मला मुंबई मधे पाच वर्षे झाली. या पाच वर्षात मी माझ्या गावाला विसरत चाललो होतो तस म्हणायला गेलो तर गावाला आता माझं कुणीच नव्हतं. त्यामुळे तिथं माझं येणं जाणं बंदच झाले होते. असो पण आता मला या हॉस्पिटल मध्ये जॉब ला लागल्यापासून थोड आयुष्य बदलून गेले आहे हातात चार पैसे आहेत. हॉस्पिटल म्हणजे मी डॉक्टर वैगेरे नाही मी पोस्टमॉर्टम करायचो, या कामाला पाच वर्ष झाली. पहिल्यांदा हे काम करण्यासाठी मी घाबरत होतो घाबरायचो म्हणजे थोडी भीती वाटायचीच ना पण त्यावेळी नवीनच मुंबईत आलो होतो, पैशाची इतकी कणकण होती की माझी भीती आपोआप नाहीशी झाली.
रोज त्या खुर्चीवर बसून बॉडीची वाट पाहायची आणि बॉडी आल्यावर चिरफाड करायची. कधी कधी बॉडी इतक्या सडलेल्या असायच्या की बघूनच उलटी यायचं पण तरीही माझ्याशिवाय तिथे करायला कोणीच नव्हते. बसून बसून पाण्याचा एक घोट घेतला एक बॉडी येणार होती तिचीच वाट पाहत बसलो.
विचार करता करता अचानक पाया जवळून काहीतरी गेल्याचा भास झाला आणि दचकून उभा राहिलो अंग घामाने भिजले. पण नंतर जवळ जाऊन पाहिले तर उंदीर होता या उंदरांची रोजची कटकट पण काय माहित थोडी भीती वाटत होती. छातीत अजून धड धड करतेय असो बॅग मधून मोबाईल काढला आणि टाइमपास करू लागलो. अचानक कुत्री जोरजोरात रडू लागली. यांचं मेल्यांच रोजच आहे म्हणून हाड हाड करून त्यांना हकलवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याचा काहीच उपयोग नव्हता.
आज काय माहित पण थोडी भीती वाटत होती. एक वार्ड बॉय माझा मित्र होता तो यायचा अधून मधून पण आज त्याची सुट्टी होती. वरून जरी सर्व शांत होत पण छातीत धड धड वाढलेली होती. बघता बघता समोर लक्ष गेलं समोरच एक काळी आकृती दिसली हॉस्पिटलच्या त्या भागात जास्त करून लाईट नसायची कुठे तरी बल्ब असायचा. ती आकृती बघून माझ्या काळजात धस झाले ती आकृती जस जशी जवळ येऊ लागली तस तसे हृदयाचे ठोके वाढले, घसा कोरडा पडला अशी भीती याअगोदर कधीच वाटली नव्हती.
शर्ट पूर्ण घामाने भिजला वाटलं कोणाला तरी हाक मारावी म्हणून मोबाईल वर नंबर डायल करायला गेलो पण हात इतके थरथरत होते की नंबर ही नीट डायल होत नव्हता. अचानक माझ्या खांद्यावर हात पडला मी भीतीने डोळे बंद केले. आवंढा गिळला अरे घाबरतोस काय मित्रा मी सुनील तुझा गावाकडचा खास दोस्त विसरलास ना! हे ऐकल्यावर मी मटकन डोळे उघडले आणि माझी भीती थोडी का होईना कमी झाली होती. अरे सुनील तू हिथ कसा काय आणि मी इथ काम करतो हे तुला कसे माहीत? अरे माझे मामा याच हॉस्पिटल मध्ये Admit आहेत म्हणून आलो होतो आणि मला अगोदरच समजले होते तू ईथ कामाला आहेस.
जवळ जवळ दहा मिनिट दोघं गप्पा मारत होते. बाजूला कुत्री सारखी बघून भुंकत होती पण मी लक्ष नाही दिले त्यांचे रोजचेच कारण माझी भीती आता नाहीशी झाली होती. पण मला कुठेतरी चुकल्याचुकल्या सारखे वाटत होते. सुनीलच्या चेहऱ्यावर एकप्रकारचे नैराश्य होते. मी विचारले त्याला काय रे भावा तू असा काय तुझ्या चेहऱ्यावरचे ते हास्य मला आता का दिसत नाही. अरे मित्रा आता पाहिल्यासारखं नाही रे राहिलं सगळं बदललं आहे. म्हणजे मी विचारले अरे काही नाही जाऊदे.
चल मी जातो…! अरे काय बोलतोस इतक्या वर्षांनी भेटलो असा कसा सोडेन, घरी चल सकाळी जाऊया आपण मस्त पार्टी करू मग जा घरी. इतक्यात समोरून बॉडी आली म्हणून मी ती ट्रॉली आणण्यासाठी गेलो बॉडी पूर्ण झाकलेली होती म्हटलं आतमध्ये गेल्यावर पाहतो. रोज प्रमाणे आत मध्ये ती बॉडी घेऊन गेलो आणि दरवाजा लावला. आता माझ्या एक गोष्ट लक्षात आली अरे सुनील तर बाहेरच राहिला म्हणून मी लगेच दरवाजा उघडला पण तो बाहेर नव्हताच शिवाय मी आत येतानाही दिसला नाही लगेच कुठ गायब झाला हा.
जाऊदे काम झाल्यावर बघतो शोध काढतो त्याचा असे बोलून मी बॉडी वरचा कापड काढला आणि बघताक्षणी मला धक्का बसला कारण ही बॉडी दुसरी तिसरी कोणाची नसून सुनीलची होती. म्हणजे मी इतका उशीर त्याच्या आत्म्यासोबत बोलत होतो. भीतीने अंग घामाने भिजून निघाले वाटलं आजूबाजूला कोणीतरी आहे. त्याचा चेहरा मला बघतोय अस वाटत होत. मित्र होता पण तरीही मी घाबरलो होतो खूप म्हणजे इतका की कधी चक्कर येऊन पडलो ते मला कळलेच नाही.
सकाळी शुद्ध आली तर हॉस्पिटल मद्ये होतो आईं आणि बायको जवळच बसल्या होत्या. काय रे बाबा असं काय झालं की तू चक्कर येऊन पडलास आणि रात्र भर तुझं अंग गरम होत. खूप वेळ झाला तू बाहेर आला नाहीस म्हणून वार्ड बॉय बघायला गेला तर तू चक्कर येऊन पडला होतास. आता आईला कसं सांगू पण तरीही माझ्यासोबत जे घडले ते मी सांगितले दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज दिला पण पुन्हा त्या ठिकाणी काम करण्याची माझी हिम्मत होईना. मी लिहिलेल्या ह्या काही निवडक कथा सुद्धा वाचा.
अशाच अजून भयकथा वाचायच्या असतील तर आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तुम्ही कथा ह्या सेक्शन मध्ये जाऊन वाचू शकता.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)
Mail Id patiljeee@gmail.com
ही भयकथा पूर्णतः काल्पनिक आहे. वास्तवाशी त्याचा काहीएक समंध नाहीये ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी.