निलगिरीच्या झाडांना फुलांना पानाना एक अतिशय उग्र वास असतो. पण हे झाड आपल्यासाठी खूप उपयोगी आहे हे तुम्हाला माहीत आहे का? कितीतरी लोक निलगिरीच्या झाडापासून उत्पन्न मिळवण्यासाठी निलगिरीच्या झाडांची शेती करतात. संपूर्ण जगभरात या झाडाच्या सुमारे ७०० प्रजाती आहेत.
ही झाडे उंचच उंच गेलेली असतात. तसेच या झाडांपासून निघालेल्या तेलाचा उपयोग अनेक औषधांमध्ये केला जातो. निलगिरी तसे पाहायला गेलात तर एक औषधी वनस्पती आहे. हीच्यात असणारे गुणधर्म बघा कोणकोणते आहेत.
निलगिरीच्या झाडाचे महत्त्व
निलगिरी तेल यात थोड ऑलिव्ह ऑइल मिसळा हे मिश्रण संधिवातावर अत्यंत उपयोगी आहे.

त्वचा भाजल्यास कधी कधी तेथे जखम होते. अशा वेळी त्या ठिकाणी थोडा निलगिरी तेल लावा.
या निलगिरीच्या झाडापासून कागद निर्मिती ही केली जाते. तसेच फर्निचर बनवण्यासाठी या झाडाचा उपयोग केला जातो.
झाडाला फुले लागली की या फुलांच्या टोकाशी टोपी सारखे आवरण असते. फुले फुलली की या टोप्यांचा सडा जमिनीवर पसरतो.
निलगिरीच्या झाडांची पाने जंतू नाशक असतात शिवाय ह्या पानाचा वास सर्दी झाल्यावर घेतल्यास आरामदायक असतो. म्हणून वेगवेगळ्या बाम मध्ये याच्या तेलाचा वापर करतात.
मेंदी भिजवताना त्यात थोड निलगिरी चां तेल टाका रंग ही छान येतो आणि सर्दी ही होत नाही.
आरोग्याविषयी हे सुद्धा आर्टिकल वाचा.
- बोरं खाण्याचे फायदे
- गावठी तूप खाण्याचे फायदे
- गूळ खाण्याचे फायदे
- कोथिंबीर खाण्याचे फायदे
- ओवा खाण्याचे फायदे