सध्या जगभरात अशी परिस्थिती आहे की माणूस फिट असणे गरजचे आहे. पण तुम्ही फिट कसे रहाल? तर ह्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला हवा तो पर्याय तुम्ही निवडू शकता. तुमचं खाणं, राहणं, व्यायाम योगा करणे, अशा प्रत्येक गोष्टी करून तुम्ही स्वतःला निरोगी ठेऊ शकता.
आपल्या वेबसाईट मार्फत आम्ही तुम्हाला नेहमीच निरोगी राहण्यासाठी काय खावं, कसं राहावं ह्याबाबत सांगत असतो. आजही आम्ही तुम्हाला अशाच एका गोष्टी बद्दल सांगणार आहोत. जी तुम्हा सर्वांना माहीत तर आहे पण ते केल्यानंतर मिळणारे अगणित फायदे तुम्हाला माहीत देखील नसतील.
दोरीवरील उड्या हा लहानपणातील आपला सर्वात आवडता खेळ होता. आताच्या पिढीला ते कळणे थोडं अवघड जाईल पण आपण दोरीवरील उड्या हा खेळ खेळून अनेक तास घरच्या अंगणात घालवले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की ह्या दोरीवरील उड्या मारल्याने नकळत का होईना पण आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. चला तर आज आपण पाहूया की नक्की काय आणि कसे फायदे होतात.
दोरीवरील उड्या मारण्याचे फायदे
दोरीवरील उड्या मारल्याने आपल्या शरीराचा व्यायाम घडून येतो. तुम्ही जेव्हा उड्या मारता तेव्हा तुमचे पोट आतबाहेर होतं. ह्यामुळे तुमच्या पोटावर तयार झालेली चरबी कमी होण्यास मदत होते.
दोरीवरील उड्या मारताना तुम्ही जो श्वास घेता, ह्या वेळेस तो श्वास मोठ्या जलद गतीने चालू असते. अशाने काय होतं तर तुमची फुफ्फुस तंदरुस्त राहतात.
खास करून लेखक आणि कला क्षेत्रातील लोकांसाठी हा खूप चांगला व्यायाम प्रकार आहे. कारण ह्याने बोटांची काम करण्याची क्षमता जास्त पटीने वाढते.
उड्या मारताना तुमच्या तळपायावर जास्त वजन पडतो. अशाने तुमचे सांधे बळकट होतात आणि सांधेदुखीचा त्रास तुम्हाला कधी जाणवत नाही.
ह्या व्यायामाने तुमच्या शरीराची योग्य परीने हालचाल होते. त्यामुळे तुम्ही निरोगी राहण्यास हा व्यायाम खूप जास्त कारणीभूत ठरतो.
पण रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी दोरीवर उड्या हा व्यायाम करू नये.
आरोग्याविषयी हे आर्टिकल सुद्धा वाचा
- रात्री फुलणारी रातराणी बद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील, खरंच रातराणीवर साप आकर्षित होतात का?
- रोज न चुकता गरम पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी प्या यामुळे काय फायदे मिळतात ते पहा