दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण जग प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या ओढलं गेलं. युद्धात प्रचंड जीवित हानी झाली. प्रत्येक देशाने युद्धावर भरभरून खर्च केला होता. त्यामुळे अन्य क्षेत्रांचा विकास फार कमी झाला. जगातील लिंग गुणोत्तर असमान झाले. त्यात अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकून अणुयुद्धाची भयानकता दाखवून दिली. पहिल्या महायुद्धमुळे प्रचंड मोठा जनसंहार झाला. पण, कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. मात्र, सुडाच्या राजकारणामुळे दुसऱ्या महायुद्धाची बीजे मात्र रोवली गेली. आजही मध्य पूर्व आणि पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये जे संघर्ष चालू आहेत त्याची बीजे व्हर्साय कराराच्या अन्याय्य तरतुदींमध्ये सापडतील. बॉम्ब हा शद्ब नुसता कानावर जरी पडला तरी अंगावर काटा उभा राहतो.
आतापर्यंत जागाने दोन महायुद्ध अनुभवली आहेत. 1914 ते 1918 या कालावधीत पहिलं महायुद्ध झालं होतं. तर 1939 ते 1945 या कालावधीत दुसरं महायुद्ध झालं. या महायुद्धाच्या जिवंत खुणा आजही युरोपमध्ये पहायला मिळतात. अगोदर पहिले महायुद्ध हे इ.स. 1914 ते इ.स. 1918 दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे (फ्रान्स, रशियन साम्राज्य, युनायटेड किंग्डम व नंतर इटली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने) व केंद्रवर्ती सत्ता (ऑस्ट्रिया-हंगेरी, प्रशिया (वर्तमान जर्मनी), बल्गेरिया, ओस्मानी साम्राज्य यांच्या दरम्यान झाले. यात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला. यात मोठा विध्वंस झाला.अनेक वर्षे याचे दूरगामी परिणाम दिसत होते. त्यांनतर झालेल्या दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्या गोष्टी पुरावे आणि जिवंत स्फोटके आजही सापडतात. असाच प्रकार पोलंड मध्ये आढळून आला. जिवंत बॉम्ब पोलंड मध्ये पुन्हा एकदा भेटला असल्याचे नौदलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
भूकंप नावाच्या या बॉम्बचे वजन 5400 किलो होते आणि त्यात 2400 किलो स्फोटके होती. हा बॉम्ब 12 मीटर खोलीत पाण्याखाली ठेवण्यात आला होता. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर जीवितहानी नाही झाल्याचे पोलंडच्या नौदलानं स्पष्ट केले. स्फोट होण्याच्या अगोदर शहरात गॅसचा पुरवठा थांबविण्यात आला होता.
पोलंडमध्ये 75 वर्षीय जुन्या विध्वंसक बॉम्बचा सोमवारी स्फोट झाला. हा बॉम्ब निकामी करत असताना हा स्फोट झाला. ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने 1945 साली दुसर्या महायुद्धादरम्यान (WW II) पोलंडमधील ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सने ‘टॉलबॉय किंवा भूकंप’ (Tolboy Earthquake)नावाचा 5400 किलोचा हा बॉम्ब टाकला होता. पाण्यात आढळल्याने पाण्याखालीच त्याचा स्फोट घडवून आणून सापडलेला बॉम्ब निष्क्रिय करण्यात आला. यासाठी आधी पाण्यात छोटे छोटे स्फोट घडवून आणले गेले ज्याने. ज्याने पाण्यातले जीव दूर पळून जातील. पाण्यातल्या जीवांना धोका होणार नाही हे लक्षात घेऊन मग मिळलेल्या बॉम्ब शिष्क्रिय करण्यात आला.
या बॉम्बला डिफ्यूज करण्यासाठी 750 लोकांना दूर घेऊन जाण्यात आले होते. मात्र निकामी करण्यासाठी पाण्यात याचा स्फोट घडवून आणण्यात आला. या आधीही अनेक वेळा जिवंत स्फोटके मिळाले होते. त्यांना डिफ्युस करताना अनेकांना जीव गमवावा लागला होता. जर्मनीत महायुद्धात वापरलेल्या स्फोटकांपैकी दोन हजार टन स्फोटके दरवर्षी सापडतात, असे सांगितले जाते. दरम्यान, निकामी करण्यात आलेला बॉम्ब ‘एचसी ४०००’ या प्रकारातील होता. ब्रिटीश सैन्याने जर्मनीवर केलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान फ्रॅंकफर्ट शहरावर हा बॉम्ब टाकल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ब्रिटीश आणि अमेरिकन हवाई दलांनी महायुद्धाच्या काळात जर्मनीवर हल्ला करण्यासाठी सुमारे १.५ मिलियन टन वजनाची स्फोटके वापरली होती. या हल्ल्यात सहा लाख जणांचा मृत्यू झाला होता. तर जर्मनीवर टाकलेल्या बॉम्बपैकी १५ टक्के बॉम्बचा स्फोट झालाच नाही. ते आजही जमिनीखाली गाडले गेले आहेत. त्यामुळेच खोदकामांवेळी अनेकदा अशा प्रकारचे बॉम्ब येथे सापडतात. २०१० साली ४५० किलोचा बॉम्ब सापडला होता. तो निकामी करताना तीन पोलीस ठार झाले होते.
2019 मधेही पोलंडची राजधानी वर्झावाच्या नजीक असलेल्या कुरनिया रासिबोर्सका येथील जंगलात एक जिवंत बॉम्ब सापडला होता. दरम्यान, याची माहिती मिळाल्यानंतर पोलंडच्या लष्कराने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बॉम्ब निकामी करण्याचं काम सुरू केलं. परंतु त्याच दरम्यान त्या बॉम्बच्या झालेल्या स्फोटात दोन सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर यामध्ये दोन जण गंभीररित्या जखमी झाले , त्यांना रूग्णालायत दाखल करण्यात आल्याची माहिती पोलंडचे संरक्षण मंत्री मारिऊस ब्लास्जजाक यांनी दिली होती. स्थानिक माध्यमांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तो बॉम्ब दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीतील असल्याचं म्हटलं जात आहे.
ज्या ठिकाणी हा बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती त्या ठिकाणी यापूर्वी काही शस्त्रे आणि बॉम्ब सापडले होतं. त्यानंतर ते एका ठिकाणी निकामी करण्यासाठी नेण्यात आले होते. त्याआधीही 2017 मध्ये ही बॉम्ब आढळून आला होता. जर्मनीची आर्थिक राजधानी फ्रॅंकफर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील शक्तिशाली बॉम्ब सापडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती विशेष म्हणजे हा बॉम्ब शहराच्या मुख्य भागात सापडला होता. फ्रॅंकफर्ट येथे गेल्या आठवड्यात एका इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होते. त्यावेळी हा शक्तिशाली बॉम्ब सापडला. शहरातील ‘श्रीमंतांची वस्ती’ असलेला हा परिसर निर्मनुष्य करून बॉम्ब निकामी करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घेतला. त्या काळातील बॉम्ब हे अनियंत्रित ऊर्जा उत्सर्जन करणाऱ्या पद्धतीचे असल्याने अधिक खबरदारी घेण्यात आली.
हा बॉम्ब निकामी करताना काही अपघात होऊन तो फुटला असता तर मोठी वित्त आणि जीवितहानी होईल, अशी भीती होती. त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर हा बॉम्ब निकामी करण्यात आला. पण संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यासाठी जवळपास एक आठवडा लागला. दीड किलोमीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.ज्या ठिकाणी हा बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती, त्या ठिकाणी यापूर्वी काही शस्त्रे आणि बॉम्ब सापडले होते. त्यानंतर ते एका ठिकाणी निकामी करण्यात आले. दुसर्या महायुद्धात अन्य राष्ट्राकडून टाकण्यात आलेले बॉम्ब युरोपियन देशांमध्ये सापडतात. यात दोन मोठ्या रुग्णालयांतील रुग्ण आणि लहान मुलांचीही संख्या अधिक होती. जर्मनी आणि फ्रान्समध्ये युद्ध काळात वापरण्यात आलेले जिवंत बॉम्ब सापडतात . इथे आशा प्रकारचे जीवनात बॉम्ब सापडणे ही सामान्य बाब असली तरी अशा घटनांमुळे भीतीचे वातावरण तयार होते.
फ्रॅंकफर्ट येथे एका इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होते. त्यावेळी एक शक्तिशाली बॉम्ब सापडला. शहरातील ‘श्रीमंतांची वस्ती’ असलेला हा परिसर निर्मनुष्य करून बॉम्ब निकामी करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घेतला. त्या काळातील बॉम्ब हे अनियंत्रित ऊर्जा उत्सर्जन करणाऱ्या पद्धतीचे असल्याने अधिक खबरदारी घेण्यात आली. हा बॉम्ब निकामी करताना काही अपघात होऊन तो फुटला असता तर मोठी वित्त आणि जीवितहानी होईल, अशी भीती होती. त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर हा बॉम्ब निकामी करण्यात आला. पण संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यासाठी जवळपास एक आठवडा लागला. दीड किलोमीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यात दोन मोठ्या रुग्णालयांतील रुग्ण आणि लहान मुलांचीही संख्या अधिक होती.
जर्मनीत महायुद्धात वापरलेल्या स्फोटकांपैकी दोन हजार टन स्फोटके दरवर्षी सापडतात, असे सांगितले जाते ब्रिटीश आणि अमेरिकन हवाई दलांनी महायुद्धाच्या काळात जर्मनीवर हल्ला करण्यासाठी सुमारे १.५ मिलियन टन वजनाची स्फोटके वापरली होती. या हल्ल्यात सहा लाख जणांचा मृत्यू झाला होता. तर जर्मनीवर टाकलेल्या बॉम्बपैकी १५ टक्के बॉम्बचा स्फोट झालाच नाही. ते आजही जमिनीखाली गाडले गेले आहेत. त्यामुळेच खोदकामांवेळी अनेकदा अशा प्रकारचे बॉम्ब येथे सापडतात. २०१० साली ४५० किलोचा बॉम्ब सापडला होता. तो निकामी करताना तीन पोलीस ठार झाले होते अशीही बातमी एका वृत्तपत्राने दिली होती. यासारखे अनेक पुरावे आढळतात.
अरुणाचल प्रदेशातल्या रोईंग जिल्ह्यात 30 मार्च 2019 रोजी एका पोलिस प्रतिनिधीसह गस्त घालणाऱ्या 12 सदस्यीय भारतीय सैन्याला दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेल्या अमेरिकेच्या विमानाचे अवशेष सापडले होते. बर्फाखाली पाच फुट खोल हे अवशेष गाढले गेले होते. दिबांग जिल्ह्यातल्या स्थानिक ट्रेकर्सकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सैन्याचे विशेष गस्ती पथक रोईंगपासून 30 किलोमीटर अंतरावरच्या दुर्गम भागात विमानाच्या अवशेषांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. या पथकाने सलग 8 दिवस दाट जंगल आणि हिमाच्छादिन भागात सुमारे 30 किलोमीटर परिसरात शोध घेतला. याच बरोबर पहिल्या महायुद्धमुळे प्रचंड मोठा जनसंहार झाला. पण, कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. पण, सुडाच्या राजकारणामुळे दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली. आजही मध्य पूर्व आणि पूर्व युरोपातील अनेक देशांमध्ये आजही संघर्ष चालू आहेत.
70-75 वर्षाहून जास्त वेळ होऊन गेला असला तरीही आजही महायुद्धात वापरलेल्या गोष्टींचे पुरावे मिळतात. जर्मनीवर टाकलेल्या बॉम्बपैकी १५ टक्के बॉम्बचा स्फोट झालाच नाही. ते आजही जमिनीखाली गाडले गेले आहेत. त्यामुळेच आजही जिवंत बॉम्ब आणि स्फोटके आढळतात. काही वर्षांपूर्वी नाशिक मधेही महायुद्धाच्या युद्धसरावा दरम्यान फेकल्या गेलेला एक जिवंत बॉम्ब सापडला होता. जमिनीत खोलवर गाडली गेलेली जिवंत स्फोटके निष्क्रिय करण्यासाठी मात्र कसरत करावी लागते. योग्य प्रकारे हाताळले न गेल्यास अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. याच बरोबर वाडा तालुक्यातही बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली होती. लोकांमध्ये घाबराटी चे वातावरण पसरले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने देवळी व परिसरातील तेरा गावे उठवून सैनिकी छावण्या लावल्या होत्या. त्यावेळी प्रात्यक्षिके म्हणून तोफांच्या फैरी झाडल्या जात होत्या.
त्यामुळे अशा प्रकारच्या बॉम्ब चे स्फोट या परिसरात होत असत. परंतु ही वस्तू लोखंडी असून अखंड असल्याने स्फोट झालेला नाही असे लक्षात आल्यावर स्थानिक पोलीसांना कळवत या प्रकरणात अधिक तपास करण्याचे आदेश दिले गेले होते. अनेकवेळा असे प्रकार समोर येतात, महायुद्ध म्हणजे आजचे आकर्षक जरी असले तरी याचे दूरवर कितीतरी खोल परिणाम पाहायला मिळाले. आजही काही जिवंत बॉम्ब जमिनीच्या पोटात असतील. हिरोशिमा आणि नागासाकी वर बॉम्ब टाकला गेला तो दिवस प्रत्येकाला ज्ञान आहे. स्थानिक लोक आजही त्याचे परिणाम भोगताना दिसत आहेत.