तूप म्हटलं की त्यात तुम्हाला दोन प्रकार दिसतात. एक म्हणजे वनस्पती तूप त्याला डालडा बोलतात आणि दुसरं म्हणजे आपले गाई आणि म्हशीच्या दुधापासून बनवलेले तूप. आज आपण गाईच्या किंवा म्हशीच्या दुधापासून बनलेले तूप म्हणजे गावठी तुप बाबत बोलणार आहोत. यांपैकी दोन्ही तूप हे आपल्या शरीरासाठी उत्तम आहेत.
पूर्वीच्या काळापासूनच आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये तुपाचा वापर आपण करत आलेले आहोत. म्हणजे तसे बोलायला गेलात तर पुरण पोळी, मोदक, शिरा, खीर, खिचडी, शिवाय वरण भात आणि त्यावर तूप हे सगळे आणि असे कित्तेक पदार्थ आहेत जे तुपाशिवाय अर्धवट आहेत. तुपामुळे या पदार्थांना एक सुवास येतो आणि शिवाय त्यापासून आपल्या शरीराला कितीतरी गुणधर्म मिळतात ते कोणते ते पाहूया.
गावठी तूप खाण्याचे फायदे
कॅल्शिअम, फॉस्परस, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, तसेच अँटी व्हायरल हे घटक आपल्याला या तुपामधून मिळतात.
तूप खाल्ल्याने चरबी वाढते असा भ्रम आपल्या लोकांमधे आहे. त्यामुळे सहसा तूप खाणे टाळतात. पण तुपामुळे चरबी वाढत नाही ती तेलामुळे वाढते हे लक्षात असू द्या.
रोज नाकातून तुपाचे थेंब सोडा. यामुळे अनेक आजार आपल्यापासून लांब पाळतात. तुमच्या केसांच्या समस्या दूर होतात. तसेच त्वचेचे विचार अलर्जी उठणे यावर गुणकारी आहे.
तुम्हाला माइग्रेनचा त्रास असेल तर त्यासाठी रोज नाकात दोन थेंब तरी तूप टाकावे. शिवाय साधी डोकेदुखी असेल तरीही तूप नाकातून टाकावे आराम मिळतो.
तुम्हाला सौचास साफ होत नसेल तर रात्री झोपताना दुधामध्ये एक चमचा तूप टाकून प्या. सकाळी पोट साफ होईल आणि मूळव्याधीचा त्रास ही कमी होईल.
जेवणात रोज थोडा तरी तुपाचा वापर करावा. त्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते, त्यामुळे खाल्लेले अन्न लवकर पचायला लागते.
तूप खाल्ल्याने एनर्जी मिळते दिवसभराच्या कामातून थकवा जाणवत नाही.
तुपा पासून बनवलेले काजळ लहान मुलाच्या डोळ्यात लावतात.
मुत्रविकार असतील तर जेवणाच्या अगोदर आणि नंतर असे चमचाभर तूप सेवन करावे त्यामुळे फायदा होतो.
उचकी काही केल्या थांबत नसेल तर तुपाचे चाटण करावे.
जुलाब होत असतील तर तूप आणि साखर खावी आराम पडतो.
सर्दी झाल्यास किंवा नाक चोंडल्यास ही तुपाचे थेंब नाकात सोडावेत. किंवा नाकातून रक्त येत असल्यास तेच करावे.
रोज गावठी तूप खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
तूप खाल्ल्याने पोटातील गॅसचा होणारा त्रास ही तूप खाल्ल्याने निघून जातो.
थंडीमध्ये ओठ फुटले असतील तर त्यावर तूप चोळा ओठ मऊ होतात.
तुपाचे हे अगणित फायदे तुम्हाला ह्या आधी माहित होते का? तुम्ही तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात गावठी तुपाचा वापर करता का? आम्हाला नक्की सांगा.
आरोग्यविषयी हे आर्टिकल पण वाचा