Home हेल्थ गवती चहा पिण्याचे आहेत वेगवेगळे फायदे पाहूया काय काय आहेत ते

गवती चहा पिण्याचे आहेत वेगवेगळे फायदे पाहूया काय काय आहेत ते

by Patiljee
22278 views
गवती चहा

मित्रांनो तुमच्या पैकी किती जण रोज गवती चहा पितात तर मुळात कोणीच नसेल. हा कधीतरी माणूस मज्जा म्हणून पितो. पण नेहमी पित नाही कदाचित पिणे होत नाही. कारण सध्याच्या काळात आपल्याला सगळं काही इन्स्टंट मिळत आहे. त्यामुळे गवती चहा चे झाड लावणे जीवावर येते. पण लक्षात घ्या जितके ताजे आणि पौष्टीक घटक शरीरात जातील तितके ते आपल्या शरीरासाठी उत्तम आहे.

गवती चहा

अशी काही झाड आहेत ती आपल्या कुंडीत ही लावता येतात, त्यापैकी आहे एक गवती चहा. ही गवती चहाची पाने बाजारात ही विकत मिळतात पण तरीही आपल्या घरी लावलेली असली तर उत्तम. ह्या गवती चहाची पाने चहा मध्ये टाकताच खूप छान सुगंध दरवळतो. शिवाय हा चहा घेतल्याने मिळतात अनेक फायदे चला तर बघुया.

सर्दी किंवा ताप आला असेल तर हा चहा उत्तम आहे. मस्त गरम गरम हा चहा करा आणि या गवती चहा ची पाने पाण्यात उकळवून त्याचा मस्त वाफारा तोंडातून आणि नाकातून घ्या वरती पांघरूण घ्या.

गवती चहा

सध्या पावसाळा आहे या दिवसात आजार काही पाठलाग सोडत नाहीत. त्यात ताप येणे नंतर ताप आल्यावर थंडी भरणे इत्यादी समस्या निर्माण होतात या कळत ही गवती चहाची पाने पाण्यात उकळवून हे पाणी प्या.

तुम्हाला जर कधी थकवा जाणवत असेल तर अशा वेळी गवती चहा प्या. शिवाय डोकेदुखीवर ही गवती चहा पिने लाभदायक असते.

गवती चहा पिल्याणे पचनसंस्था मजबूत बनते. त्याच बरोबर संधिवात असणाऱ्या लोकांनी ही हा चहा पिणे आवश्यक आहे.

गवती चहा मध्ये अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात जे आपल्या त्वचेसाठी लाभदायक असते.

पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावा फायदा होईल.

गवती चहा

त्यामुळे आजपासून एक पण करा की कुठे गवती चहाचे झाड मिळाले तर घरात आणून ते लावाल. लसुण हृदय रोगासाठी आहे एक अत्यंत प्रभावी औषध, वाचा आणि असा उपयोग करा

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल