दुर्वा बघायला गेलात तर दिसायला एकदम गवता सारख्या पण याचा आकार एकदम लहान काडी सारख्या पात्या असतात. हे बहुतेक जणांना माहीत आहे. आपण कोणत्याही पूजेला मुख्यतः गणपतीला आवडतो. म्हणून बाप्पाच्या पूजेसाठी दुर्वा हा प्रामुख्याने वापरतो. अन्य कोणत्याही पूजेला दुर्वा वापरला जातो. दुर्वा स्वभावाला तसा एकदम थंड आहे.
दुर्वा चे फायदे
दुर्वाची चव ही थोडी गोडसर असते. शिवाय त्यात प्रथिने, कॅल्शिअम,फायबर, पोटॅशियम हे घटक आढळतात.दुर्वा मध्ये रोगप्रतिकार क्षमता असते
दुर्वाच्या हिरव्यागार गवतावरून सकाळी चालल्याने तुमच्या डोळ्यांना याचा चांगलाच फायदा होतो.

दुर्वा हा थंड असल्यामुळे ज्यांना कडकी होते किंवा गरमी मुळे अनेक अजात होतात त्यांच्यासाठी उपयोगी आहे. त्यासाठी दुर्वा चार तास तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन भिजत ठेवा हे पाणी प्या.
घशाला सतत कोरड पडत असेल तर हेच पाणी पीत रहा.
त्वचेचे रोग किंवा पोटाच्या आजारावर ही हेच पाणी प्या.
लहान मुलांना उलट्या होत असतील किंवा जंत झाले असतील तर त्यावर ही हे दुर्वाचे पाणी लाभदायक आहे.
उष्णतेमुळे नाकातून रक्त पडत असेल तर अशा वेळी दुर्वाचा रस नाकात टाकावा फायदा मिळेल.
पायाला भेगा पडल्या असल्यास या दुर्वाची पेस्ट करून लावावी.
याच्या गवतावर चालल्याने तुमच्या शरीरात असणारी जास्तीची गरमी बाहेर पडते.
तुम्ही दुर्वा कशा कशासाठी वापरता? आम्हाला नक्की सांगा.
आरोग्य संबंधी हे आर्टिकल सुद्धा वाचा