Home हेल्थ दुधी भोपळा खाण्याचे फायदे

दुधी भोपळा खाण्याचे फायदे

by Patiljee
4492 views
भोपळा

दुधी म्हटले की आपल्या घरात बरेच लोक नाक मुरडता ना? तुम्ही पाहिले असेल म्हणजे काय तर ही भाजी बऱ्याच जणांना न आवडणारी आहे. पण तरीही तुम्ही ती अशा पद्धतीने करून खायला देऊ शकता ज्यांना नाही आवडतं त्यांनी दुधी कोळंबी किंवा सुकट मध्ये बारीक फोडी करून शिजवू शकता. तर वेज वाल्यांनी पराठे किंवा हलवा बनवून किंवा चण्याच्या डाळीत ही दुधी छान लागते.

दुधी भोपळा खाण्याचे फायदे

ज्या प्रकारे दुधामध्ये घटक असतात तितकेच घटक या दुधी भोपळ्यामध्ये असतात. या भाजीत तुम्हाला प्रोटीन, फायबर, मिनरल्स, कार्बोहैड्रेटचे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे तुमचे शरीर वेगवेगळ्या आजारांशी लढण्यासाठी मजबूत बनते.

आता तुम्ही बहुतेक लोकांना दुधीचा रस पिताना पाहता. कारण या दुधीच्या रसात असे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे तुमचा उच्च रक्तदाब आटोक्यात येतो. पण तरीही ही दुधी निवडताना पहिल्यांदा थोडी चाटून बघा. कडू असेल तर अशी दुधी घेऊ नका. शिवाय दुधी रस पिल्याने तुमचे कोलेस्टेरॉल ही नियंत्रणात राहील.

भोपळा

तुमचे वजन जास्त वाढले असेल आणि प्रयत्न करूनही ते कमी होत नसेल तर अशा वेळी दुधीचा रस प्या. यामुळे भूक तर नाही लागत पण यात फायबर जास्त प्रमाणात असते त्यामुळे भूक लागत नाही.

तुमचे केस लवकर पिकायला लागली असतील तर अशा वेळी दुधी उपयोगाचा आहे. दुधी किसा त्याचा रस घ्या या रसात थोडे तिळाचे तेल. मिसळा हे मिश्रण केसांना मुळापासून चोळा एक तासाने डोक धुवा.

लघवीला त्रास होणे म्हणजे त्या ठिकाणी जळजळ होणे यावर थंडगार दुधीचा रस गुणकारी आहे.

लहान मुलांच्या वाढीसाठी ही दुधी खूप उपयोगी आहे. पण मुलांना सहसा दुधी खायला आवडतं नाही. अशा वेळी वेगवेगळे प्रकार बनवून खायला द्या.

कोणत्याही भाजीचा किंवा फळाचा रस काढला की लगेच त्याचे सेवन करणे उत्तम असते.

अशा अनेक फायद्यानी दुधी भोपळा बहरलेला आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस नाकं न मुरडता आवडीने खा. तुमच्याच आरोग्यासाठी खूप चांगलं आहे.

हे पदार्थ खाल्याने सुद्धा तुमचे शरीर राहते निरोगी. वाचा सर्वांनी

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल