प्राजक्ताची फुले दिसायला सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाची आणि तिचे देठ लालसर रंगाचे असते. तशी ही फुले नाजुकच असतात पण यांचा वास इतका मनाला शांती देणारा आहे की बस.. प्राजक्ताची फुले तास म्हणाला गेलात तर प्राजक्ताच झाड ही एक औषधी वनस्पती आहे. या झाडावर येणारी फुले रात्री गळून पडतात आणि ते पहाटे पहाटे आणि पडलेल्या या फुलांचा सुगंध चहूबाजूला पसरतो.

पूर्वीचे लोक प्राजक्ताची पाने झाखामांवर मलम म्हणून करायचे. तसेच या फुलांच्या देठा पासून रंग बनवण्यात येतो तो ही सोनेरी. तसेच पारिजातकाचे फुल, पाने, बिया, आणि या झाडाच्या खोडाची साल ही औषधी म्हणून वापरली जाते. गावा ठिकाणी या फुलांचे हार बनवून देवाला घालतात.
प्राजक्ताची फुलं याचा रस काढून पिल्यानें रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे अनेक आजारांपासून तुमचे रक्षण होते. त्याचं प्रमाणे पोटात जंत झाले असतील तर या फुलांचा काढा करून पिणे औषधी आहे. या झाडांची पाने पेस्ट करून पाण्यात उकलावा अर्धे करा हे पाणी प्या यामुळे सांधेदुखी पासून आराम मिळतो. तसेच हा काढा घासा आणि खोकला यांच्यावर ही उपयोगी आहे.

त्याचप्रमाणे या झाडाच्या बिया या मूळव्याधीवर गुणकारी आहेत. प्राजक्ताची पाने तुमची त्वचा नितळ बनवते. दम्याचा आजार असल्यास या झाडाची साल उगाळून दिवसातून दोन वेळा घ्यावी.
आरोग्याविषयी हे पण आर्टिकल वाचा.
- भोळेनाथाला वाहिला जाणारा बेल आपल्या आयुष्यात पहा किती महत्वाचा असतो
- निलगिरीच्या झाडाचे महत्त्व
- कडीपत्ता खाण्याचे फायदे
- उत्तम आरोग्य राखण्यासाठी केळी खाणे गरजेचे आहे.