पालक हिरवा हिरवा गार आणि ताजा असा खायला ही छान लागतो. पण ज्याला आवडतो त्याला आवडतो नाही त्यांना आवडत नाही. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपण जास्त हिरव्या पालेभाज्या खायला हव्यात. या भाज्यामध्ये अनेक प्रकारचे घटक असतात जे आपल्याला या आजारातून बाहेर काढून शक्ती प्रदान करतात.
पालक खाण्याचे फायदे
तुम्हाला पालक खायला आवडतं नसेल तर त्याची भजी करून खा किंवा पालक पनीर ही छान लागतो. पालकचा सूप करून प्या ते ही तुमच्या शरीरासाठी एक उत्तम आहार असू शकतो.
पालक खाल्याने तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. यात भरपूर प्रमाणात हिमोग्लोबिन असते जे रक्ताची कमतरता भरून काढते.

ज्या लोकांना लो बीपी चा त्रास आहे अशा लोकांनी पालकाची भाजी खाणे उत्तम आहे.
पालक या भाजीमध्ये प्रोटीन, सोडियम, फॉस्परास, क्लोरिन, लोह इतायदी घटक तसेच तंतुमय पदार्थ याशिवाय अ आणि ब तसेच क जीवनसत्व आपल्या शरीराला मिळतात.
या पालक मध्ये भरपूर प्रमाणत कॅल्शिअम असते. पालक खाल्याने तुमची हाडे मजबूत होतात तसेच आपले दात ही मजबूत होतात.
पालक खाल्ल्याने रक्त ही शुद्ध होते. पालक या भाजीत कोबी आणि गाजर पेक्षा दुपटीने आयर्न असते.
तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास पालक नक्की खा या भाजीत कॅलरीज खूपच कमी असतात.
डोळ्यांची बघण्याची क्षमता वाढते त्यामुळे पालक प्रत्येकाने खायला हवे.
ज्या लोकांना मुतखड्याचा त्रास आहे अशांनी पालक खाऊ नये कारण पालक झाल्यानंतर त्याचे यूरिक असिड मध्ये रुपांतर होते.
पालक खाणे शरीरासाठी उत्तम असले तरी कोणताही पदार्थ खाताना नेहमी थोड खा.
आरोग्यविषयक हे आर्टिकल सुद्धा वाचा.
- वांग्याची भाजी खाण्याचे फायदे
- अळूची वडी खाण्याचे फायदे
- दररोज चालण्याचे फायदे
- मोड आलेले हरभरे खाल्ल्याचे फायदे