तुम्हाला जर निरोगी आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी तुमच्या खाण्या पिण्याच्या काही सवई आहेत त्या तुम्ही बदलायला हव्यात. सकाळचा नाष्टा करताना उत्तम आहार घ्यावा. त्यासाठी तुम्ही कांदेपोहे खाल्लेले अती उत्तम. चुकीचे पदार्थ खाल्ल्याने त्याचा तुमच्या आहारावर वाईट परिणाम होत असतो.
शिवाय त्याचे परिणाम लगेच तुम्हाला भोगावे लागतात. त्यासाठी योग्य आणि हेल्दी पर्याय म्हणजे कांदे पोहे होय. बहुतेक ठिकाणी कांदे पोहे खाल्ले जातात पण काहींना बाहेरचे फास्ट फूड खाण्याची सवय लागलेली असते, पण ती सवय चुकीची आहे. कांदे पोहे खाल्ल्याने मिळतात अनेक फायदे यातून तोटा नाही. तसेच बाहेरचे मैद्याचे बिस्कीट किंवा अन्य पदार्थ खाण्यापेक्षा पोहे हा साधा सोपा आणि कमी खर्चात होणारा पदार्थ आहे.
कांदेपोहे खाण्याचे फायदे
सकाळच्या नाश्त्यात पोहे खाल्ल्याने तुमच्या शरीराला अधिक ऊर्जा प्राप्त होते. त्यामुळे दिवसभर खूप मेहनत केली तरी शरीरावर त्याचा काही परिणाम होत नाही.
कांदेपोहे म्हटले की हा पदार्थ खायला तर एकदम चविष्ट तर असतोच पण तो पचायला ही हलका असतो, शिवाय पोहे पोटात गेल्यानंतर ते आणखी फुगतात आणि पोट भरल्या सारखे राहते. आणि म्हणून हा सकाळचा उत्तम आहार म्हणून मानला जातो.
पोह्या मध्ये वेगवेगळे घटक आपल्याला पाहायला मिळतात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्नस पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, सी आणि डी यांचे मुबलक आढळते.
तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी पोहे हा उत्तम पर्याय आहे. पहिली गोष्ट म्हणजे पोहे खाल्यावर पोट भरल्यासारखे वाटते भूक कमी लागते शिवाय पोह्यांमधे कॅलरीज ही कमी असतात.
या पोह्यांधे व्हिटॅमिन सी ही पाहिले जाते. ज्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते. नियमित पोहे खाल्ल्याने तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता जाणवत नाही.