Home कथा गणपती माझा नवसाचा राजा

गणपती माझा नवसाचा राजा

by Patiljee
3934 views
गणपती

तो दिवस मी कधीच विसरू शकणार नाही, अजूनही आठवला तरी अंगावर काटा येतो इतक्या मोठ्या संकटतून आम्ही वाचलो आहोत. पण खरं सांगू याचे सगळे श्रेय मी माझ्या बाप्पाला देते. हो गणेश म्हणजे माझा देव गणपती बाप्पा, त्या वेळी माझ्या संकटात माझ्यासाठी धाऊन आला. त्यावेळी डॉक्टरांचे सगळे प्रयत्न संपले होते. पण तरीही माझी जी गणपती बाप्पावर श्रध्दा होती तो फळाला आली.

त्या दिवशी अशोक आमच्या नवीन कार मधून पहिल्यांदा कामाला गेला होता. म्हणजे नेहमी जायचं पण कार घेऊन पहिल्यांदा गेला होता. कार तसा तो चालवायला हळू हळू शिकला होता पण माहीत माहीत नाही त्या दिवशी नेमके काय झाले? कदाचित त्याचीच चूक झाली असेल कारण तो ड्रायव्हर तसा नवीनच होता. पण आम्ही अजूनही त्याला त्याबद्दल काहीच विचारले नाही आणि त्यानेही सांगितले नाही.

त्या दिवशी कामावर जाताना तो बरोबर गेला पण घरी येताना काहीतरी झाले आणि अशोकक्या गाडीचा अपघात झाला. असा फोन जेव्हा मला आला तेव्हा पहिल्यांदा माझे हात पाय गळून गेले, उभ राहायची टाकत माझ्यात नव्हती. पण तरीही कशीतरी भिंतीचा आधार घेऊन उभी राहिले. माझ्या घरी आई बाबांना फोन लावला त्यांनाही धक्का बसला पण तरीही मिळेल त्या गाडीने कोकणातून येऊन त्यांनी सरळ हॉस्पिटल गाठले.

अशोक कसा असेल? हा विचारच मला करवत नव्हता. खूप सारे प्रश्न मनात उभे राहिले होते. पण तरीही डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. काय करू मी देवा आता तूच रहा पाठीशी गणपती बाप्पा असे मनातल्या मनात म्हणत होते. इतक्यात समोरच एक भिकारी आला गाडी अडवत माझ्याकडून भिक मागू लागला. खर तर मी आज तरी त्याला भीक देण्याच्या मनस्थितीत नव्हते मला आज समोर फक्त माझा नवरा दिसत होता.

पण तरीही माहीत नाही का त्या भिकाऱ्याचा चेहरा मला तेजस्वी वाटला. वाटलं संकटाच्या वेळी माझा गणपती बाप्पा माझ्यासाठी धाऊन आला आहे. मी पुढचा कसलाच विचार न करता पर्स मधून शंभर रुपयाची नोट काढली आणि त्या बाबांच्या हातावर दिली. ते बाबा जायला निघाले तेव्हा मीच त्यांना पुन्हा अडवले आणि म्हणाले बाबा मला आशीर्वाद नाही देणार का तुम्ही? त्यावर ते भिकारी बाबा चक्क म्हणाले बाळ माझा आशीर्वाद तर नेहमीच तुझ्यासोबत असणार आहे.

इतकं बोलून ते बाबा निघून गेले. मी सुध्दा हॉस्पिटल मध्ये पोचले. डॉक्टरांना भेटले तेव्हा डॉक्टरांचे म्हणणे ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. डॉक्टर म्हणाले अशोक च्या मेंदूला रक्त पुरवठा होत नाही त्याची नस फाटली आहे. आमचे प्रयत्न चालू आहेत पण तरीही ९० टक्के आम्ही नाहीच सांगतो बाकी देवावर सोडा.

देवावर सोडा म्हणजे देवापुढे ही डॉक्टरांचे काहीच चालत नाही. हो ना मग आज माझ्या देवाची परीक्षा आहे असे समजा. त्याचं घरी जाण्याचा निर्णय घेतला हॉस्पिटल मध्ये माझे आई वडील आणि अशोकचे दोन मित्र होते. मी पुढच्या क्षणी घरी पोचले. समोर गणपती बाप्पाचे फोटो दिसला. तो काढून पाटावर ठेवला. एक दिवा लावला आणि गणपती बाप्पाचे नामस्मरण करायला सुरुवात केली. मनात आणि ध्यानात फक्त माझा गणपती बाप्पा होता. अगदी मनापासून त्याला हाक मारत होते.

सकाळची आता संध्याकाळ झाली होती. नामस्मरण करता करता अचानक फोनची रिंग वाजू लागली. पण तरीही मी जागेवरून उठले नाही. माझ्या मनात फक्त गणपती बाप्पाला मनापासून हाक मारायची होती बाकी मला काहीच दिसत नव्हते. काही वेळ गेल्यानंतर अचानक आई बाबा घरी आले म्हणाले पोरी आपले जावई शुद्धीवर आले. तुझी पूजा फळास आली ग. हॉस्पिटल मध्ये अचानक बाहेरचे डॉक्टर आले होते त्यांनी ऑपरेशन केलं आता सर्व ठीक आहे.

हे ऐकुन माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तो दिवस होता त्या दिवशी मी माझ्या घरी गणपती ची स्थापना करण्याचे ठरवले आणि दरवर्षी गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती आणून तिची मनोभावे पूजा करते.

स्वामीभक्त असाल तर ही कथा पण वाचा अशक्यही शक्य करतील स्वामी

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण)

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल