Home Uncategorized पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

by Patiljee
2253 views
पहिलं प्रेम

पहिल प्रेम

पहाटेची वेळ खूप मस्त असते ना ? म्हणजे थंडी तर असतेच आणि एकदम शांत … मनात केलेल विचारसुद्धा बाहेर जाईल अस वातावरण असेल अस मला कधीही वाटलं नव्हतं. स्कुटीच्या मागच्या सीटवरून मी हे वातावरण अनुभवत होते. ताई स्कूटी चालवत होती . आम्ही दोघे कधीही गप्प न राहणारे आज मात्र खूप गप्प होतो. मागच्या काही दिवसात मी खूप काही अनुभवले होते. 

दिवसा खूप गजबजलेला असणाऱ्या शहराला अस शांत असलेल बघत असताना कधी बसस्टँड आल कळलच नाही. अख्ख शहर जरी शांत असली, तरी बस स्टँडमध्ये मात्र थोडीफार गर्दी होती. सांगलीला जाणारी बस अजुन आलेली नव्हती. बस जिथे थांबणार होती तिथेच ताईने स्कूटी थांबवली . पुढे असलेली मोठी बॅग आणि माझ्याकडची छोटी बॅग मी खाली उतरवले. ताईसुद्धा स्कूटी स्टँडवर लावून माझ्याजवळ येऊन थांबली. आजूबाजूचे लोकांना पहिलं तर कोणी चहा घेत होते , कोणी स्वेटर घालून बस येण्याची वाट पाहत होते. 

तेवढ्यात समोर एक कंडक्टर आले आणि डेपोतून एक बस बाहेर येत होती. रिव्हर्समध्ये येत असलेली बसकडे बघत मी ताईजवळ उभी होते . कंडक्टर शिट्टी मारत त्या बसला दिशा दर्शवत होते. बस मागे येत आपल्या जागी थांबली. मी एकदा ताईकडे बघितले तर ती माझ्याकडे न बघण्याचा नाटक करत होती. तरी तीच लक्ष माझ्याकडेच लागून होती. मी गडबडीने पाटी पाहण्यासाठी बसच्या समोर गेले. समोर गेल्यावर कळाल की ही बस सांगलीला जाणार आहे. परत मागे आले आणि ताईला हळू  आवाजात म्हणाले .

मी -” हीच बस सांगलीला जाणार आहे.”

ताई माझ्याकडे एकदा नजर टाकली . मी मोठी छोटी बॅग घेतले आणि खांद्यावर अडकवले आणि मोठी बॅग घेण्यासाठी खाली वाकले तर ती बॅग घेण्यासाठी ताईसुद्धा  हात पुढे केली . तीच हात बघून एकदा मी तिला पाहील आणि माझा हात मी मागे घेतले. ती मोठी बॅग घेतली आणि आम्ही दोघी बसमध्ये गेलो. मला लहानपणापासून विंडो सीट आवडत होती. मग आतासुद्धा मी विंडो सीटच घेणार होते. एक विंडो सीट पाहून तिथे छोटी बॅग ठेवले आणि ताई मागून मोठी बॅग घेऊन आली , तेंव्हा मी सुध्दा तिला मदतीचा हात म्हणून मोठी बॅग वर ठेवण्यास मदत केले. बॅग ठेवून आम्ही खाली गेलो. खाली जाताच ताई हाताची घडी घालून थांबली होती . मी सुद्धा तिच्याजवळ जाऊन तशीच उभी राहिले. थोड्यावेळाने कंडक्टर शिट्टी वाजवत होते. बस जाण्यासाठी तयार झाली होती. मी एकदा ताईकडे बघितले तर ती दुसरीकडेच पाहत होती. मागे फिरून मी बसमध्ये जातच होते की इतक्यात ती माझं हात पकडली . 

ताई -” साधं बाय सुद्धा नाही म्हणणार का?”

ती हे वाक्य म्हणत असताना तिच्या डोळे ओले झालेले होते. ते बघून मी सुद्धा कंट्रोल न करता तिला हग केले आणि न कळत माझ्याही डोळ्यात पाणी आलं . 

मी -” बाय ताई ….”

ताई -” काळजी घे स्वतःची .. “

मी -” हो… तू सुद्धा… मिस यू ताई “

ताई -” मिस यू टू… नकटे … पोहचल्यावर कॉल करायला विसरू नको.”

आम्ही दोघीही ओले डोळ्यांनी एकमेकांना बघत होतो. बस निघण्यासाठी चालू झाली. मी ओल्या डोळ्यांनीच बस मध्ये चढले. बस जात असताना ताई माझ्या विंडोजवळ येऊन निरोप देत होती. मी सुद्धा तिचा निरोप घेत हात हलवले. जशी बस हळू हळू निघत होती , तशी ताई मागे जात होती. तरी तीच लक्ष माझ्यापासून जात नव्हती. 
   
बस आता वेग पकडत होती . जेंव्हा जेंव्हा मी बसमधून प्रवास करत असे , तेंव्हा तेंव्हा मी हेडफोन्स घालून गाणे ऐकत विंडोच्या बाहेरची नजारे अनुभवत असे. त्यात एक वेगळीच खुशी येत होती. पण आज मात्र हेडफोन्स लावल्यावर ती फिलिंग येत नव्हती. पहाटेची थंडीसुद्धा आता लागेनास झालं होत. मनात एक वेगळीच पोकळी निर्माण झालेली होती. कानात गाणे तरी वाजत असले तरी मन मात्र वेगळीच विचार करत होत . 

अस म्हणतात की , ‘ ती मुलगी खूप लकी असते  , जी एका मुलाची शेवटची प्रेम असते आणि तो मुलगा खूपच लकी असतो , जे एका मुलीचं पहिल प्रेम असतो .’ माझ्या सुद्धा जीवनात माझं पहिल प्रेम आलेलं होत. त्याच नाव संजय … 

ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात होते मी जेंव्हा त्याला पाहिलं. आमच्या अपार्टमेंटमध्ये कित्येक मुलमुली राहतात. त्यातले माझे मित्रमैत्रीण सुद्धा आहेत. माझे बाबा मला एवढं स्वातंत्र्य दिलं होत की मला मित्रमैत्रिणीला भेटायला मिळत असे. खूप मज्जा मस्ती चालायची . त्यातलाच माझा मित्र समीरसुद्धा होता. तो इथे त्याच्या मित्रांसोबत एक फ्लॅट घेऊन राहत होता आणि त्यातल्या त्यात तो माझ्या क्लासमध्येही शिकत होता . त्याचे आणि माझे आईवडिलांमध्येसुद्धा खूप जवळीक संबंध होते . मी सुद्धा कधी कधी तो फ्लॅटमध्ये एकटा असला तर मी अभ्यासासाठी म्हणून जायचे . 

रविवारचा दिवस होता. सकाळीच समीरचा फोन आला . फोनवरून मला म्हणाला की त्याला नोट्स हवे आहेत. मी आईला सांगून नोट्स देण्यासाठी त्याच्या घरी गेले. कित्येकदा बेल वाजवले तरी कोणी उत्तर देत नव्हते. मला आता राग आलेला होता. अखेर दार उघडण्याचा आवाज आला. मी पुढे कोण आहे हे न बघताच म्हणाले. 

मी -” समीर बावळट… किती उशीर रे दार उघडायला ?… सकाळी फोन करतोस तरी करतोस आणि दार मात्र उशिरा उघडतोस..”

बोलत असताना जेंव्हा माझी नजर समोर गेली. तिथे तर दुसरा मुलगा उभा होता.  उंच , देखणा , रंग गहूसारखा , पण चेहऱ्यावर तेज , देह मोठी नसली तरी आकर्षित होती , चेक्स शर्टचा स्लीव वर केलेला आणि जीन्स घातलेला होता. तोच होता माझा संजय …. तो सुद्धा मलाच निरखून पाहत होता. कित्येक मिनिटे गेले माहिती नाही , पण आम्ही एकमेकांना पाहतच उभा होता. तो सुद्धा दारातच मला पाहत होता. तेवढ्यात मागून आवाज आला. 

समीर -” अरे जान्हवी … तू आलीस??”

त्याच्या त्या बोलण्याने आमच्या दोघांची नजर खाली झाली. 

समीर -” अरे आत ये ना… बाहेर का उभा आहेस ??”

तोसुद्धा मागे बघून परत माझ्याकडे बघून म्हणाला. 

संजय -” या ना आत… “

मी सुद्धा लाजेत होकारार्थी दिले. तो दारात उभाच होता. त्याने मला थोडी जागा आत जाण्यासाठी दिली. आत जात असताना त्याच्या लावलेल्या परफ्यूमनी मला अगदी मोहरुन गेल्यासारखं वाटलं. त्याच्या शरीराचा  माझ्या शरीराशी झालेला स्पर्श मला स्पंदने देत होते. आत आल्यावर तो दार बंद करून आत आला. 

समीर -” अरे ये बस… “

मी -” तुला नोट्स हवे होते ना..”

मी सोबत आणलेली नोट्स त्याच्याकडे देत म्हणाले.

समीर -” अरे हा…. हा संजय .. फ्लॅटमध्ये नवीन आला आहे. नवीनच जॉबला लागला आहे. “

संजय माझ्याकडे बघत म्हणाला.

संजय -” हाय..”

मी -” हाय ..”

मी सुद्धा लाजत म्हणाले. कित्येकवेळा मी अनोळखी जणांना भेटले , पण मला पहिला कधीही अस झालेलं नव्हत.

आता माझं दिवस समीरच्या फ्लॅटमध्ये न जाता जातच नव्हतं. जेंव्हा समीर तिथे नसतो तेंव्हा तर मुद्दामहून मी तिथे जात होते. असेच काही दिवसात आम्ही नंबर एक्सचेंज केलो . मग रात्रभर चॅट करू लागलो. कधी कधी तर समीरला सोडण्याचा बहाणा  करत तो आता कॉलेजमध्येही येऊ लागला होता. समीरला सुद्धा आमच्यात असलेली जवळीक माहिती होती. कॉलेजचे लेक्चर्स बंक होऊ लागले होते. रविवार किंवा शनिवारच्या दिवशी समीर आणि आम्ही दोघे बाहेर फिरायला जायचो. कोणतीही नवीन मूव्ही थिएटरला आला असेल , तर आम्ही पाहिली शो बघत असू. त्यात लवस्टोरीचे मूव्ही तर खूप पाहत होतो. मी आणि संजय दोघेही आजूबाजूला बसायचो. रोमँटिक सीनला एकमेकांच्या हातात हात घालून बसायचो. मस्त दिवस जात होते. 

 बघता बघता १ वर्ष कधी निघून गेलं कळलच नाही. असेच भेटणे , कॉलवर तासनतास बोलणं , त्याच्यासोबत फिरणं , खूप मस्त वाटत होतं मला या जवळीक झालेलं दिवस … 

ग्रॅज्युएशनची दुसरी वर्षाची दिवाळी सुट्टी लागली . तेंव्हा पूर्ण अपार्टमेंटमध्ये दिवाळी साजरा होत होती. दिवाळीची संध्याकाळी खूप सारे फटाके , रॉकेट उडत होते. मी त्या संध्याकाळचा उजेडपणा अनुभवत होते. तेवढ्यात मला संजयचा मेसेज आला. अपार्टमेंटच्या टेरसवर येऊन भेटायला सांगत होता. मी घरातील सगळ्यांची नजर चुकवून कसं तरी टेरसवर गेले. तिथे तो शेरवानी घातलेला एकटाच उभा होता. तिथे उभारून आकाशातील रॉकेट उडणे बघून मला खूप छान वाटत होती आणि त्यातल्या त्यात त्याची साथ मला खूपच कंफर्टेबल फील करून जात होती. दोघेही एकसाथ हातात हात घालून आकाशाकडे बघत गप्पा मारत होतो. 

संजय -” तुला माहिती आहे ?”

मी -” काय ?”

संजय -” तुझ्यासोबत असताना माझं मन खूप आनंदित होतो. अस वाटत की या जगात फक्त तू आणि मी असावं . एका घरी, फक्त तू आणि मी राहावं. “

मी फक्त त्याला ऐकत होते . कित्येक दिवसांपासून मी त्याच्याकडून हे ऐकण्यासाठी आतुरता होते. 

संजय -” किती मस्त होईल ना अस झाल्यावर ?”

मी -” हमम…”

संजय एकदम माझ्याकडे बघितला आणि गुढग्यावर बसला माझा हात हातात घेऊन तो म्हणाला.

संजय -” जान्हवी …. आय लव यू..”

मला एकदमच आकाशात गेल्यासारखं वाटू लागलं. हेच तर मी ऐकू इच्छित होते. तेवढ्यात आकाशात एक मोठासा रॉकेट उडला. त्या प्रकाशात माझ्या डोळ्यातून एक आनंदाश्रु बाहेर आली आणि मान होकार म्हणून हलवले.

मी -” येस….. आय लव यू टू “

तो गुढग्यावरून उठला आणि मला मिठीत घेतला. मी सुद्धा त्याच्या मिठीत हरवून गेले. तो माझ्याकडे बघु लागला . त्याच्या डोळ्यातून माझ्यावर असलेली प्रेम झळकत होती. तो जवळ येऊ लागला. मी सुद्धा त्याला ओप्पोज करू शकले नाही. आमच्या दोघांच्या ओठातले अंतर कमी होऊ लागलं होत. अंतर जशी जशी कमी होत होती . तशी माझ्या हृदयाचं धडकन वाढू लागलं होतं. ओठाला ओठ मिळालं. आमच्या प्रेमाची खरी सुरुवात झाली. ही माझ्या जीवनाची पहिली किस होती. आता तर भेटणं तर रोजच दिनक्रम झालेलं होतं . त्याच्या फ्लॅटमध्ये माझा अर्धा दिवस जात होता. 

एक दिवस संध्याकाळची वेळी आम्ही कॅफेमध्ये कॉफी पित होतो. गप्पा चालू होत्या. हातात हात घेऊन तो म्हणू लागला . इकड तिकडचे गप्पा झाल्यावर तो म्हणाला.

संजय -” जान्हवी …. आपल्या रिलेशनशिपला आता ४ महिने होत आले.”

मी -” हो…. कळालच नाही ना..”

संजय -” हो… तुला नाही वाटत का आता याला अजुन पुढे घेऊन जावं..”

मी -” म्हणजे?”

संजय -” यू नॉ…. फिजिकल रिलेशनशिप??”

मी -” तुला शारीरिक संबंध म्हणायचं आहे का ??”

मी अजुन एकदा कन्फर्म करुन घेत होते. 

संजय -” हो..”

मी अचानक हातातला हात काढून घेतला. 

मी -” तू वेडा झालास काय??”

संजय -” काय झालं?”

मी -” अरे ते सगळं लग्नानंतर…”

संजय मला मध्येच अडवत म्हणाला.

संजय -” ते सगळं जुन्या गोष्टी झाल्या आहेत आता जान्हवी…तू कुठल्या जगात राहत आहेस??.. माझ्या मित्र मैत्रिणींना असल सगळं कॅज्याल आहे. “

मी – ” पण मला नाही ना..”

मी एकदमच उठून बाहेर जाऊ लागले. तो माझा हात पकडला. 

मी -” सोड मला…”

तो हात सोडत म्हणाला.

संजय -” ठीक आहे …. जा …”

माझ्यासमोर उभा राहून बाहेर गेला. त्याची बाईक काढला आणि निघून गेला. मी एकटीच तिथे उभी राहिले. चालत घरी येऊ लागले. चालत असताना त्याला मेसेज केले. तो सीन करायचा आणि पण रिप्लाय देणं टाळत होता. ते बघून त्याला कॉल लावले . तो सुद्धा उचलत नव्हता . घरी येऊन फ्रेश झाले. जेवण करायला मूड नव्हता , तरी घरच्यांसमोर थोड खाव लागलं . रूममध्ये येऊन पहिला मी मोबाईल चेक केले. तर त्याचा काहीच मेसेज आलेला नव्हता. त्याला परत कॉल लावले , तेंव्हा पण उचलत नव्हता. ती अख्खी रात्र मला झोपचं लागत नव्हती. त्याच्याच चिंतेत रात्र काढत होते. 

दुसऱ्या दिवशी मी लगेच तो जिथून जातो तिथे उभी राहिले . माफी मागावी म्हणून त्याच्यासाठी गुलाबसुद्धा घेतले होते . तो बाईक घेऊन आला पण मला बघून न बघितल्यासारखं गेला. मी त्याला मागून पळत बोलवत होते. पण तरीही तो बाईक थांबवला नाही. 

खूप दिवस तो इग्नोर केल्यावर मी ठरवलं की तो जे म्हणतो त्याला होकार द्यावा. त्यासाठी मी त्याला रस्त्यावरच अडवले आणि त्याला कशी बशी  बोलकं करूंन त्याला होकार दिले. तो खूप खुशीत घरी गेला .

आमच्या दोघात एक दिवस ठरली. त्या दिवशी मी कॉलेज बंक केले. माझ्या मनात नसताना फक्त ही रिलेशनशिप टिकवण्यासाठी होकार दर्शवली होते . तो एका हॉटेल रूम बुक केला होता. मी कॉलेज बंक करून त्या हॉटेल जवळ येऊ थांबले. थोड्यावेळाने तो सुद्धा आला. आम्ही दोघेही बुक केलेल्या रूममध्ये गेलो . रूम तशी छानच होती. मी बेडवर बसले. तो माझ्याजवळ येऊन बसला . मला कसतरी वाटू लागलं . 

मी -” संजय… हे सेक्युर आहे ना..”

संजय -” डोन्ट वरी यार … “

तो माझ्या आणखी जवळ आला. माझ्या खांद्यावर हात ठेवला . त्यानंतर माझ्याजवळ येऊन किस करू लागला. त्यानंतर मी त्याचीच झाले. पुढचे काही तास काय झाले कळलच नाही. त्याच्यानंतर तो मला घरी सोडला. मी खुश होते कारण मी रिलेशन टिकवून ठेवले होते.   त्यानंतर आम्ही पुन्हा बोलू लागलो. पुन्हा तेच भेटणं आणि कॉल्स करणं. 

माझी या वर्षाचे परीक्षा चालू होत होते. त्यामुळे मी अजुन कुठेही लक्ष न देता फक्त अभ्यासाकडे लक्ष देत होते. कुठे बाहेर फिरणं नाही . कॉलेजला जाणं कधीच बंद झालेलं होत. मी फक्त अभ्यासाला लागले होते. फोन यूज करणं सोडून दिले होते. 

दोन पेपर झाल्यावर मला समीरचा कॉल आला. 

समीर -” जान्हवी…. कशी आहेस??”

मी -” मी ठीक …. तू कसा आहेस??”

समीर -” मी सुद्धा…. ऐक ना.. संजय तुझ्यासोबत काहीतरी बोलणार आहे. येणार का फ्लॅटवर ??”

मी जीभ चावत आणि डोक्याला  हात मारले. तेंव्हा लक्षात आल की मी त्याला कधीच कॉल आणि मॅसेज केले नाही. इवन मला लक्षात सुद्धा राहील नव्हतं. 

मी -”  ओके ..मी येईन…”

थोड्या वेळाने मी त्याच्या फ्लॅटमध्ये गेले. तिथे गेल्यावर समीर बाहेर गेला. संजय एकटाच तिथे होता. तिथे काही बॅग्स खाली ठेवलेले होते आणि एक बॅग तो पॅक करत होता. मी त्याला तस बघत म्हणाले.

मी -” कुठे चालास?”

तो अजुनही तसाच पॅकिंग करत होता. त्याच बाजू पकडत मी परत म्हणाले.

मी -” कुठे चालास??”

तो रागात येऊन म्हणाला.

संजय – ” तुला काय फरक पडतोय. तू तुझं रहा . मी चालोय पुण्याला… तिथे एक जॉब ऑफर आलंय… तुझ्यापासून खूपच दूर चालोय . तुला तर फक्त तुझच पडलेले असत ना….. किती दिवस झाले आपण बोलून .??..”

मी फक्त शांतपणे ऐकत होते. 

संजय – ” किती कॉल्स केलो ? किती मेसेजेस केलो ?…तुला काहीच फरक नाही पडत.”

माझ्या डोळ्यातून आता अश्रू येऊ लागले होते. 

मी -” मी परीक्षेत बिझी होते रे… सॉरी सॉरी…. प्लीज माफ कर. “

संजय -” अग पण एवढं??… किती दिवस वाट पाहील मी… अनीवेज मला जाव लागणार..”

मी -” प्लीज जाऊ नकोस ना… सॉरी रे… माफ कर ना..”

संजय -” तुला माहिती आहे का??… मला ही जॉब कधीची मिळाली होती . इथे फक्त तुझ्यासाठी थांबलो होतो. पण तुला काहीच फरक पडत नाही. मी आता चालोय. “

मी आता रडत त्याचा बॅग धरत नको म्हणत होते. पण तो ऐकत नव्हता. तो बॅग घेऊन तसाच जात होता.

