जांभुळ या फळाचा आकार लहान तसेच रंग काळभोर असतो. जांभळा कलर असतो. चांगली पिकलेली ही जांभले असली तर ही फळं खायला एकदम गोड रसरशीत लागतात. पण कच्ची असल्यावर ती तोंडात न घेण्यासारखी चवीला असतात. पण हीच जांभळं कधी मिळतील तेव्हा खा खूप हितकारक असतात आपल्या शरीरासाठी.
ठाकरं, कातकरी लोक विकायला आणतात ही जांभळं, कधी मोठी टपोरी असतात तर कधी त्यांचा आकार लहान असतो. वरून जांभळा रंग असला तरी आत मात्र हे फळ पांढरे असते. बी ही सुद्धा बऱ्यापैकी मोठी असते. या बियांचे उपयोग ही आहेत बघुया तर आपल्या शरीरासाठी जांभळाचे कोणकोणते उपयोग आहेत.
जांभूळ खाण्याचे फायदे

जांभुळ या फळाचा सर्वात जास्त फायदा हा मधुमेह असणाऱ्या लोकांना होतो. अशा लोकांनी जांभुळ खाणे म्हणजे औषध पेक्षा कमी नाही. या जांभळा मध्ये असे गुणधर्म लपलेले आहेत ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. रक्तातील जास्तीची साखर लगेच तिचे ऊर्जेत रूपांतर होते. म्हणून अशा लोकांनी न चुकता जांभळं खा किंवा सीजन नसेल तेच बियांच्या पावडरची सेवन करा.
तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर नक्की जांभळे खा. त्यामुळे तुमची हिमोग्लोबिनची पातळी वाढते. जांभळा मध्ये मोठ्या प्रमाणत असते आयर्न आणि लोह असते.
मुतखडा झाला असेल तर अशा लोकांनी जांभळाच्या बियांचे पावडर दह्यात मिसळून हे सेवन करावे.
जांभळाचे ज्युस नेहमी पित जा. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
ज्यांना उच्च रक्त दाबाचा त्रास आहे अशा लोकांनी जांभुळ खाल्यास त्यांना फायदा होतो. रक्तदाब नियंत्रणात राहते.
जांभळाच्या झाडाची साल आणि बिया यांची पावडर अतिसार आणि अपचन यावर गुणकारी आहे.
जखम झाली असल्यास रक्त थांबण्यासाठी जांभळाच्या झाडाची पाने लावा रक्त थांबते.
लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. तर थोड्या प्रमाणात ब जीवनसत्त्व असते.

स्त्रियांच्या स्वेतपदर या आजारावर ही जांभलाची साल गुणकारी आहे.
मूळव्याध होऊन रक्त पडत असेल तर अशा वेळी जांभळाचा रस प्यावा किंवा जांभळं खावीत.
आरोग्याविषयी हे आर्टिकल सुद्धा वाचा
मका भाजून किंवा उकडून खा, त्याच्या सेवनाने कित्तेक आजार जातात पळून.वाचा