जुन्या काळी लोक जास्त करून गुळाचा वापर आहारात करायचे. तो ही उत्कृष्ट गूळ पण आताच्या गुळात खूप फरक आला आहे. ऑरगॅनिक गूळ मिळते पण ते ही सर्वानाच घ्यायला मिळत नाही. असा हा गूळ पुर्वी लोक चहा बनविण्यासाठी ही गुळाचा वापर करायचे.
त्याचं खानपान इतकं पौष्टीक होत म्हणून तर ते जास्त काळ जगले. आपल्याकडे काही पारंपरिक पदार्थांमध्ये ही गूळ वापरला जातो. जसे की पुरण पोळी, मोदक, गूळ पापडी चिक्की असे पदार्थ बनवले जातात. साखरे पेक्षा गूळ खाणेच उत्तम असते. कारण साखर खाल्ल्याने ऊर्जा तर मिळते पण बीपी आणि शुगर वाढते. पण गूळ खाल्ल्याने तुमची चरबी ही घटायला लागते. तर आज बघुया गुळ पासून आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात.
गूळ खाण्याचे फायदे
गूळ कसे बनवतात हे तुम्हाला माहीत आहे का? तर उसाचा रस आटवून गूळ तयार केले जाते. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे इत्यादी घटक आढळतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत.
गुळामध्ये कॅल्शिअम आणि फॉस्परस् असते त्यामुळे सांधेदुखी कमी होते. तसेच आपली हाडे मजबूत होतात.
गूळ हा उष्ण आहे त्यामुळे ज्या स्त्रिया गरोदर आहेत अशा स्त्रियांनी अधिक गूळ खाणे टाळावे.
गोड खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्यासाठी गूळ खा गोड आणि उत्तम गूळ खाणे आरोग्यासाठी चांगला असतो. गूळ खाल्याने दिवसभराची कामे ही न थकता करू शकता.
गुळामध्ये हिमोग्लोबिन असते त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या शरीराला लोहाची आवश्यकता असतेच. म्हणून प्रत्येकाने गूळ खाणे आवश्यक आहे. स्त्रियांनी गूळ खाणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक महिन्याला त्यांना मासिक पाळी येते आणि त्यासाठी त्यांना रक्ताची कमतरता भासू नये.
गूळ निवडताना गडद रंगाचा काळपट गूळ मिळतो तो शरीरासाठी उत्तम आहे. रोज गूळ खाल्ल्याने तुमची पाचक्रिया सुधारते. खाल्लेले अन्न चांगले पचते.
गुळासोबत आले खाल्ल्याने घशाचे आजार दूर होतात.
गुळामद्ये भरपूर प्रमाणत पोटॅशियम असल्यामुळे तुमचे रक्तदाब ही नियंत्रणात राहते.
गूळ खाणे आरोग्यास उत्तम आहे पण लक्षात घ्या कोणताही पदार्थ अति खाणे नेहमीच वाईट असते आपल्या शरीरासाठी.
तुम्ही सुद्धा तुमच्या दैनंदिन आयुष्यात गूळ खाता का? नक्कीच आम्हाला कळवा.
हे पण वाचा