संजय -” इट्स ओव्हर नाव…. बाय…”

तो तसाच बॅग घेऊन जात होता. मी त्याचा पाय पकडत थांबवत होते. तरीही तो तसाच जात होता. माझी पकड सोडवून तो तसाच गेला. मला एकटं सोडून तो तसाच गेला. तो गेल्यावर मी त्याला कॉल लावले. मग मला कळाल की तो माझा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये ठेवला आहे.

मी तशीच घरी गेले. कित्येक दिवस मी कुणालाही बोलले नाही. जेवणंसुद्धा गोड लागत नव्हत. रात्रभर झोप लागत नव्हती. अगदी डिप्रेस्ड होऊन गेले होते. रात्रभर रडत रडत काढत होते. त्याला मेसेज करू पाहत होते . पण तो ब्लॉक करून ठेवला होता. अजुन मला खूप त्रास व्हायचा. 

ताई घरी आली होती. काही दिवस तिला मी नीट बोलत नव्हते. ती कित्येकदा मला काय झालं म्हणून विचारली . पण मी तिला उत्तर देण्याची टाळत होते. 

दुसऱ्यादिवशी मला कळाल की माझी पिरेड मिस झाले आहेत. मला खूप टेन्शन आल. कुणाला सांगू शकत नव्हते. मेडिकलमधून किट आणून चेक केल्यावर कळाल की मी प्रेग्नंट झाले होते. रडत रडत खाली बसले. काहीच कळत नव्हतं. कुणाला सांगू , कुणाला नको… कळतच नव्हत. मग मी बाहेर येऊन हिम्मत करून ताईला सांगितले. ताईला विश्र्वासच बसला नाही. मी तिला संजयबद्दल सर्वकाही सांगून टाकले. 

ताईलासुद्धा काहीच कळत नव्हतं. ताई मग आईला सांगितली. आईला खूप राग आला . ती मला झाडूने मारू लागली. ताई अडवत होती . पण आज तिला कळाल होत की मी काय केले होते. आईला रडु आणि राग दोन्हीही येत होत .  त्यात ती मला खूप मारली. मला खूप वेदना होत होत्या. पण त्या वेदनेपेक्षा मनाची वेदना खूप वेदनादायी होती. संध्याकाळी बाबा आल्यावर आई त्यांना सर्वकाही सांगितली . मी त्यांची खूप लाडकी होते. त्यांच्या नजरेत पार पडून गेले. ते मला काहीच बोलले नाही. ते फक्त रडत होते. आई ,  बाबांना त्यांच्या लाडाच परिणाम म्हणून त्यांना रागवत होती. मी फक्त रडत खाली कोसळली होते. 

काहितासात अस ठरवण्यात आल की उद्याच्या उद्या डॉक्टरकडे जायचं आणि ट्रीटमेंट घेऊन अबोर्शन करून घ्यायचं. पण बाबा  मात्र काहीही  बोलत नव्हते . सर्वकाही ताई म्हणत होती. मी सगळ्यांच्या नजरेतून पडले होते. डॉक्टरकडून आल्यावर मला सांगलीकडची आत्याकडे पाठवण्याचा निर्णय झाला . बाकीचं राहिलेलं शिक्षण तिथेच पूर्ण करावं लागणार होतं.  बाबा आणि आई कोणीही न येता फक्त ताई मला स्टँडला सोडण्यासाठी जावी अस ठरून झालं . त्या रात्री सामान पॅक करत असताना खूप रडले. बाबांच आणि आईच एक फोटॉफ्रेम घेऊन मी बॅग्स केले . पहाटेच आम्ही निघालो. 

खुपकाही सहन केले मी या दिवसात .. आता फक्त शरीर उरला आहे. मन तर कधीच मेलेल होत. काय करावं ते कळतच नाही. बसमध्ये बसून फक्त मी विचार करू शकते . बाकी काही नाही…..

काहीही असो संजय माझं पहिलं प्रेम होता आणि पहिलं प्रेम सगळे आठवतात . पण मी ते विसरण्याचा प्रयत्न करत होते. पण म्हणतात ना की कधीही विसरावत नाही… पहिलं प्रेम हे पहिलं प्रेमच असत… विसरत नाही आयुष्य संपेपर्यंत…. आजसुद्धा आठवल्यावर डोळ्यातून अश्रू येतात.

ह्या कथा पण वाचा

समाप्त

लेखक : ऋषिकेश मठपती

फीचर इमेज : अंकिता राऊत

कसं वाटलं ही शॉर्ट कथा … नक्की कळवा… धन्यवाद

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल