खोबरेल तेल पूर्वीपासूनच लोक ह्या तेलाचा उपयोग आपले केस निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्यात गुंत व्हायला नको तसेच केसांत ओलावा टिकून राहण्यासाठी उपयोग करत आले आहेत, अजूनही करत आहेत. समाज कितीही पुढे गेला तरी काही गोष्टी आहेत त्या आपल्यासाठी इतक्या खास आहेत किंवा त्या रोज आपल्याला लागतातच.
त्यातीलच एक म्हणजे खोबरेल तेल होय. आपण हे तेल फक्त केसांसाठी वापरतो पण या तेलाचे अजूनही भरपूर उपयोग आहेत ते तुम्हाला माहीत आहेत का ?
खोबरेल तेलाचे फायदे
तुमच्या पायाच्या टाचा फाटलेल्या असतील म्हणजे भेगा पडल्या असतील तर त्यावर पेट्रोलियम जेली सोबत आपले खोबरेल तेल थोड टाकून हे चोळावे. त्यामुळे त्याच्यातील सगळा कोरडेपणा निघून जातो शिवाय पायाच्या टाचा मऊ होतात.
खोबरेल तेल एक उत्तम प्रकारे मेकअप रीमोवर चे काम करतो बाजारातून केमिकल युक्त रीमोवर वापरण्यापेक्षा हे एक उत्तम मेकअप रीमोवर आहे. त्यामुळे सध्याच्या काळात स्त्रियांसाठी खोबरेल तेल अती उत्तम.
खोबरेल तेल हे प्रत्येक त्वचेसाठी एक उत्तम टॉनिक आहे. रोज रात्री झोपताना चेहऱ्यावर लाऊन झोपा. यामुळे तुमची त्वचा टवटवीत आणि कोमल होते. त्याचं प्रमाणे हात आणि पायांवर ही तुम्ही खोबरेल तेल चोळू शकता.
या खोबरेल तेलात थोडी चमचाभर साखर घ्या आणि याने चेर्यावत स्क्रब करा हे एक चांगले आणि नैसर्गिक स्क्रबर म्हणून उपयोग होऊ शकतो.
हातानी मिरची कापल्यामुले हाताचा दाह होत असेल अशा वेळी थोड खोबरेल तेल घ्या आणि हाताला चोळा दाह कमी होतो.
ओठ फाटल्यावर ते झोंबताता कधी कधी त्यातून रक्त ही येते अशा वेळी खोबरेल तेल चोळावे.
आरोग्यविषयक हे आर्टिकल सुद्धा वाचा
- तुमच्याही पायाच्या टाचांना भेगा गेल्यात, मग आर्टिकल तुमच्यासाठी आहे
- वांग्याची भाजी ह्या कारणासाठी नक्की खा
- जास्वंद फुलाचे महत्त्व
- दोरीवर उड्या मारण्याचे फायदे असेही फायदे असतात हे तुम्हाला आजवर माहित नसेल. वाचा