नाचणी हे एक तृणधान्य आहे आणि तेच आपल्या आहारातील महत्वाचे घटक आहेत. जगात सर्वच ठिकाणी आहारात मुख्य म्हणजे तृणधान्यचा वापर करतात. म्हणजेच काय तर तांदूळ, गहू, मका ही महत्वाची तृणधान्य आहेत पण ही सोडून अजूनही तृणधान्य आहेत ती कोणती आहेत तर ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर राळे, किनोवा, बार्ली, राजगिरा तर यांपैकी महत्वाची आणि पौष्टीक अशी नाचणी आज बघुया आपल्या शरीरातील किती उपयोगी आहे.
नाचणी खाण्याचे फायदे
नाचणीचा रंग एकदम गडद तपकिरी असतो. त्यामुळे तिच्यापासून बनवलेल्या भाकरी ही त्याच रंगाच्या होतात. काही लोक नाचणीचा आहारात समावेश करीत नाहीत. त्याला कारण तिचा रंग असावा तिचा आकार मोहरी सारखा असतो आणि चव उग्र असते.
नाचणी या तृणधान्य मध्ये तुम्हाला माहीत आहे का की तांदूळ, गहू आणि ज्वारी पेक्षा ही जास्त पोषकद्रव्ये असतात.
नाचणी मध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व आहे उर्जा कॅल्शियमचे आणि फॉस्फरसचे प्रमाण ही भरपूर प्रमाणात असते. कॅल्शिअम असल्यामुळे तुमची हाडे मजबूत राहतात प्रत्येक मानवाला कॅल्शिअमची गरज भासत असते.
नाचणी खाणे गरोदर महिलांसाठी अत्यंत आवश्यक आहे कारण ही खाल्ल्याने गर्भातील अर्भक याच्या वाढीसाठी लागणारे जास्तीचे कॅल्शिअम हे या नाचणी तून मिळते त्यासाठी गोळ्या खाण्याची गरज नाही भासत.
वाढीला लागणाऱ्या मुलांना जास्त पोषांतत्वांची गरज असते त्यामुळे नाचणीचे पदार्थ खाल्ल्यामुळे या घटकांची पूर्तता होते.
वयोरुध व्यक्तींना ही नाचणी अत्यंत उपयोगी आहे तसेच मधुमेह असणाऱ्या आजारांवर नाचणी ची भाकरी खाणे एक उत्तम आहार आहे. यात असणारे घटक हे रक्तातील साखर वाढून देत नाही त्यामुळे साखर नियंत्रणात राहते.
नाचणी यात असणारे तंतुमय पदार्थ हे कॉलेस्ट्रॉल वर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे ज्यांना हृदय रोग आहे अशांनी नाचणीचे सेवन करावे.
वाढलेले वजन या नाचणीच्या सेवनाने कमी होते. त्याचप्रमाणे बद्ध कोष्टता ही ही नाचणी खाल्ल्याने कमी होते.
हे पण वाचा