माणसाने समोर असलेल्या क्षणांचा आनंद घ्यावा कारण कधीकाळी त्याच क्षणांसाठी तडफड करावी लागेल सांगता येत नाही. तर मी अभिमन्यू तर ही माझी कथा .१० वी झाली आता पुढे काय ? हा तर ठरलं माझं डिप्लोमा करायचा आणि नशिबाने हव ते कॉलेज ही भेटलं. तर काॅलेज म्हणलं कि समोर येते ती यारी दोस्ती मौजमजा आणि खूप काही जवळपास ६-७ महिने काॅलेज सुरु होवून झाले आणि एके रात्री अचानक अपर्णा चा माझ्या वाॅट्सॲप स्टेटस ला हसण्याचा रिप्लाय आला तर अपर्णा कोण?
फक्त एवढंच माहीत होतं की या नावाची एक मुलगी आमच्या वर्गात आहे. हा आणि फक्त तिचा नंबर माझ्याकडे सेव्ह आणि माझा तिच्याकडे सेव्ह होता बाकी बोलणं कधी झालंच नाही. हे माझ्यासाठी जरा नवीनच होत. तर त्यादिवशी थोडाफार बोलणं झालं कुठे राहतेस? गाव कोणतं? बाकी मनात काही नव्हतंच. हळू हळू बोलणं वाढत गेलं आणि एकदा सहज विचारलं फोन करू का तर तिकडून प्रतिसादाला की फोनवर करणार काय? म्हंटलं एक तर कंटाळा आला आहे तर बोलूया.
तर नाही नाही म्हणत कॉल जवळपास दीड तास चालला असं वाटलंच नाही की पहिल्यांदाच बोलत आहे.मग हळूहळू रोज रात्री उशिरापर्यंत कधी मेसेज वर तर कधी फोन वरती बोलणं चालू राहायचं. आता पहिलं वर्ष संपत आलं होतं आणि आमच्या सुरू झाल्या त्या म्हणजे अंतिम परीक्षा त्यामध्ये तोंडी प्रात्यक्षिक लेखी या वेगळ्या परीक्षा थोडक्यात इंजिनिअरिंगचा छोटा भाऊ म्हणजे डिप्लोमा. मग रात्री अभ्यासाचं बोलणं चालायचं जवळपास एक महिना झाला होता ओळख होऊन पण समोरा समोर एकदाही बोललो नाही.
तर एका तोंडी परीक्षेला प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी कॉलेजची फाईल लागत होती पण दुकान बंद असल्याने माझ्याकडे ती होती तर समोर प्रश्न होता करू काय ? बऱ्याच जणांना विचारलं तुमच्याकडे आहे का पण कोणाकडेच नव्हती तेव्हा समोरून अपर्णा चालली होती तर तेव्हा पहिल्यांदा मी तिला आवाज दिला आणि विचारलं तुझ्याकडे एक्स्ट्रा फाईल आहे का तर ती म्हणाली हो आहे पण रूमवर आहे.
कॉलेज शेजारी एक कॉलनी आहे तिथे कॉलेजमधील बहुतांश मुली एकत्र राहतात तर तिला म्हणालो की आणून देशील का कोणताही विचार न करता ती धावत गेली तर पहिल्यांदा कोणी मुलगी माझ्यासाठी पळत जाऊन काहीतरी आणून देत होती तर परीक्षा संपल्या आणि दिवस आला निकालाचा तर मी चांगलेच दिवे लावले होते आणि असाच संध्याकाळी तिचा निकाल काय आहे यासाठी मी तिला फोन केला तर तिने खूप रागात उत्तर दिले हा जरा मनाला वाईट वाटलं माफ करा जरा जास्तच वाटलं काही वेळाने तिकडून पुन्हा सॉरी म्हणून मेसेज आला ती म्हणाली वडील समोर होते आणि ओरडत होते.
त्यात तुझा फोन त्यांनी पाहिलं म्हणून राग अनावर झाला नाही . म्हणून थोड रागात बोलले . मी ही कोणताही विचार न करता ती गोष्ट सोडून दिली. जून महिना उजाडला. आता आम्ही गेलो होतो द्वितीय वर्षात कॉलेज सुरू झालं पुन्हा रात्री मेसेज कॉल चालू झाले तिथून पुढे आम्ही थोडे जवळ येत गेलो एकमेकांना खाजगी गोष्टी सांगू लागलो हे चक्र सतत चालू होतं आणि नकळत मला तरी तिची सवय होवून गेली आणि तिच्या प्रेमात पडलो
नकळत या आयुष्यात हे वळण कोणते आले
बघता बघता माझे मन तिचे होऊ लागले
पण तिच्या बोलण्यावरून मला जाणवू लागलं की तिला या गोष्टीमध्ये इच्छा नाही प्रत्येकाला भीती असते ये कि प्रेम व्यक्त केल्यावर समोरच्या व्यक्तीसोबत ची मैत्री सुद्धा तुटू शकते. याच भिती मध्ये मी शांत होतो कित्येकदा वाटत होतं की बोलून टाकावं पण आहे ते नातं सुद्धा तुटेल या कारणामुळे शांत बसाव लागलं मग अचानक वर्गात एक बातमी पसरू लागली कि अपर्णाच आमच्याच वर्गात असलेला निलेश यांच्या थोडे संबंध आहेत.
तसं ती मला सांगायची की निलेश सुद्धा माझ्याशी बोलतो पण ही बातमी ऐकून माझ्या पायात घालायची जमीनच सरकली का माहित पण डोक्यात राग येऊ लागला कळत नव्हतं करू काय मग शेवटी ठरवलं की तिलाच विचारावं आणि मी तिला विचारलं की निलेश आणि तुझं काही आहे का तर तिचे उत्तर आलं ” तू वेडा आहेस का या गोष्टींमध्ये पडणार नाही” ते ऐकून जीव भांड्यात पडला डोक्यात रागाचा खवळलेला ज्वालामुखी शांत झाला. पण पुन्हा विचारात पडलो की माझं काय मलाही तिने असंच उत्तर दिले तर ?
मनामध्ये ठरवलं की या नात्याला थोडा वेळ देऊ पहिला सत्र संपलं पण बोलायची हिम्मत झाली नाही. शेवटी मनाचा ताबा सुटला आणि एके दिवशी कॉलेज सुटल्यावर तिला बोललो की तू मला फार आवडतेस माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे. खरंच दोन वाक्य बोलण्यासाठी पण खूप हिम्मत लागते हे त्या दिवशी कळलं तसं तिच्या चेहऱ्यावरून वाटलं की नाही म्हणणारच नाही पण ती म्हणाली मी थोडा विचार करते आणि रात्री सांगते.
तर मी बोलून गेलो चालेल कर विचार थोडा मी वाट पाहतो असं म्हणतात आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची वाट पाहत असतो तेव्हा एक मिनिट सुद्ध एक तासा सारखा वाटतो. रात्र झाली मी तिच्या फोनची वाट पाहत होतो पण फोन काही आला नाही शेवटी मीच फोन केला आणि विचारलं ती काय आहे तुझे उत्तर तर तिने विचारलं एक वर्ष राहिले आहे फक्त कॉलेजला तर या एका वर्षा साठी कशाला आपण मित्र आहोत तेच राहू ना माणसाला कधी अनपेक्षित गोष्ट किंवा उत्तर भेटते तेव्हा माणूस एकतर खचतो किंवा रागाने तापतो तसा मी रागीट असल्यामुळे राग येणे सहाजिक होते.
हा जर तिच्या मनात माझ्याविषयी प्रेम नसतं तर ते मी मान्य केलं असतं पण मला साफ दिसत होतं आणि तिला स्वतःलाही माहिती होतं की तिचंही माझ्यावर प्रेम आहे पण तिने उत्तर का दिलं हे मला अजून कळलं नाही झालं रागात मी फोन ठेवून दिला आणि ठरवलं इथून पुढे तिच्याशी संबंध ठेवायचे नाही खूप झालं आणि माझं प्रेम हे रागात बदललं. ज्या प्रेमाच्या नजरेने तिला बघत होतो तीच नजर आता तिला रागाने बघत होती कारण एकच अनपेक्षित उत्तर .
जवळपास दोन वर्षांने आमचा वर्ग एकत्र बाहेर जायला निघाला फिरून झालं आणि परतीचा प्रवास सुरु झाला फिरताना ती माझ्या जवळ आली होती आणि म्हणाली की आपण फोटो काढू या पण राग माणसाच डोकं कामातून काढून टाकतो हे खरं मी एवढा क्रूर पहिल्यांदाच वागलो तिला धुडकावलं ती पोरगी अनेकदा जवळ आली पण माझा राग काही गेला नाही. शेवटी घरी जाताना बस मध्ये सगळे बसलेलो असताना मी एक वाक्य बोलून गेलो.
ते म्हणजे “मला समजून घेणारं जीव लावणारे कोणीच नाही” यानंतर अचानक ती म्हणाली की मला चक्कर येणे तर मी झोपते चक्कर ऐकून माझे मन जरा वितळलं सगळं झालं सर्वजण घरी गेले आणि नंतर मला कळलं मी जे बोललो होतो त्यामुळे अपर्णाच्या डोळ्यात पाणी आल. जवळपास महिना होऊन गेला कॉलेजचा फेस्ट आला कमिटीमध्ये असल्यामुळे मला सतत काम असल्याकारणाने तिच्याशी बोलायला आणि घडलेल्या गोष्टी निस्तरायला वेळ भेटला नाही.
तिचे आलेले फोन मला उचलता आले नाही रागात उचलले नाही असेही म्हणता येईल कॉलेजमधले सगळे मित्र एकत्र बाहेर जेवायला गेलो तेव्हा ती माझ्या शेजारी बसली होती पण तिच्याशी बोललोच नाही फेस्ट संपला कॉलेज पुन्हा नियमित चालू झाले आणि करावा काय असा प्रश्न पडला तर माझ्या जवळचे मित्र गौरव व ऋषिकेश यांनी पुढाकार घेऊन आमचं जुळवून दिलं मी मनातील सगळा राग विसरून पुन्हा तिला विचारलं आणि आता तिचा होकार अटळ होता कारण माझ्या मित्रांनी तिला समजावलं होतं.
ती हो बोलली आणि मी मी स्वर्गात गेलो आनंद काय असतो आनंद कसा जगावा हे अक्षरशः तेव्हा कळले त्यादिवशी शुक्रवार होता आणि ती घरी चालली होती तर जाता जाता हो बोलुन गेली आणि ती गेली दुसऱ्या दिवशी पासून कोरोनामुळे जगात लॉक डाऊन पडले. कॉलेज बंद झाले नशीब म्हणतात ते काय ते आज कळतंय एक दिवस उशीरर केला असता तर अजून असाच एकटा बसलो असतो. पण आत्ता आहे जुन्या गोष्टींची आठवण काढून स्वतःला आपण किती मूर्ख आहोत हे सांगतो ती जवळ असताना तिची किंमत काही नाही.
आता तिच्या सहवासासाठी तडफडत आहे दोघांचा फोटो नाही यावरून फिरायला गेल्यावर माझ्या मागे वेड्यासारखा फोटो काढण्यासाठी हट्ट करणारी अपर्णा मला दिसते तिचे आलेले फोन कॉल उचलले नाही याची जाणीव आठवड्यात किंवा महिन्यातून एकदा येणाऱ्या कॉल वाट पाहताना आठवते. ते क्षण तेव्हां जगलो असतो तर खूप बरं झालं असतं असं वाटतं तेव्हा जरा शांत डोक्याने विचार केला असता तर छान झालं असतं पण आता उपयोग काय आता फक्त वाट पाहिजे ती समोर येण्याची फोनवर बोललेली प्रत्येक रात्र आठवते मन तडफडत आहे तिचा आवाज ऐकण्यासाठी तिचा सहवास मिळवण्यासाठी.
हही पण आपल्या मराठी लवस्टोरी वाचा गावाकडचं प्रेम
लेखिका स्विटी महाले ( टीम पाटीलजी )