्त एक स्माइल करत म्हणाला.

मनोज -” मुलांचं हेच प्रोब्लेम असतं की कितीही भांडणं झाल असल तरी आपल्या वाइफ , गर्लफ्रेंड जवळ जातात. तेही लवकर येतील .”

स्नेहाचा चेहरा आता कुठे उजळत होती. तो जात होताच की इतक्यात स्नेहा म्हणाली.

स्नेहा – ” तुमची वाइफ लकी असेल. तुमच्यासारख पती मिळाली तिला… “

मनोज मागे फिरून म्हणाला.

मनोज -” ती नाही रहात माझ्यासोबत .. माझ्या आई सोबत राहते .”

स्नेहा – ” कुठे?”

मनोज स्मित करत हाताच एक बोट वर करत मागे फिरला . स्नेहाला कळून चुकलं की त्याच्याही जगात कोणीही नाहीये. तरीही तो किती खुश आहे. हे विचार करत ती उठली आणि घराकडे जाऊ लागली.

 एकदा घराकडे पोहचली तर तिला दिसल की दाराच्या पुढे प्रताप बसलेला होता. तो सुध्दा मान खाली घालून रडु लागला. 

स्नेहा -” प्रताप?”

प्रताप तिच्याकडे बघितला आणि तिच्याजवळ पळतच गेला आणि घट्ट मिठी मारला. रडतच तो म्हणाला.

प्रताप -” स्नेहा…. कुठे गेली होतीस. मला वाटलं की कालच्या रागात तू कुठेतरी गेली असेल म्हणून तुला शोधायला बाहेर गेलो तर तू कुठेही सापडली नाहीस.”

स्नेहा त्याच्या डोक्याला थोपटत शांत करत होती.

स्नेहा -” शशशश…”

प्रताप -” सॉरी…. मी काल तुला मारलं. तुला मारायला पाहिजे नव्हतं. माफ कर मला…. पुन्हा कधीही अस नाही करणार.”

हे ऐकून स्नेहाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले.

स्नेहा -” मला सुद्धा माफ कर. मीसुद्धा तुझ्यावर शंका घेतले. माफ कर मला..”

प्रताप तिच्या मिठीतुन बाहेर आला.

प्रताप -” तुला टाईम दिलं नाही म्हणून तू अस केलीस. “

स्नेहा एकदा त्याच्याकडे बघत पुन्हा त्याच्या मिठीत गेली.

प्रताप -” आज सुट्टी सांगितलय. आज फक्त तुझ्यासोबत वेळ घालवणार.”

स्नेहा आत खूप खुशीत होती आणि मनोमन मनोजला धन्यवाद म्हणत होती.

स्नेहा -” आधी आत चल. कालपासून पोटात काही नाही तुझ्या.. “

प्रताप – ” तुझ्याही…”

दोघेही आता घरात गेले. तिला कळून चुकल की काही असुदेत प्रेम खर असेल तर सगळं काही ठीक होईल.


समाप्त

ऋषिकेश मठपती

भाग आवडला असेल तर नक्की कळवा… धन्यवाद

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल