Home कथा त्या रात्री अचानक भेटलेला तो

त्या रात्री अचानक भेटलेला तो

by Patiljee
8462 views
रात्री

काहीतरी करून दाखवायचं होतं ,स्वतःला सिद्ध करायचे होतं म्हणून माझं घर सोडून मुंबईमध्ये दाखल झाली. अजून काही दिवस घरी राहिले असते तर घरच्यांनी गरिबीपाई माझं लग्न माझ्या वयाच्या तिप्पट माणसासोबत करून टाकलं असते. म्हणून पुढचा मागचा विचार न करता मी मुंबई गाठली.

माझ्याबद्दल सांगायचे झाले तर माझे नाव पौर्णिमा. पदवीचे शिक्षण घेऊन जॉबच्या शोधात होते. आई बाबांनी खूप मेहनतीने मला शिकवलं होतं पण आता त्यांचं वय सुद्धा झालं होतं त्यामुळे श्रीमंत मुळाशी लग्न लाऊन आपली मुलगी तरी सुखात राहील हा त्यांचा विश्वास होता. पण मला एवढ्या लवकर लग्न करायचेच नव्हते. बहीण भावाला शिकवायचे होते. काही करून स्वतः नोकरी करून घरचा भार उचलायचा होता. म्हणूनच मुंबई मधील पनवेल ह्या शहरात उतरले.

ट्रेन पनवेल स्टेशन पर्यंत पोहोचता पोहोचता रात्रीचे दीड वाजले होते. मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली होती की पनवेल शहरात काहीच माहीत नसताना रात्रीचे कुठे जाणार होते. त्यात भर म्हणून काय मी मुसळधार पाऊस सुद्धा पडत होता. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच मी खाली उतरून आजूबाजूला पाहिले. हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लोकं स्टेशनवर होती. काय करायचे आहे पुढे ह्याचा विचार करत बसणायाठी जागा शोधू लागले.

समोर एका बाकावर जागा दिसली. त्याच बाकावर एक मुलगा सुद्धा बसला होता. कानात हेडफोन्स लाऊन डोळे मोबाईल मध्ये पुढे मागे करत होता. मी जाऊन त्याच बाकावर बसली. मला बसल्याच पाहून तो थोडा लांब झाला. पण मी फार त्याकडे लक्ष दिलं नाही. मोबाईल बाहेर काढला तर तो स्विच ऑफ झाला होता. त्यामुळे नजीकचे हॉटेल तरी कसे शोधणार हा प्रश्न मनात रेंगाळत होताच. कोणताच मार्ग समोर नसल्याने मी त्या मुलाची मदत घेण्याचे ठरवले.

हॅलो, मला कृपया सांगाल का इथे राहण्यासाठी जवळपास कुठे हॉटेल मिळेल का? माझे ऐकुन ही न ऐकुन घेण्यासारखे करत त्याने मान दुसरीकडे वळवली. मी मनातच खूप चिडले होते. असा काय हा? एखाद्या मुलीने समोरून बोलणे चालू केलं तरी त्याचा काहीएक परिणाम ह्यावर झाला नाही. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी त्याला पुन्हा आवाज दिला प्लीज सांगू शकाल का तुम्ही कुठे मिळेल मला राहण्यासाठी जागा.

असे हॉटेल मध्ये राहण्यापेक्षा घरच सोडायचे नाही ना मग, एखाद्या मुलासाठी घर सोडता आणि मग तो मुलगा येतच नाही. कशा अशा मुली तुम्ही देव जाणे. आता मात्र मी खूप जास्त चिडले. ओ मिस्टर तोंड सांभाळून बोला. तुम्हाला माझ्याबद्दल काहीतरी माहीत आहे का? उगाच कशाला तर्क वितर्क काढत बसताय? तुमच्या माहितीसाठी सांगतेय मी नोकरी साठी पनवेल शहरात आलीय. प्रत्येक मुलगी ही काही बॉयफ्रेंड साठी घर सोडत नाही.

आता मात्र त्याची मान शरमेने खाली गेली. आपण बोलून गेलेल्या वाक्याचा त्याला पच्छाताप होत असावा. म्हणून त्यानेच बोलणे सुरू केले. इथे जवळपास तुम्हाला हॉटेल मिळणे खूप कठीण जाईल. आणि जे हॉटेल मिळतील ते खूप जास्त पैसे घेतील, त्यात रात्र सुद्धा खूप झालीय मग अजून चार्ज आकारतील. तुम्ही एक काम करा हा पत्ता घ्या इथे जाऊन रहा. बाकी मी बोलून घेतो.

आणि घाबरु नका मी इथलाच गाव वाला आहे. दोन किमी वर घर आहे या तुम्हाला रिक्षात बसवून देतो. मीच सोडायला आलो असतो पण मी बाहेर चाललोय दोन दिवसांनी येणार आहे. त्याचे ते बोलणे ऐकून मला धीर तर खूप वाटला पण मनात भितीसुद्धा होती की एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून असे कुठेही जाते कितपत योग्य आहे? पण माझ्याकडे दुसरा पर्याय नसल्याने मी सुद्धा होकार दिला. कारण तो मुलगाही मला खरंच स्वभावाने छान वाटला. आम्ही एकाच वयाचे असतानाही तो मला अहो जाओ करत होता. ह्यावरून त्याचे संस्कार दिसत होते.

त्याने मला रिक्षा मध्ये बसवून दिले. रिक्षावाल्याला पैसे देऊन पत्ताही सांगितला. त्या जागेवर पोहोचताच एक ४० ४५ वयातील बाई बाहेरच उभी होती. मला पाहताच तिने माझं सामान घेतलं आणि मला घरात नेलं. घर खूप जास्त छान होतं. एका भिंतीवर शिवराय तर दुसऱ्या भिंतीवर स्वामी समर्थांचा फोटो पाहून मी सुटकेचा निःश्वास टाकला.

त्या बाईंनी मला छान जेवणाचा बेत करून दिला. कोळंबी आणि चिंबोरी बऱ्याच दिवसांनी मी खाली होती. त्या बाई म्हणल्या की आमच्या घरात तुला नेहमी मासळी खायला मिळेल. कारण आमच्या आगरी समाजात म्हावरा नाही खाला तर काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. त्यांच्या घरातील ते वातावरण आणि मला मिळाली वागणूक खूप जास्त चांगली होती.

एका भिंतीवर मी त्या मुलाचा फोटो पाहिला. हा तोच मुलगा होता ज्याने मला ह्या घरी पाठवले होते. मावशी हा कोण मुलगा आहे? अग हा आमच्या वंशाचा दिवा म्हणत त्या हसू लागल्या. मुलगा आहे माझा तो, उद्या येईल घरी संध्याकाळपर्यंत म्हणत त्या किचन मध्ये शिरल्या. आणि मी मात्र त्याच्या फोटो कडे पाहत राहिले. उद्या तो घरी आला की त्याची माफी मागेन करणं त्याला खूप बरं वाईट मी बोलले होते.

पौर्णिमेला नोकरी मिळेल का? ती ह्याच घरात राहील की दुसरीकडे जाईल? तो मुलगा परत घरी आला की ह्या दोघात प्रेम होईल की पुन्हा भांडणे होतील? काय घडेल पुढे? आवडेल का वाचायला? कमेंट करून नक्की सांगा.

कथेचा दुसरा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा

लेखक : पाटीलजी (आवरे उरण रायगड)

ह्या कथा पण वाचा

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल