आपण तुरटी कशासाठी वापरतो तर तिचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पाणी स्वच्छ करण्यासाठी, तुरटी पुर्वी पासून वापरली जाते. पाणी गढूळ असेल तर त्यावर तुरटी फिरवा आणि बघा थोड्या वेळाने ते पाणी स्वच्छ झालेले दिसेल. ही खर तर तुरटी मधील जादू म्हणायला हवी. तुरटी दिसायला कशी असते तर तिचा रंग पांढरा आणि लालसर असतो. तुरटी चे अजूनही भरपूर असे उपयोग आहेत जे तुम्ही रोजच्या जीवनात उपयोगात आणू शकता.
तुरटी चे उपयोग
तुरटी चा जुन्या काळापासून चालत आलेला उपयोग म्हणजे तुम्ही जेव्हा दाढी करता तेव्हा ही तुरटी चेहऱ्यावरून फिरवा चेहरा कडक न होता मऊ होतो.
ही तुरटी मधात मिसळून या मिश्रणाने डोळे साफ करा तुमच्या डोळ्यांचा लालसरपणा निघून जातो.
तुरटी मद्ये थोडे काळे मिरे मिसळा ह्याने दात चागले घासा जेव्हा तुमचे दात दुखत असतील तेव्हा, नक्कीच तुम्हाला आराम वाटेल.
जेव्हा अंगावर कुठेही जखम झाली असेल आणि रक्त थांबत नसेल अशा वेळी तुरटीच्या पाण्यात तो अवयव थोडा वेळ ठेवावा रक्त थांबते.
तुरटी ची पुड मधात घेऊन याचे चाटण करा दमा आणि खोकला यावर उपयोगी आहे.
तुमच्या डोक्यात ऊवा झाल्या असतील तर यावर तुरटी वापरा तुरटी च्या पाण्याने डोके धुवून काढा उवा मारून जातील.
ताप येत असेल तर अशा वेळी ही तुरटी गरम करा. तिला लाही सारखी फुलवा, तिचा चुरा करून पाण्यातून खडी साखर घालून प्या ताप उतरेल.
आरोग्यविषयक हे आर्टिकल सुद्धा वाचा
- वांग्याची भाजी खाण्याचे फायदे
- जांभूळ खाण्याचे फायदे
- जास्वंद फुलाचे फायदे
- दोरीवर उड्या मारण्याचे फायदे
- अडुळसा वनस्पतीचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे