Home हेल्थ कोळंबी खाणे बहुतेक जणांना आवडते पण तिच्यात कोणते गुणधर्म असतात हे माहीत नसतील

कोळंबी खाणे बहुतेक जणांना आवडते पण तिच्यात कोणते गुणधर्म असतात हे माहीत नसतील

by Patiljee
29099 views
कोळंबी

कोळंबी एक चविष्ट मासळी पदार्थ कुणी ह्याला झिंगा पण म्हणतात. म्हणजे काय तर तेथील प्रदेशानुसार बोलीभाषा बोलली जाते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ह्याला वेगळी नावे असणे साहजिकच आहे. कोळंबी ही माशाचा एक प्रकार आहे. पण हिच्या मध्ये एकही काटा नसतो. हीचा आकार लहान तसेच मोठा असतो.

सुकवळेली कोळंबी असते तिला सुकट असे म्हणतात. ती ही खूप ठिकाणी खाली जाते. कोळंबी बनवताना अगदी थोडा कांदा, लसूण मसाला, खोबरं लसूण कोथिंबीरचे वाटण घेऊन रस्सा बनवायचा, खायला एक नंबर लागतो. या रश्यामध्ये तुम्हाला हवी ती भाजी ही टाकू शकता. म्हणजे बघा शेवग्याच्या शेंगा, फ्लॉवर,घेवडा,दुधी तुम्हाला हवी ती भाजी टाकू शकता खायला एकदम झकास लागते करून तर बघा.

कोळंबी खाण्याने मिळतात हे फायदे

कोळंबीमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात पाहिले जाते. तसेच व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियम याशिवाय कोळंबी मध्ये कार्बोहाइड्रेट ही भरपूर प्रमाणत आढळतात. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर कोळंबी नक्की खा. कोळंबी खाल्याने असे काही घटक मिळतात ज्यामुळे आपली त्वचा टवटवीत होते.

तिसऱ्या म्हणजे शिंपले कधी खाल्ले आहेत का तुम्ही? वाचा त्याचे फायदे

त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. आपल्या डोळ्याची ही दृष्टी सुधारते. तसेच तुमच्या केसांच्या समस्या ही दूर होतात. कोळंबी मध्ये भरपूर प्रमाणत झिंक सापडते. जे तुमच्या केसांना नवचैतन्य देते. शिवाय त्यात असते ओमेगा ३ हे फॅटी एसिड, आपल्या शरीरातील विषारी पदार्थ म्हणजे हानिकारक कोलेस्टेरॉल बाहेर टाकण्यासाठी मदत करतात.

त्याचप्रमाणे कॅल्शिअमचे प्रमाण ही भरपूर असल्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. शिवाय कोळंबी खाण्याने लोह ही मुबलक प्रमाणत मिळतात. त्यामुळे रक्ताची कमतरता असेल तर कोळंबी नक्की खा.

हे पण वाचा खेकडा, चिंबोरे आणि मुठे भरपूर खा त्यांच्यात आहेत हे पौष्टीक घटक पहा

Related Articles

Leave a Comment

error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल